बावनकुळे यांचा मुलगा ‘संकेत’च्या ऑडीने दिली 5 वाहनांना धडक नागपुर येथील घटना

Date:

नागपुर (बदलापुर विकास मिडिया)- भाजपचे शाह यांच्या मुलाच्या बीएमडब्ल्यू कार ने दिलेल्या धडकेत तरुणांनी जीव गमावला ही बातमी संपुर्ण राज्यात जोरदार चर्चा असतांनाच भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा संकेतची ऑडीने नागपुरात 5 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे याही घटनेत पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास दिरंगाई केली व पहाटे 4 च्या सुमारास एफ.आय.आर. दाखल केल्याने इतका वेळ तक्रार दाखल करण्यास का लागला असा प्रश्न नागपुरकर विचारत आहेत.  या घटनेतील नागपुर पोलिसांचा तपास पाहिल्यानंतर राज्यातील जनतेला जोरदार धक्का बसला आहे.

रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास दारुच्या नशेत ऑडी कार चालकाने चार ते पाच वाहनांना ज्यामध्ये दुचाकी वाहनाचाही समावेश आहे जोरदार धडक दिली. या धडकेत काही वाहनांची झालेली अवस्था पाहुन वाहनाचा वेग काय असेल हे चांगल्याच प्रकारे अंदाज लावता येईल. या अपघाताच्या घटनेत भाजप महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत बावनकुठे यांचा मुलगा संकेत असल्याने नागपुर सह संपुर्ण महाराष्ट्रात या अपघाताकडे आणि पोलिसांकडून होणार्या चौकशीकडे लक्ष ठेऊन आहेत. उपस्थित साक्षिदारांच्या मते संकेत व इतर मंडळी दारुच्या नशेत होती व गाडी चालवत होते परंतु सिताबुल्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत चकाते यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले कि बावनकुळे यांच्या ड्रायव्हरने गाडी चालवली होती आणि त्यावेळी ड्रायव्हर अर्जन जितेंद्र हावरे सह त्याचा मित्र रोनित चिंतमराव कारमध्ये होता. संकेतच्या नावाचा कुठेही समाजेवश गुन्ह्यात करण्यात आलेला नाही.

अंदाजे 150 कि.मी. ताशी वेगाने धावणारी ऑडी काचिपुरा ते हॉटेल लोकमत चौकच्या मध्यभागी दरम्यान हा अपघात झाला असुन 4-5 वाहनांना धडक देत आरबीआई चौकातील एका दुचाकी वाहनाला ही धडक दिली असे समजते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिस कारवाईदरम्यान गाडीची नंबर प्लेट बदलण्यापासुन ते घटनेतील गाडीच बदलण्याचा प्रयत्न करण्यात आले होते. भाजप महाराष्ट्र अध्यक्ष बावनकुळे यांचा मुलाशी ही घटना संबंधीत असल्याने राजकिय दबाव सध्या पोलिस प्रशासनावरच नाही तर मिडियावर ही सुरु असल्याचे दिसुन येते. महाराष्ट्र टाईम्स या राज्यस्तरीय वृत्तपत्राने जेव्हा बातमी प्रकाशित केली असतात राजकिय दबावानंतर बातमी काढुन टाकण्यात आल्याने याबाबत ही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपुर येथे ज्याप्रकारे बावनकुळे यांच्या मुलाचा नाव अपघातात असतांना सुद्धा पोलिसांनी गुन्ह्यात संकेतचे नाव का टाकले नाही यावर आता वेगवेगळी चर्चा सुरु आहे. यापुर्वीदेखील महाराष्ट्र राज्यातील इतर शहरातील पोलिसांकडून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल करण्यास उशिर केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नोद केल्यानंतर आता नागपुरातील घटनेत पोलिस कशाप्रकारे कारवाई करणार यावरच महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...