जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सुशिक्षित मुलावर विश्वास ठेऊन कल्याण तालुक्यातील मतदारांच्या गावाची दैयनिय अवस्था होते तेव्हा…

Date:

कल्याण (बदलापुर विकास मिडिया) – छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणुन ज्या महाराष्ट्राची ओळख आहे त्या राज्यात मागील काही वर्षात भ्रष्टाचार आणि गुंडशाही एवढी वाढली आहे कि नागरिकांना आता लोकप्रतिनिधींवर विश्वास उरलेला नाही. खासदार आणि आमदार पदाच्या निवडणुकीत उमेदवारावर आता विश्वास ठेवायचं तरी कसं आता प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना व मतदारांना पडला आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्राचे मतदार सध्या आपल्याच खासदाराशी मागील अनेक वर्षांपासुन अत्यंत नाराज आहेत. विशेष म्हणजे कल्याण लोकसभा क्षेत्रात मागील अनेक वर्ष अनेक कामे अद्याप पुर्णत्वास नसल्याने तसेच खासदार शिंदे यांनी मागील अनेक वर्ष कधी मतदारांची विचारणा करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रात फेरफटका न मारल्याने मतदारांनी नाराजीचा सुर दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र एक सुशिक्षित व डॉक्टर क्षेत्रातील व्यवसाय करणारे राजकिय नेते अशी त्यांची ओळख. याच परिचयाला डोळ्यासमोर ठेऊन कल्याण लोकसभेतील लाखो मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मतदान केले व खासदार म्हणुन निवडुन ही दिले. सुशिक्षित उमेदवार आहे आणि पैश्याने ही कमी नाही तसेच तरुण आहे म्हणुन अश्यांना निवडुन दिल्यास भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही व जनतेची रखडलेली विकास कामे केंद्र आणि राज्य पातळीवर पुर्ण होणार अश्या भोळ्या अपेक्षांनी मतदारांनी शिंदेंना लोकसभेत पाठवले परंतु जनतेच्या आरोपांनुसार निवडुन आल्यानंतर शिंदेंनी आजवर कधी तोंड सुद्धा मतदारांना दाखविले नाही.

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे व्यवसायाने जरी डॉक्टर असले तरी मागील काही वर्षातील त्यांच्या राजकिय कारकीर्द पाहिले असा हे डॉक्टर की डॉक्टरच्या अपरॉनमधील गुंड अशी म्हणण्याची जनतेवर वेळ आली आहे. शिंदे यांच्या कल्याण लोकसभा क्षेत्रात ज्याप्रकारे गुन्हेगारीत वाढ आहे, विविध गुन्ह्यातील आरोपींचे लिंक शिंदे गटासोबत असल्याने, त्याचसोबत विकास कामात जोरदार भ्रष्टाचार आणि रखडलेली कामे अद्याप पुर्णत्वास नाही या अश्या कारणांमुळे भविष्यात श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा क्षेत्रातूल निवडणुक लढवण्यास इच्छुक नाही का? असा प्रश्न आता कल्याण लोकसभा क्षेत्रातील मतदारांना पडला आहे. यंदा श्रीकांत शिंदे ह्या तीन वेळेस लोकसभेत खासदार म्हणुन त्यांनी हैट्रीक मारली आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनेक खेडेगावातील ग्रावस्थांनी बदलापुर विकास मिडियाशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली कि, आमच्या गावातील अनेक विकास कामांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. खासदार शिंदे यांच्या हस्ते जे काही विकास कामांचे उद्घाटन झाले ते देखील अद्याप पुर्णत्वास नाही. खासदार निधीतून केलेल्या कामांची सध्याची परिस्थिती पाहिल्यावर कंत्राटदाराने भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत केले असेल याचा अंदाज लावता येतो.

विशेष म्हणजे ग्रामस्थांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर ह्या व अनेक समस्यांबाबत चर्चा केली. ग्रामस्थांनी दबक्या आवाजात गावातील समस्यांबाबत जर निर्भिडपणे तक्रार केल्यास शिंदेंची गुंड आम्हाला मारुन टाकणार असे ही म्हटल्याने कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे यांनी कश्या प्रकारचे राजकारण करुन ठेवले आहे अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे. एक सुशिक्षित आणि डॉक्टर असलेल्या राजकिय नेत्याबाबत जर मतदारांकडून अश्या प्रतिक्रिया येत असणार मग भविष्यात निवडणुकीत उमेदवारावर विश्वास तरी कसं ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...