बुल्डोझरचा खेळ खेळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘त्या’ भगिनीची माफी मागणार?

Date:

वसई विरार पालिके हद्दीतील सी7 रेसॉर्टवरील बुल्डोझर कारवाईची घटना

सुप्रिम कोर्टाचा बुल्डोझर प्रकरणावर महत्वाचा निर्णय

विरार (महाराष्ट्र विकास मिडिया) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एके ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांना आपली बहिण मानत असल्याचा दिखावा करुन लाडगी बहिण योजनेचा प्रचार करतात तर दुसर्या ठिकाणी राजकिय द्वेषातुन एका महिलेचं रेसॉर्टवर बुल्डोसर फिरवण्यासाठी आदेश देतात. नुकताच सुप्रिम कोर्टाने अनधिकृत्त बुल्डोझर कारवाईवर आक्षेप व्यक्त करत महत्वाचे निर्णय दिले असुन आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या महिलेची माफी मागणार का? असा सवाल वसई विरार शहरातील नागरिक करत आहेत.

जुलै महिन्यात वसई विरार महापालिका हद्दीतील अर्नाळा बिच जवळील सी7 रेसॉर्टवर पालिकेने बुल्डोझर कारवाई करत संपुर्ण रेसॉर्ट उद्वस्थ केले. पालिकेतर्फे कोणतीही पुर्व नोटीस न देता ही कारवाई फक्त मुख्यमंत्र्यांना खुष करण्यासाठी तडकाफडकी करण्यात आल्याचा पिडीतांचा आरोप आहे. या रेसॉर्टवर शिवसेना पक्षाचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबियासमवेत रेसॉर्टवर आले होते. त्यावेळी एका रिक्षा चालकाने गाडी रिवर्स घेतांना मिलिंद मोरेच्या नातेवाईकाला धक्का लागुन अपघात झाला. त्यामुळे रागाच्या भरात मिलिंद मोरे यांनी रिक्षाचालकाला मारहाण सुद्धा केली. वातावरण अतिशय गढुळ झाले व बाचाबाची झाली व काही मिनिटांनंतर एका कारला टेकुन उभे असतांना मिलिंद मोरे यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. संपुर्ण घटना सी.सी.टी.व्ही. कॅमरेत कैद झाली होती. घटनेत ज्याप्रकारे रिक्षाचालकाची चुक होती त्याचप्रमाणे दादागिरी केल्यामुळे कै. मिलिंद मोरे यांचीही देखील चुक दिसुन येते. कै. मोरे हे एक लोकप्रतिनिधी व राजकिय पदाधिकारी असल्याने त्यांनी अश्या घटनेत संयम्माने हाताळण्याऐवजी मारहाण करण्यास त्यांनी सुरु करुन वातावरण चिघळवले हे स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन येते. मृत्युचे कारण हे हृदयविकाराने झाल्याचे डॉक्टरांनी देखील स्पष्टपणे नमुद केले. परंतु माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ मोरे यांच्याशी जवळीक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरेंप्रमाणे राग आवरेना म्हणुन काही एक विचार न करता आपल्या मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करत स्थानिक पालिका प्रशासनाला रिसॉर्टवर बुल्डोझर फिरवण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे रेसॉर्ट जमिनदोस्त करण्यासाठी पालिकेच्या चार बुल्डोझर (जेसीबी) ने कारवाई करत सदर रेसॉर्ट चालवणार्या महिलेवर अन्याय केला. विशेष म्हणजे त्या महिलेची या घटनेत काहीच संबंध नव्हता ती देखील तिच्यावर हा अन्याय झाला. रिक्षाचालक जरी त्या रेसॉर्टवरील कर्मचारी असला तरी रेसॉर्ट चालकाची काय चुक होती ज्यामुळे अश्या प्रकारे बुल्डोझर कारवाई करण्यात आली असा सवाल संतप्त वसई विरार परिसरातील जागृक नागरिक करत आहेत.

एके ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील महिला म्हणजे माझी लाडकी बहिण अश्या बाता मारतात तर दुसर्या ठिकाणी राजकिय द्वेषापोटी आपल्या पदाचा गैरवापर करुन महिलेचा व्यवसाय आणि आयुष्य उद्धस्त करण्यासाठी बुल्डोझर पाठवतात. त्यामुळे वसई विरार सह संपुर्ण राज्यातील महिला शिंदेंच्या अश्या कारभारामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.

पिडीत महिलेने मिडियाशी बोलतांना सांगितले कि, ”मी एका गरिब शेतकरी कुटुंबातुन आहे व मागील अनेक वर्ष मी शेती करत होते, बैंकेतुन कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढुन 4-5 कोटी खर्चकरुन हे रेसॉर्ट उभारले. त्या दिवशी मारहाणीची घटना झाली त्याला आमचाही पाठिंबा नाही परंतु मृत झालेला व्यक्ति हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असुन आम्ही कोणी त्याची हत्या केलेली नाही त्यामुळे आमच्यावर अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी का अन्याय केले? आम्ही त्यांच्या लाडकी बहिण नाही का? या कारवाईमुळे आता आमचं संसार आणि शेकडो कर्मचारी रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.”

विशेष म्हणजे अनेक स्थानिक रहिवाश्यांच्या कारवाई होतांना पाहुन डोळ्यात पाणी आले होते. दोन पैसे कमिवण्यासाठी गरिब शेतकरी कुटुंबियानी उभारलेल्या रेसॉर्टला मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर पालिका उद्वस्थ करुन टाकते यामुळे स्थानिकांनी देखील सरकारवर जोरदार टिका केला. धक्कादायक बाब म्हणजे या रेसॉर्टच्या आजु बाजुला देखील इतर रेसॉर्ट आहेत जे पालिकेच्या नियमात बसत नाही परंतु फक्त एकालाच टार्गेट केल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजाविषयी देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

नुकताच भारतातील दिल्ली शहरात झालेल्या अन्यायकारक बुल्डोझर प्रकरणावर सुप्रिम कोर्टाने बुल्डोझर कारवाई विषयी स्थानिक प्रशासनावर ताशेरे ओढले असुन सुप्रिम कोर्टाचा हा निकाल एक प्रकारे शिंदे सरकारच्या कारवाईवरही चपराक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिडीत बहिणीची माफी मागत नुकसान भरपाई करणार का? यावरच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सुप्रिम कोर्टाचा निकाल वाचण्यासाठी क्लिक करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...