मुरबाड (महाराष्ट्र विकास मिडिया)- मुरबाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते शिवसेनेचे सुभाष पवार यांनी गणेशोत्सवानिमित्त मुरबाड ग्रामिण भागात आणि शहरी भागात धडाक्याने गाठी भेटी सुरु केल्या असुन आज सरळगाव येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या मोरया मित्र मंडळाला व इतर गणेश मंडळांना पवार यांनी भेट देत बाप्पांचा आर्शिवाद घेतले आहे.
मंडळाचे विश्वस्तांनी सुभाष पवार यांचे स्वागत केले, तरुण कार्यकर्त्यांची त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आपल्या परिसरातील समस्यांबाबत माहिती दिली.
सरळगाव येथील शेकडो ज्येष्ठ नागरिकांची सुभाष पवार व त्यांच्या सहकार्यांनी गाठी घेटी घेत जनसम्पर्क वाढवत असतांनाच सरळगाव मध्ये विकासाबाबत आपली दृष्टीकोणाबद्दल माहिती दिली.
गणपती बाप्पांचे आर्शिवाद घेत सुभाष पवार यांनी येत्या निवडणुकीत गुंडगिरी संपणार व प्रामाणिक लोकांची सत्ता येऊ द्या असे बाप्पांकडे मागणी करत नागरिकांचा विश्वास वाढवला.
याप्रसंगी सोबत शिवसेना जिल्हा सचिव कांतीलालजी कंटे, मोहनशेट भावार्थे, किसनजी विशे, जयवंतजी हरड, जगनजी घुडे , गुरुनाथजी झुंझाराव,एकनाथजी व्यापारी,बाळु भोईर , रोहन घुडे व अनेक गणेशभक्त, मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदा शिवसेना पक्षाचा मुरबाड विधानसभा क्षेत्रात गणेश उत्सवानिमित्त ज्याप्रकारे प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला त्यानंतर आता सत्तेचा माज करणार्यांचं काही खरं नाही अशी सर्वत्र चर्चा आहे.