मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा राज्यातील गुंडांकडून दुरुपयोग
उल्हासनगर (महाराष्ट्र विकास मिडिया)- मागील काही वर्षांपासुन महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात गुंडप्रवृत्तीचे लोक मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नावाखाली शहरात आणि ग्रामिण भागात दहशत पसरवत असल्याचे आजवर दिसुन आले. नुकताच बदलापुरातील महिलेचा विनयभंगाची घटना असो, नेरळ येथे भर दिवशा लोखंडी रॉडने मारहाणीची घटना असो, अंबरनाथ येथे साक्षिदाराचे अपहरण व मारहाणीची घटना असो किंवा ठाण्यात बैनर वरुन पोलिसांना कुत्रा म्हणण्याची घटना असो या प्रत्येक घटना शिंदे गटातील लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे दिसुन आले. यामुळे आता उल्हासनगर शहरात ही अश्यााच प्रकारे शिंदे गटाच्या नावाखाली काही गुंड दादागिरी आणि हफ्तेवसुली करत असल्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
उल्हासनगरात काही महिन्यांपुर्वी भल्या पहाटी शिंदे गटाचा उल्हासनगर युवा शहर अधिकारी सुरजीत पंजाबी याच्या सांगण्यावरुन काही गुंडांनी एका व्यक्तिला मारहाण केली. विशेष म्हणजे मारणारे आणि मार खाणारे दोन्ही पोलिसांच्या हिस्ट्री शिटरवर असल्याने उल्हासनगरात गैंगवॉर सुरु आहे. कल्याण बदलापुर रस्त्यावर ही घटना 7 मार्च रोजी घडली होती ज्यामध्ये पोलिसांनी सुरजी पंजाबी यालाही आरोपी केले. विशेष म्हणजे सुरजीत पंजाबी हा शिंदे गटाचा असल्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर सत्तेचा दबाव असल्यामुळे पोलिसांनी पंजाबीला अटक केलेले नाही असे सुत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या घटनानंतर पंजाबीचे मोरके स्थानिक पातळीवर अनेक फेरीवाले, टपरीवाले, बिल्डर आणि बिअर बार कडून हप्तेवसुली करत असल्याची गोपनिय सुत्रांकडून माहिली मिळते.
शिंदे गटात नेमकं युवा कार्यकर्ता म्हणुन कशा प्रकारच्या तरुणांची नेमणुक केली जाते याबाबत आता उल्हासनगरात प्रश्न उपस्थित होत आहे. राजकारणात समाजसेवा करणार्यां ऐवजी गुंडांची नेमणुकच कशी काय केली जाते याबाबत आता सुज्ञ नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत उल्हासनगर शहरातील काही स्थानिक पत्रकारांनी बातमी सुद्धा प्रकाशित केली होती आणि विशेष म्हणजे उल्हासनगर डांस बार मध्ये सुरजीत पंजाबीच्या नावाचे गाणे सुद्धा वाजत असल्याबाबत बातमी प्रकाशित केली होती परंतु सत्तेच्या दबावाखाली वाकलेल्या उल्हासनगर पोलिसांनी मात्र अद्याप कोणतीही हालचाली व कारवाई न केल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता उल्हासनगरकर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत.
एकुणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जिल्हा ठाणे येथील गडावर ज्याप्रकारे दहशत पसरवण्यासाठी अनेक गावगुंड शिंदे गटाच्या नावाचा दुरुपयोग करत आहे त्यामुळे भविष्यात शिंदे गट स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर बदनाम होण्याचे चिन्ह दिसुन येते.
उल्हासनगर, ठाणे, अंबरनाथ, बदलापुर किंवा नेरल कर्जत, शिंदे गटाच्या नावाचा दुरुपयोग फक्त एक किंवा दोन जिल्ह्यात नसुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात होत असल्याने तातडीने वरिष्ठ पातळीवर दखल घेणे गरजेचे असल्याचे शिंदे गटात प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात महाराष्ट्र विकास प्रतिनिधीजवळ प्रतिक्रिया दिली.



