बदलापुरात अल्पवयीन मुलांकडून मोबाईल चोरीची घटना

Date:

नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या केले हवाली

अल्पवयीन आरोपींचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- आज सकाळी बदलापुर पुर्व पनवेल हायवे याठिकाणी तीन अल्पवयीन मुलांकडून मोबाईल चोरीची घटना घडली. शहरातील जागृक नागरिकांनी जेव्हा या तीन्ही मुलांच्या हालचालीवर संशय घेऊन त्यांची विचारणा केली असता मोबाईल चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्या अल्पवयीन मुलांना हा मोबाईल तुमच्याच मालकिचा असल्यास मग पिन द्वारे फोन उघडुन दाखव असे सांगितल्यामुळे तसेच त्या मुलांना पिन माहित नसल्याने हा फोन चोरीचाच असल्याची खात्री नागरिकांना झाली आणि त्यांनी या तिन्ही अल्पवयीन मुलांना बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात नेले.

विशेष म्हणजे त्याचवेळी ज्या नागरिकांचे मोबाईल चोरी झाले होते ते देखील पोलिस ठाण्यात आधिपासुनच तक्रार नोंदविण्यासाठी आल्याने याच अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याबाबत खात्री पटली.

याबाबत बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बालवाडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले कि, सदर अल्पवयीन आरोपींची माहिती घेऊन त्यांना सोडण्यात आले आहे तसेच या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

काहीं नागरिकांनी या घटनेसंदर्भात अल्पवयीन आरोपींचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा ही प्रकार घडला आहे. त्याचसह पोलिस ठाण्यातुन हे अल्पवयीन चोर पळुन गेले अशी देखील सोशल मिडियावर चर्चा होत असुन जुवेनिल जस्टिस केअर एण्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्डरन एक्ट 2015 प्रमाणे पोलिसांनी केलेली ही कारवाई नियमाप्रमाणे असल्याचे समजते. तसेच आरोपी जर अल्पवयीन असला तर त्याचे फोटो प्रसार माध्यमांवर तसेच सोशल मिडियावर टाकणे नियमांचे उल्लंघन आहे परंतु बदलापुरात सर्रास पणे तसे होतांना दिसुन येते.

जुवेनिल जस्टिस केअर एण्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्डरन एक्ट 2015 प्रमाणे जर एखाद्या अल्पवयीन आरोपीकडून गुन्हा घडतो अश्या वेळी पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींचे नाव आणि पत्ता नोंद केला जातो व त्यांना वॉर्निंग देऊन किंवा बॉन्ड घेण्यात येते. अनेकदा अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती त्यांच्या पालकांना दिली जाते. अल्पवयीन आरोपींना साधारण आरोपींसारखं पोलिस कस्टडीत घेतले जात नाही. त्यानंतर जुवेनिल जस्टिस बोर्डचे न्यायमुर्ती घटनेची चौकशी करतात व अल्पवयीन आरोपींना शिक्षा देण्यात येते. जर अश्या अल्पवयीन आरोपींना तुरुंगाची शिक्षा जरी झाली तरी त्यांना जुवेनिल ऑबसर्वेशन घरात ठेवले जाते. याच एक्टच्या सेक्सन 74 प्रमाणे जेव्हा अल्पवयीन आरोपीची आइडेंटीटी उघडकीस जो कोणी करतो अश्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुद्धा आहे याची नोंद घ्यावी.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...