कर्जत (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची भेट घेतली. शिंदे गटातील पदाधिकार्यांनी पोलिसांनी निवेदन सादर करत ज्यांनी सुरुवातीला व्हिडीओ सोशल मिडियावर टाकत आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असा उल्लेख केला त्याचा शोध 8 दिवसात घेण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात करण्याचा इशारा ही दिला. या वरुन आता भाजप, राष्ट्रवादी, मनसे पक्षाकडून अनेक टिका येतांना सामान्य कर्जतकर सुद्धा आता दबक्या आवाजात आपली प्रतिक्रिया देत आहेत.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात जो हाणामारी करतो त्या आमदाराचा कार्यकर्ता काय देवा पुजा करणार आहे का? आमदार विधीमंडळात मारहाणीची घटना करतात आणि त्यांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर नेरळ मध्ये करतात. त्यामुळे खरं तर गुंडंगिरी कोणीही कुठे करायला नको याची शिस्त आता राजकारण्यांना लागली पाहिजे असे मत कर्जतकरांकडून व्यक्त होतांना दिसत आहे.
काही महिन्यांपुर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची मंत्री दादा भुसे यांच्यासोबत विधीमंडळातच थेट हाणामारीची घटना घडली. त्यावेळी भरत गोगावले – शंभुराज देसाई यांनी मध्यस्ती केली होती. हा विषय त्यावेळी सुद्धा मिडियाने बातमी प्रकाशित करत कशाप्रकारे विधीमंडळातही नेते गुंडगिरी आणि हाणामारी करतात हे जनतेसमोर दाखविले. आज सहा महिन्यांनी पुन्हा नेरळ मध्ये हाणामारीची घटना घडते आणि आरोपीचे लिंक आणि मार खाणार्या पिडीतेचे लिंक आमदार महेंद्र थोरवे सोबत लागत असल्याने कर्जत मधील गुंडशाही संपणार तरी कधी आसा सवाल आता सामान्य कर्जतकरांना पडला आहे.
विशेष म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्रात मागील काही वर्षात एका नव्या प्रकाराची संस्कृती जन्माला आली आहे ज्यामध्ये गुन्हे घडतात पण मान्य करत नाहीत, गुन्हा केल्यानंतर वर तोंड करुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो, दहशत माजवल्यानंतर माफी मागण्याऐवजी कार्यकर्त्यांची फौज पोलिस ठाण्यात निवेदन देते ह्या असल्या नव्या संस्कृतीला पाहुन महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला गेला आहे हे दिसुन येते.



