मारहाण झालेल्या पिडीतेला न्याय मिळावा म्हणुन नव्हे तर आमदाराची बदनामी होऊ नये म्हणुन शेकडो कार्यकर्ते कर्जत पोलिस ठाण्यात दाखल

Date:

महाराष्ट्रातील हुजरेगिरीचे राजकारण

कर्जत (महाराष्ट्र विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील राजकारण पाहिल्यावर हुजरेगिरी कोणत्या थरापर्यंत गेली आहे हे चांगल्याचप्रकारे दिसुन येते. कर्जत तालुक्यात नुकताच एका निष्पाप व्यक्तिला त्याच्या परिवारासमोर शिवा नावाचा गावगुंड मारहाण करतो, परंतु त्यावेळी त्याला वाचवायला कोणी येत नाही. हा प्रकार नेरळ मध्ये घडतो आणि ये जा करणार्या शेकडो नागरिकांसमोर गुंडाकडून लोखंडी रॉडने मारहाण होते परंतु पिडीतेला वाचवायला मात्र एक माणुस सुद्धा जात नाही, पण व्हिडीओ मात्र अनेकजण बनवतात. त्याचसोबत सदर गुन्ह्या घडल्यानंतर सदर पिडीतेला न्याय मिळावा म्हणुन तीन दिवसांपर्यंत नेरळ आणि कर्जत विभागातील साधं एक माणुस सुद्धा पोलिस ठाण्याची पायरी चढत नाही. परंतु व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा करणारा गावगुंड आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड असल्याचा दावा केल्यानंतर जेव्हा मिडियाकडून बातम्यांना सुरुवात होते तेव्हा मात्र ह्या कर्जत तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आमदाराची गेलेली अब्रु वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतात. ही आजच्या महाराष्ट्र आणि भारतातील राजकारणाची खरी परिस्थिती पाहुन हसावे कि रडावे अशी अवस्था कर्जतकरांची झाली आहे.

एके ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कारकीर्दीत ज्याप्रकारे शेकडो शेतकर्यांंचे नुकसान झाले व त्याचवेळी मुंबईच्या अब्जाधिशाला फायदा झाला हे जगजाहिर आहे. त्यावेळेस पिडीतेला न्याय मिळावा म्हणुन कर्जत पोलिस ठाण्यात किंवा मुंबई उच्च न्यायालयात कर्जतचा जातांना कोणी दिसला नाही, परंतु जेव्हा सत्ताधार्यातील नेत्याचे कारस्थान उघड्यावर येते तेव्हा मात्र अनेकांना कळ लागतांना दिसत असुन हुजरेगिरीचे राजकारण महाराष्ट्र आणि भारतात अजुन किती काळ चालणार याची चिंता आता सुज्ञ नागरिकांना वाटत आहे.

नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्या श्रीमती. सुषमा अंधारे यांनी अजुन एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये काही गुंड माथेरानच्या नगरसेवकाला मारहाण करतांना तसेच गाडीचे नुकसान करतांना दिसुन आले. श्रीमती. अंधारे दावा करतात कि त्या व्हिडीओ मध्ये गुंडगिरी करणारा एक व्यक्ति हा शिवा आहे जो नेऱळ मध्ये ही गुंडगिरी करत होते. त्यामुळे या नव्या व्हिडीयो क्लिप नंतर पुन्हा एकदा महेेंद्र थोरवे या आमदाराच्या नावाचा कार्यकर्ते कशाप्रकारे वापर करुन शहरातच नव्हे तर संपुर्ण विधानसभा क्षेत्रात कशाप्रकारे दहशत पसरवतात हे दिसुन येते.

विशेष म्हणजे त्यावेळी सुद्धा माथेरानच्या त्या नगरसेवकासाठी कार्यकर्त्यांची फौज पोलिस ठाण्यात न्याय मिळणेसाठी जात नाही परंतु सत्तेत असलेल्या आमदाराची गेलेली अब्रु वाचवण्यासाठी मात्र कर्जत शहरात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होतांना पाहुन ह्या प्रकारच्या राजकारणामुळेच आपला भारत देश आणि त्या देशातील नागरिक भ्रष्टाचार आणि दहशतीच्या वातावरणाच्या दलदलीत पार बुडुल गेले आहे असे कर्जतकरांनी नाव न छापण्याच्या अटीवर मत व्यक्त केले.

एकुणच कर्जत विधानसभा क्षेत्रात ज्याप्रकारे विद्यमान आमदार थोरवेंच्या बचावासाठी ज्याप्रकारे शेकडो कार्यकर्ते तातडीने पोलिस ठाण्यात येत असल्याचे चित्र दिसुन येते त्यावरुन पुन्हा एकदा हेच सिद्ध होते कि राजकारणी दहशत पसरवणार, गुंडगिरी करणार, कार्यकर्त्याकडून मारहाण कर करायला लावणार पण नागरिकांनी मात्र मार खायचं आणि आवाज करायचं नाही कारण आवाज केला तर गुंडांची सेना आणि त्या सेनेची कार्यकर्ते आहेच फौज म्हणुन जमा व्हायला.

कर्जत मध्ये जर एखाद्या 8 विद्यार्थ्यांनी एकत्रित पोलिस ठाण्यात गेल्यास कर्जतचे पोलिसवाले हातात असलेला दांडा दाखवतात व जमाव करु नका असला सल्ला देतात परंतु तेच पोलिसवाले आमदार थोरवेंचे शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जमाव घेऊन आले तर मात्र हाताची घडी घालुन वेलकम करतात. ही आजच्या महाराष्ट्र पोलिस प्रशासनाची अवस्था आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...