डोंबिवलीत अनधिकृत्त बांधकामांंचा सुळसुळाट ; गार्डनच्या आरक्षणावर सात मजली इमारत

Date:

खोट्या कागदपत्रांच्या आधारे रेरा सर्टिफिकेट ही मिळवुन घेतले – फ्लैट घेतांना ग्राहकांनी घ्यावी विशेष काळजी

डोंबिवली (महाराष्ट्र विकास मिडिया)- कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सध्या अनेक ठिकाणी अनधिकृत्त बांधकामांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी समोर येतांंना चक्क गार्डनच्या आरक्षणावर एका बांधकाम व्यवसायिकाने सात मजली इमारती उभी केल्याने प्रशासनावर स्थानिक नागरिकांकडून जोरदार टिका केली जात आहे.

डोंबिवली पश्चिम रेतीबंदर रोडला असलेल्या गावदेवी मंदिर ते सत्यवान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिराजवळ एक सात मजली इमारत नुकताच बांधकाम झाल्याचे दिसुन येते. एका जागृक नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीप्रमाणे सदर इमारत ज्या ठिकाणी उभी आहे ती जागा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गार्डनसाठी आरक्षित जागा आहे. त्यामुळे आरक्षणाच्या जागेवर रहिवाश्यांसाठी गार्डन तैयार करण्याऐवजी खाजगी बांधकाम व्यवसायिकाने सात मजली अनधिकृत्त इमारतच उभी केल्याचे दिसुन येते. याबाबत सदर तक्रारदाराने थेट मंत्रालयात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के एच गोविंदराज, पालिकेचे नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दीक्षा सावंत, ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना तक्रार अर्ज दाखल करत अनधिकृत्त बाँधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर घटनेबाबत शहरात चर्चा झाल्यानंतर ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मिडियाशी बोलतांना देवीचापाडा गावदेवी मंदिराजवळ उभारलेल्या बेकायदा इमारतीबाबत माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे दिवसाढवळ्या जेव्हा डोंबिवली देवीचापाडा गावदेवी मंदिराजवळ सात मजली  इमारतीचे बांधकाम सुरु होते त्यावेळेस पालिके प्रशासनाला याबाबत कोणतीही कल्पना का आली नाही असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे सदर अनधिकृत्त इमारतीला रेरा अंतर्गत सर्टिफिकेट मिळण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाने खोटे कागदपत्र देखील सादर करुन फ्लैट विक्रीसाठी रिराचे सर्टिफिकेट मिळवल्याचे तक्रारदाराकडून समजल्याने याद्वारे फ्लैट घेणार्या ग्राहकांची देखील आर्थिक फसवणुकीचा गुन्हा बांधकाम व्यवसायिकाविरोधात दाखल होऊ शकते. 

देवीचा पाडा येथील अनधिकृत्त इमारतीप्रमाणेच इतर ही जागी अश्या अनधिकृत्त इमारती उभ्या असुन फ्लैटची विक्री बांधकाम व्यवसायामार्फत सुरु असल्याने डोंबिवलीत फ्लैट विकत घेतांना ग्राहकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...