बदलापुरकरांची मागणी
बदलापुर (महेश कामत)- नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र विकास मिडियाने म्हस्कर प्रकरणाची बातमी प्रकाशित केली. त्यानंतर आता दोन्ही पक्षात सेटलमेंट करवणार्या त्या दलाल पोलिस अधिकार्याची बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यातुन हकालपट्टी करण्याची आता मागणी जोरधरत आहे.
307 चा गुन्हा ज्यामध्ये रॉड आणि तल्वारीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न शहरात घडत असलेल्या गंभिर गुन्ह्यात बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याकडुन ज्याप्रकारे तपासात दिरंगाई व कामचुकारपणा दिसुन आले त्यामुळे म्हस्कर प्रकरणात जो तपास अधिकारी आहे तो एखादा पोलिस नाही तर दलालाची भुमिका बजावत असल्याचे दिसुन आले. फिर्यादी आणि पिडीतेची वेळीच जबाब नोंदविणे पोलिसांचा प्रोटोकॉल असतांना सुद्धा अनेक दिवस उलटुनही जबाब नोंदविला जात नाही त्यातच मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्तीसमोर अतिशय निर्लज्ज सारखं बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याचा अधिकारी जाधव म्हणतो दोघांमध्ये सेटलमेंट झाली आहे हे कागद घ्या. त्यामुळे बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी पोलिस कमी आणि सेटलमेंट करणारे दल्ले जास्त अशी चर्चा आहे.
बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी तातडीने अश्या दल्लेगिरी करणार्या पोलिस अधिकार्याची निलंबन करावी अशी मागणी आता जोर धरत असुन व.पो.नि. लांडगे नियमांचे पालन करतात कि दलाल पोलिसाची पाठराखण करतात यावरच आता सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.बदलापुर विकास मिडीयाने संपुर्ण बदलापुर पश्चिम क्षेत्रात आवाहन केले आहे कि, ज्या कोणास जर बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या दलालरुपी भ्रष्ट पोलिसांकडुन त्रास होत असेल त्यांनी थेट badlapurvikas@gmail.com वर आपली तक्रार द्यावी. पिडीतेचे नाव गोपनिय ठेऊन त्या दलाल आणि भ्रष्ट पोलिसांना वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र विकास मिडिया पुढाकार घेणार.



