अंबरनाथ व मोहने येथील काही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

Date:

अंबरनाथ (बदलापुर विकास मिडिया)- महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ अतिउच्च दाब वाहिनीवर तातडीचे दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे शुक्रवारी, १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंबरनाथ आणि मोहने परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. महापारेषणने सांगितले आहे की, सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान तुटलेल्या इन्सुलेटर स्ट्रिंगची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामामुळे अंबरनाथ १०० केव्ही आणि मोहने १०० केव्ही उपकेंद्रावर आधारित काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

अंबरनाथ १०० केव्ही उपकेंद्रावरील चिखलोली, सर्वोदय नगर, वसद, जांभुळ, आंबेशिव, वडवली, लादी नाका, गणेश चौक, बुवापाडा, संघटन चौक, फॉरेस्ट नाका, हेंद्रेपाडा, बाजारपेठ, एरंजाड गाव, सोनिवली, बारवी डॅम, बदलापूर गाव, दत्तनगर, सिद्धार्थनगर, बेलवली, सुभाषनगर, पोखरकर नगर, शांतीनगर, विद्यापीठ रोड, पवार सेक्शन, चिखलोली पाडा, गणेश घाट, कात्रप गाव, मोहन हायलँड, आयटीआय, एमजेपी, केमिकल एमआयडीसी, उल्हासनगर-४, अंबरनाथ पूर्व, कानसई गाव, भिडेवाडी, नवरेनगर, म्हाडा लोकनगरी, कैलासनगर, महालक्ष्मी नगर, शिरगाव या भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ८ ते १० दरम्यान बाधित होणार आहे.

तसेच, मोहने १०० केव्ही उपकेंद्रावर आधारित गोवेली, सी ब्लॉक, उल्हासनगर कँप-१ आणि कँप-२, एमआयडीसी वॉटर वर्क्स, उल्हासनगर पाणीपुरवठा, शहाड, मोहने, अटाळी, गाळेगाव, मांडा, आंबिवली या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

महावितरणने सर्व ग्राहकांना याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...