बदलापुर (महेश कामत)- चौथी मुंबई म्हणुन ज्या शहराला ओळखले जाते त्या बदलापुर शहरातील रेल्वे प्रवाशांची अनेक समस्या अद्याप जैसे थे अवस्थेत असल्याने बदलापुर रेल्वे प्रवाशांना वाली कोण अशी शहरात चर्चा सुरु आहे.
बदलापुर रेल्वे स्थानकातुन दररोज लाखो प्रवाशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व कल्याण तसेच कर्जत आणि पुण्याला कामाला जाण्यासाठी प्रवास करतात. रेल्वे प्रवास करतांना अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. नुकताच बदलापुरातील जागृक नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत शहरातील भ्रष्ट पोलिसांविषयी आक्रोष व्यक्त केले होते. त्याच्या दुसर्या दिवशी बदलापुर रेल्वे प्रवाशांच्या संघटनेमार्फत हाताला काळी फित बांधुन रेल्वे प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध देखील करण्यात आला, परंतु रेल्वे प्रशासनाला अद्याप प्रवाशांची समस्यांबाबत चिंता दिसत नसल्याचे समजते.
सकाळी कामाच्या वेळी उशिराने रेल्वे येणे, अनेक रेल्वेत साफसफाई नसणे, बदलापुर स्थानकातील एलिव्हेटर नियमित पणे न चालणे, अनेक जलद गतीच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करणे अश्या अनेक मागणी आजवर बदलापुर रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे परंतु अद्याप त्यांच्या कोणत्याही मागणीला हिरवा कंदील रेल्वे प्रवाशांकडून दाखविण्यात आलेले नाही.
विशेष म्हणजे मागील अनेक वर्ष याच रेल्वे प्रवाशांना राजकिय फायद्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी स्थानिक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात मोठमोठे आश्वासन देत होते निवडणुक संपली आणि राजकारणी गायब परंतु रेल्वे प्रवाशांची समस्या मात्र जैसे थे अवस्थेत असल्याने आता बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना वाली कोण याबाबत चर्चा सुरु आहे.
विशेष म्हणजे बदलापुर रेल्वे स्थानकातुन रात्री सुटणार्या रेल्वेत महिला पोलिस देखील नसल्याने महिलांना देेखील रेल्वेतुन प्रवास करतांना भिती वाटत आहे.
नुकताच बदलापुर रेल्वे स्थानकाजवळ एका माथेफिरुने गोळीबार ही केले परंतु त्यानंतर सुद्धा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासनाला जाग आलेले नाही असेच बदलापुरातील अनेक रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे.



