महाराष्ट्रात तरुणांना अश्लिलतेच्या दिशेने पाठवण्यास इन्फ्लुएंसर ही तितकेज जबाबदार…
धुळे (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच नृत्यांगण गौतमी पाटील हिने बदलापुर शहरात व महाराष्ट्र राज्यात घडणार्या अल्पवयीन मुलींवरील व महिलांवरील बलात्काराच्या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गौतमी पाटील हिने पुरुषांना उद्देशुन म्हणतात कि ‘कृपया करुन असले कृत्य करु नका, प्रत्येकाच्या घरात मुली आहेत त्यांच्या आई वडिलांना काय वाटेल, एखाद्याच्या जीवावर काय बेदते ही ती पोरगीच सांगु शकते. सगळ्यांना मी विनंती करते की असे काही करु नका.’ तसेच पाटील पुढे असेही महिलांना व लहान मुलींना उद्देशुन आवाहन करते कि, ‘काळजी घ्या, बाहेर पडतांना, क्लासला जातांना, कॉलेज शाळा काही असुदे कॉलेज करा घरी या, दुसरीकडे कोणाकडे लक्ष देऊ नका आणि कोणाचं ऐकु नका.’
पाटील हिने ज्या तळतळीने महिलांना आवाहन केले आहे त्याबद्दल तिचे कौतुक आहे परंतु त्याच सोबत गौतमी पाटील हिने ज्या नव्या पद्धतीच्या नृत्यांगण देखील अश्या घटनांना कारणीभुत आहेत हे तिने आत्मचिंतन करायला हवे अशी प्रतिक्रिया आता धुळे जिल्ह्यातील महिलांकडून होत आहे.
1996 साली 4 फेब्रुवारी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात गौतमी हिचा जन्म झाला. गौतमी पाटील हिने अत्यंत हालाकीच्या परिस्थित आपले बालपण जगत जिद्दीने स्वतःचे आयुष्य आज घडवले. विशेष म्हणजे त्यांचे वडिल हे दारुच्या व्यसनी असल्यामुळे घरातुन सहकार्य नसतांना सुद्धा तीने आज स्वतःची ओळख केली त्याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमी आहे परंतु त्याच सोबड आयुष्य घडवण्यासाठी आणि इन्फ्लुएंसर होण्यासाठी जो मार्घ गौतमी पाटील हिने निवडला तो वादग्रस्त आहे. टिकटॉक फेम आणि महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या मनात राज करणार्या गौतमी पाटील हिने केलेले नृत्य हे सेडक्शन आणि लाजवेल असे आहे. विशेष म्हणजे अनेक माध्यमांशी बोलतांना गौतमी स्वतः याबाबत स्विकारते सुद्धा की ती ज्याप्रकारे नृत्य करते ते महाराष्ट्राची लावणी नसुन न्यु नजरेशनचे नृत्य आहे.
गौतमी पाटील आज फक्त धुळ्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्यात तिच्या नृत्यामुळे प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ती अत्यंत लोकप्रिय आहे. हे तेच तरुण आहेत ज्यांचे आजवर लग्न होत नाही आणि झालेले लग्न ही विविध कारणांनी तुटत आहे. हे तेच तरुण आहे ज्यातील काही तरुण गौतमीचा नृत्य पाहुन महिलांना महिला समजण्याऐवजी मटेरिअर समजतात आणि मग घडतो तो गंभिर प्रकारांचा गुन्हा आणि घटना.
आज महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे अनेक घटनांमध्ये आरोपी हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, नेत्याचा मुलगा किंवा नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे ही आजवर दिसुन आले. त्यामुळे अश्या तरुणांना बलात्कार करणे व विनयभंग करण्याची इच्छा का झाली असेल यावरच विशेष तर चर्चा करणे आणि उपाय काढणे योग्य आहे. अजुन किती काळ आपण घरातील मुलींचे रक्षण करायचे जेव्हा बाहेर सर्वत्र अश्लिलता पसरविण्याचे काम गौतमी पाटील व त्यांच्या सारख्या लाखो सोशल मिडिया इन्फ्लुएंसर बिंधास्तपणे करतांना दिसत आहेत.
सोशल मिडियावर लाईक मिळावी, चाहत्यांनी पोस्ट शेअर करावी, फोलोअर्स वाढतील, भविष्यात स्पोंसर्स मिळतील, चर्चेत राहु हा अश्या कारणांमुळे आजहा महाराष्ट्र आणि भारताची तरुण पिढी सोशल मिडियाचा फलताच वापर करतांना दिसत आहे. ह्या नटीला इतके लाईक्स मिळाले मला मिळाले नाही म्हणुन जरा जास्त स्वतःच्या शरिराला एक्सोस करण्याच्या नादात आपण शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कशाप्रकारे सॉफ्ट पॉर्न पसरवत आहोत हे अद्याप लाखो तरुणांना समजतच नाही.
गौतमी पाटील आज ज्याप्रकारे आवाहन करत आहेत व त्यांना राज्यातील बलात्काराच्या घडनेत झालेली वाढ पाहुन दुख होत आहे त्याचवेळी त्यांनी आपल्या नृत्याला पाहुन किती तरुणांच्या डोक्यात अश्लिलता वाढत आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. दहीहंडी असो किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम एखाद्या पक्षाचा नेता आज तरुणांना आकर्शित करण्यासाठी ज्याप्रकारे अश्या इन्फ्लुएंसर्सचा वापर करत आहे ह्यामुळे भविष्यात बलात्कार आणि विनयभंगच्या घडनेत वाढ होणार हे म्हणायला ज्योतिषाची गरज नाही. गौतमी पाटील हिने आजवर ज्याप्रकारे सेड्युस करण्यासारखे अश्लिल हावभाव करत नृत्य प्रदर्शित केले आहे त्या व्हिडीओला पाहुन त्या शब्दांत सांगतांनाही लेखिकेला लाज वाटत आहे.
लावणी (मराठी: लावणी) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय संगीताचे एक प्रकार आहे. लावणी ही पारंपारिक गीत आणि नृत्य यांचा संगम आहे, जी विशेषत: ढोलकी या तालवाद्याच्या ठेक्यावर सादर केली जाते. लावणी तिच्या जोशपूर्ण तालासाठी प्रसिद्ध आहे. लावणीने मराठी लोकनाट्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागात ती स्त्री कलाकारांद्वारे सादर केली जाते, ज्यांनी नववारी साडी (जी लुगडे साडी म्हणून ओळखली जाते) नेसलेली असते. लावणीची गाणी जलद गतीत गायली जातात. परंतु नव्या भारतातील लावणीत ज्याप्रकारे गौतमी पाटील व इतर कलाकारांनी अश्लिलता दाखवण्यास काही वर्षांपासुन सुरुवात केली आहे त्यामुळे लाईक शेअर आणि प्रसिद्धी जरी अश्यांना मिळत असले तरी समाजाचा तरुण वर्ग कोणत्या दिशेला जात आहे हे राज्यात आणि देशात घडणार्या विविध बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांनी अंदाज लावता येईल.
गौतमी पाटील किंवा भारताचे इतर नागरिक प्रत्येकाला घटनेले अधिकार दिले आहे स्वातंत्र्याची आणि मनाप्रमाणे वागण्याची परंतु मग जर मनाप्रमाणे अश्लिल नृत्यच करायचे असेल तर मग बलात्काराच्या घटना घडल्यानंतर किमान पिडीत मुलींच्या आईंना सल्ला तरी द्यायला नको, कारण असे करुन तळमळ नाही तर हिपोक्रिसी दिसुन येते, दुसरे काही नाही…
(लेखक एक महिला असुन नाव गुप्त ठेण्यात आले आहे. तरी या लेखाची संपुर्ण जबाबदारी बदलापुर विकास मिडियाची राहील याची नोंद घ्यावी.)