बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- देशात आणि महाराष्ट्र राज्यात सध्या सत्तेत असलेले काय काय नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतील हे आजवर अनेकांनी पाहिले मग ते महाराष्ट्र पोलिस खात्याचे एफआयआर प्रकाशित करणारे वेबसाईट असो किंवा पालिका आणि मंत्रालयातील वेबसाईट असो, लेखा विभागाच्या वेबसाईट असो किंवा जिल्हा परिषदेच्या वेबसाईट. या अश्या अनेक शासकिय वेबसाईटवरुन महत्वाची माहिती जे नागरिकांना मिळणे अपेक्षित असतात ते गायब होतांना आजवर जनतेले पाहिले. परंतु आता कोर्टाच्या वेबसाईट आणि मानवाधिकार संस्थेच्या वेबसाईट मधील एक प्रकार उघडकीस आल्याने सत्ताधारी आणि गुंडशाही काय काय नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करते याची चिंता आता जनतेला सतावत आहे.
मुरबाड विधानसभा क्षेत्रातील बदलापुर शहरात एक समाजसेवक व आर.टी.आय. कार्यकर्ते ज्यांचे नाव कै. अरुण सावंत ते मागील अनेक वर्ष शहरात राहत होते. त्यांनी माहितीचा अधिकार याचा उपयोग करुन अनेक भ्रष्टाचार आणि चुकीचे काम करणार्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय ते सुप्रिम कोर्टापर्यंत विषय नेत अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले. परंतु हे अश्या प्रकारे गुन्हेगारांवर कारवाई होणेसाठी सावंत यांनी जे काय प्रयत्न केले त्या बदल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार करत त्यांना जखमी केले ज्यामध्ये त्यांच्या मणक्याला दुकापत झाल्याने आयुष्यातील शेवटचे काही वर्ष ते पुर्णतः अपंगत्वाने होते. या अश्या प्रसंगात ही त्यांनी अनेक भ्रष्टाचार्यां विरोधात कोर्टात लढा ते देत राहिले. शेवटी या सगळ्या त्रासांनी व झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यु झाला.
कै. अरुण सावंत यांनी ज्याप्रकारे प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी एक एक विषय हाती घेत न्याय मिळवुन देण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता व त्यामुळे त्यांच्यावर जो हल्ला झाला आणि स्थानिक लाचार बदलापुर पश्चिम आणि पुर्व पोलिस प्रशासनाने प्रामाणिकपणे तपास कार्य केले नाही याबाबत महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या ते निदर्शनास आले. त्यामुळेच महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेने पिडीत अरुण सावंत यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून तातडीने 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य शासनाने सदर नुकसान भरपाई पिडीतेच्या परिवाराला दिले किंवा नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
महत्वाचे म्हणजे अरुण सावंत यांनी जे काही केसेस आरोपींविरोधात केले होते त्या केसेसचा निकाल मुंबई उच्च न्याायलयाच्या वेबसाईटवर सध्या दिसतच नाही अर्थातच कोणीतरी गायब केल्याचे समजते. सदर केसेसचा निकाल हा अत्यंत महत्वाचा असुन त्या केसचा संदर्भ घेत संपुर्ण भारतात अनेक केस लढविण्यात आले त्यामुळे सदर महत्वाचा केस मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अचानक कसे काय गायब होते याबाबत बदलापुर शहरातील तसेच मुरबाड विधानसभा क्षेत्रातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयासह महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटनेने देखील त्यांनी कै. सावंत बाबत दिलेला निकाल वेबसाईटवर दिसत नसल्याने सध्या महाराष्ट्रात अश्या मोठमोठ्या संस्थांना कोणी नियंत्रण करण्याचं तर प्रयत्न करत नाही असा सवाल आता राज्यातील जनतेला पडला आहे.
महाराष्ट्राचा एक व्यक्ति जो प्रामाणिकपणे आपल्या जीवाची परवा न करता अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढतो आणि नंतर जीव गवातो अश्या कर्तुत्ववान व्यक्तिच्या निकालाची कॉपीच जर कोर्ट आणि मानवाधिकार संघटनेच्या वेबसाईटवरुन गायब होत असेल याहुन मोठी महाराष्ट्रात काय शोकांतीला असेल असा सवाल महाराष्ट्र विकास मिडिया यांचे मत आहे.
याबाबत पारदर्शक महाराष्ट्र संघटनेने दोन्ही संस्थांना तातडीने निकाल पुन्हा वेबसाईटवर दिसावे अशी मागणी केली असुन याबाबत आता मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटना काय निर्णय घेते यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.