पोलिस अधिकारी शितोळे यांच्यावर बडतर्फीचा निर्णय का नाही? 

Date:

बदलापुरातील प्रकरणामुळे लाचार पोलिस अधिकारी शितोळे यांचा खरा चेहरा उघडकीस

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षिका श्रीमती. सुभदा शितोळे यांचा शासकिय कामात होत असलेली लाचारी नुकताच घडलेल्या दोन गंभीर घटनांमुले जनतेसमोर उघडकीस आले. अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरण आणि महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरण दोन्ही प्रकरणात ज्याप्रकारे श्रीमती. सुभदा यांनी पोलिस म्हणुन आपली भुमिका बजावण्याऐवजी सत्तेच्या दलाल म्हणुन सेटलमेंट करण्याची भुमिका बजावल्याने बदलापुर शहरातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील पोलिस प्रशासनाच्या अब्रुचे ढिंडवते निघाले. परंतु एवढं झाल्यानंतर सुद्दा अद्याप शितोळे यांना शासकीय कामातुन बडतर्फ करण्यात येत नसल्याने महाराष्ट्र पोलिस खात्यात चाललय तरी काय अशी म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे.

पोलिस अधिकारी शितोळे यांच्यावर शिंदे गटातील लोकप्रतिनिधी म्हात्रे या विनयभंगाच्या आरोपीला वाचवण्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे. विशेष म्हणजे हे फक्त आरोपच नाही तर कोर्टात दाखल असलेल्या विविध पुराव्यावरुन सिद्ध ही होत आहे. महाराष्ट्र राज्यात असलेल्या शिंदे सरकारला धक्का बसु नये म्हणुन बदलापुरातील विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्हे नोंदविण्यास पोलिस प्रशासनाने दिरंगाई करत तक्रारदाराला मानसिक त्रास देत आरोपीला छुपा पाठिंबा दिला. त्यात एक नाही तर अनेक घटनांमध्ये पोलिस प्रशासनच आरोपीला पाठिशी घालत असल्याचे दिसुन आले. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत विशेष नोंद केले असले तरी महाराष्ट्र पोलिस खात्याला अद्याप अश्या अधिकार्याची हकालपट्टी करण्याबाबत सुचले नाही हे विशेष. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 चे सुधाकर पठारे या वरिष्ठ अधिकार्यांनी अद्याप सुभदा शितोळे बाबत रिपोर्ट तैयार करत बडतर्फी सारखी कोणतीच कारवाई न केल्याने लाचार पोलिस अधिकार्याला वाचवण्यासाठी कोणती राजकिय शक्ती आहे की काय असा प्रश्न आता सामान्यांकडून केला जात आहे.

एक महिला पोलिस अधिकारी त्या देखील वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत असतांना जेव्हा फिर्यादी महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात आणि आरोपीसोबत सेटलमेंट करण्याचे सल्ले देतात अश्यांना शासकिय नोकरीत ठेऊन आणि बदलापुर हुन दुसर्या ठिकाणी बदली करुन काय बदल घडणार आहे? बदलापुराची घाण मुंबईत नेऊन पोलिस प्रशासनातील लाचार कारभार थांबणार आहे का? जर योग्य वेळीच अश्या लाचार आणि भ्रष्ट पोलिस अधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई झाली नाही तर भविष्यात पोलिस प्रेटोकलचे उल्लंघन करण्यास तसेच फिर्यादीचा हक्ककायदा पायदळी तुडवण्यास पोलिस अधिकारी आजिबात घाबरणार नाही त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे असे मत बदलापुरातील जनता बदलापुर विकास मिडियाजवळ व्यक्त करत आहेत.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...