शिंदे सरकारच्या काळात पोलिसांच्या बदल्यांच्या ‘स्मार्ट डील योजना‘
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुर येथील विविध पोलिस ठाणे ज्या पोलिस उपायुक्तांच्या अखत्यारीत येते ते म्हणजे सुधाकर पाठारे. नुकताच त्यांची बदलीचे अध्यादेश महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे करण्यात आले होते परंतु शिंदे सरकारच्या स्मार्ट डील योजनेत ते सहभागी झाले आणि बदली थांबली यामुळे आता शिंदे सरकारच्या खालातील पोलिसांच्या बदल्या आणि त्यातील स्मार्ट डील योजनेबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे.
उल्हानगर परिमंडळ 4 ज्याठिकाणी शिंदे गटातील विविध कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी राजकिय शक्तीचा फायदा घेत शहरात दहशतीचे वातावरण पसरवतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात वेळोवेळी परिमंडळ 4 चे उपायुक्त आणि त्यांच्या अखत्यारीत असलेले सर्वच पोलिस ठाणे अकार्यक्षम असल्याचे अनेकदा दिसुन आले. साक्षीदाराचा अपहरण होणार, महिला पत्रकाराचा विनयभंग होणार अश्या अनेक घटना ज्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे लिंक कुठे ना कुठे मिळते त्यामुळेच अश्यांवर कधीच पोलिसांमार्फत कारवाई होतांना दिसत नाही.
नुकताच परिमंडळ 4 चे उपायुक्त सुधारक पाठारे यांची सातारा जिल्ह्यातील अधिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली होते म्हजेच काय तर परिमंडळ 4 येथुन त्यांची उचलबांगडी होत असतांनाच पाठारे यांना उल्हासनगरात असे काय मन लागले कि त्यांच्या बदलीचे आदेश शासनाने स्थगित केले. विशेष म्हणजे याच परिमंडळ 4 मध्ये मागील काही महिन्यांपासुन थायलैंड वरुन आलेल्या माफियाने वेश्याव्यवसाय सुरु केले आहे परंतु परिमंडळ 4 च्या पोलिस खात्याला ते देखील बंद करता आले नाही, त्यामुळे पाठारे यांना उल्हानगर शहरात कशामुळे मन लागतं हे आता संशोधनाचा विषय आहे.
उपायुक्त पाठारे यांच्या कारकीर्दीत अनेक पोलिसांनी कामचुकार पद्दतीने पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन करत नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटनेकडे आल्याने मानवाधिकार संघटनेकडून पाठारे यांना समंस देखील देण्यात आले परंतु असे सर्व असतांना पुन्हा अश्या अकार्यक्षम पोलिस अधिकार्याला त्याच पदावर ठेवण्यासाठी शिंदे सरकार एवढी का उत्सुक आहे असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे.
पोलिस उपायुक्त पाठारे प्रमाणेच इतर ही काही पोलिस अधिकार्यांची बदलीच्या आदेशावर स्थगिती मिळाल्याचे समजते.



