उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- आज दि. 6 सप्टेंबर रोजी उल्हासनगर या ठिकाणी उल्हासनगर वाहतुक पोलिस शाखेतील दोन कर्मचार्यांना काही रिक्षाचालकांनी मारहाण केली. विशेष म्हणजे वाहतुक पोलिसांच्या गुंडगिरीने कंटाळुन सामान्य नागरिकांनी कायदा हातात घेतल्याचे दिसुन आले.
उल्हासनगर येथील वाहतुक पोलिसांची गुंडगिरी काय जनतेपासुन आजवर लपलेली नाही, विनाकारण रहदार्यांना शिवीगाळ करणे, फेरीवाल्यांकडून फुकटचं भाजीपाला घेणे आणि न दिल्यास हातगाडी उचलणे, रिक्षावाल्यांना थांबवुन 50-100 चिरीमिरी मागुन लाचखोरी करणे तसेच एखाद्यावर अन्याय होत असेल म्हणुन सामान्याने आवाज उठवता तर त्याच्या कानाखाली मारण्यासारखे अनेक प्रकार आजवर उल्हासनगर वाहतुक शाखेतील काही पोलिसांनी केले. अगदी त्याचप्रमाणे आजही वाहतुक शाखेच्या एका पोलिसाने चेकींच्या नावाखाली एका रिक्षाचालकाला थांबविले असता पोलिसांप्रमाणे सदर रिक्षाचालक हा दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. अर्थाच अश्या रिक्षा चालकावर कारवाई झाली पाहिजे परंतु योग्य कारवाई करण्याऐवजी उल्हासनगर वाहतुक पोलिस ज्याप्रकारे कारवाईचा देखावा करुन लाचखोरी करते हे दिसुन आले. सर्वप्रथम ज्यावेळेस वाहतुक शाखेच्या पोलिसांना सदर रिक्षाचालक दारुच्या नशेत आहे हे समजल्यावर तातडीने स्थानिक पोलिस बिट मार्शलला माहिती देत रिक्षाचालकाला बेड्या थोकुन मेडिकल करायला हवे होते त्याऐवजी त्याच रिक्षाचालकाला त्याच रिक्षाच्या मागे बसवुन वाहतुक पोलिस कर्मचारी रिक्षा चालवत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर देखील रिक्षावर कारवाई आणि त्यावेळी चालकावर ही नियमाप्रमाणे कारवाई करण्याऐवजी ज्याप्रकारचा सेटलमेंटचचा व्यवहार सुरु होता त्यामध्ये दोन्ही पक्षात वाद निर्माण होत तसेच पोलिसाने दारुच्या नशेत असलेल्या रिक्षा चालकाला मारहाण केल्याने त्याठिकाणातील इतर रिक्षा चालकांमध्येही संताप व्यक्त करत त्या पोलिसवाल्याला चोप देण्यात आला. विशेष म्हणजे जेव्हा एक सामान्य नागरिक रोजच्या अन्यायाला कंटाळुन कायदा हातात घेतो आणि एका पोलिस कर्मचाराच्या कानाकाली वाजवतो तातडीने दुसरा पोलिसवाला जो व्हिडीओ शुटिंग करत होता बचाव करण्याऐवजी तो देखील मारहाण करण्यास सुरुवात करत असुन असल्या गुंडरुपी वाहतुक पोलिसांना शासकीय नोकरीत भरती कसे काय करण्यात येते असा प्रश्न आता जागृक नागरिक विचारत आहेत.
नियमाप्रमाणे जर पोलिसांनी कारवाई केली असती तर अश्या प्रकारची घटना घडत नाही परंतु लाचेची अपेक्षा असलेल्या लाचार पोलिसांना जेव्हा प्रोटोकॉल पाळावेसे वाटत नाही तेव्हा अश्या घटना घडतात.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहतुक पोलिसाने आधि त्या व्यक्तिवर हात उगारला ज्यामुळे सदर रिक्षाचालकाने प्रतिउत्तर म्हणुन गुंडगिरी करणार्या त्या पोलिस कर्मचार्याला चोप दिले.
सामान्य नागरिकांनी कायदा हातात घेणे चुकीचे परंतु त्याचवेळी नियमांचे उल्लंघन करुन शहरात दहशत पसरवणार्या उल्हासनगर वाहतुक पोलिस खात्यातील भ्रष्ट पोलिसांवर ही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता उल्हासनगरातील नागरिक करत आहेत.



