फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेचे क्षेत्र फेरीवाला पथकप्रमुख अरुण म्हात्रे निलंबित

Date:

कल्याण (बदलापुर विकास मिडिया)- मागील अनेक वर्षांपासुन कल्याण रेल्वे स्थानक नजीकच्या परिसरातील फेरीवाल्यांचा रहदार्यांना तसेच वाहन चालकांना भरपुर त्रात होते होते. वारंवार नागरिकांकडून पालिकेत तक्रार करुन सुद्धा अधिकार्यांकडून कारवाई होतांना दिसले नाही. त्यामुळे अतिक्रमाचा हा विषय पालिकेच्या आयुक्ता डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः लक्ष देत कारवाई करण्यात कसूर केल्याबाबत 3/क प्रभाग क्षेत्र फेरीवाला पथकप्रमुख अरुण म्हात्रे या कर्मचारीला सेवेतून निलंबन केले आहे.
गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनधिकृत्त फेरीवाल्यांवर कारवाई होऊ नये म्हणुन प्रत्येक फेरीवाल्याकडुन पालिकेचे काही कर्मचारी 100-200 दिवसाला लाच घेत असल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात येत नव्हते असे समजते.
माननिय न्यायालयाच्या निर्देशानुसार व महापालिकेच्या धोरणानुसार रेल्वे स्टेशन पासुन 150 मी. परिसरात फेरीवाल्यांना बसण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक या परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्त्यांवर व्यवसाय करताना आढळून आल्याने पालिकेतील अतिक्रमण कर्मचारी त्यांच्या कामात कसुर केल्याने व फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई न केल्याने सदर निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त जाखड यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
याबाबत फेरीवाला पथकप्रमुख अरुण म्हात्रे यांना यासंदर्भात वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावुन खुलासा देखील मागविण्या आला होता. मात्र त्यांनी सदर परिसर फेरीवाला मुक्त न ठेवल्याने व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचे समजते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...