बदलापुर रेल्वे पोलिसांनी केली आऱोपीला अटक
बदलापुर (महेश कामत) – गुंडशाही, विनयभंग आणि राजकारण्यांच्या अरेरावीने आधिच बदनाम झालेले बदलापुर शहरात आज 5 सप्टेंबर रोजी किरकोळ वादावरुन गोळीबारची घटना घडली. सदर प्रकार बदलापुर रेल्वे स्थानकाजवळ घडली असुन गोळीबार केल्यानंतर आरोपी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढतांना रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
बदलापुर रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळच्या सुमारास चार मित्रांमध्ये पैश्यांच्या किरकोळ वादावरुन वाद सुरु झाले. त्यात विकास पगारे या तरुणाने शंकर संसारे याच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये पाया गोळी लागुन तो जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करत पिस्तुल ही जप्त केल्याचे समजते. पुढील तपास बदलापुर रेल्वे पोलिस करत आहेत.
गोळीबार प्रकरणानंतर आता बदलापुर शहराचे नाव पुन्हा बदनाम होत असुन शहरातीत अश्या तरुणांप्रमाणे अजुन किती लोकांकडून पुस्तुल बाळगल्या जातात, ह्या पिस्तुल कुठुन येतात तसेच देशात आणि महाराष्ट्रात भाजपच्या सरकारनंतर गुन्हेगारीत वाढ अश्या विषयांवर जोरदार चर्चा सुरु आहे. सुसंस्कृत आणि निर्सगरम्य अशी ज्या शहराची ओळख होती त्या बदलापुर शहराला आज गुन्हेगारीचे शहर म्हणुन नवी ओळख मिळत असल्याने स्थानिक पोलिस प्रशासन तसेच उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त शहरातील वाढत्या गंभिर घटनांना कारणीभुत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



