सरेंडर करणार्या आरोपीला पकडल्याचा खोटा दावा करत शिंदे सरकार करत आहे जनतेची फसवणुक

Date:

महाराष्ट्र पोलिस खात्याचा चुकीच्या कारभाराला लगाम कधी बसणार

कल्याण (बदलापुर विकास मिडिया)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणार्या आणि पुतळा पडल्यामुळे लाखो शिवभक्तांचे मन दुखावणार्या जयदीप आपटे यांच्या अटकेवरुन आता सत्ताधारी नविन राजकारण करायला सुरुवात करत आहे. आरोपी आपटे याच्या वकिलाप्रमाणे जयदिप आपटे याने स्वतःहुन कल्याण येथील पोलिसांकडे सरेंडर केले असता एफ.आय.आर. मध्ये पोलिसांनी अंधारात येऊन आपटेला पकडले असल्या खोट्या माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे आता शिंदे सरकार आणि महाराष्ट्र पोलिस खातं अजुन किती काळ जनतेची अश्या प्रकारची फसवणुक करणार असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनता विचारत आहेत.

एकतर मागील अनेक दिवस पोलिसांच्या हाताला आपटे लागत नव्हता म्हणुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यभरात महाराष्ट्र पोलिस खात्याचे हसु होत होते त्यातच जेव्हा आरोपी सरेंडर करतो तेव्हा सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे त्याबाबत नोंदणी करण्याऐवजी त्यातही खोटं लिहत असल्याने असल्या सरकारकडुन पुढे अजुन काय काय दिसणार आहे? ही चिंता अनेकांच्या मनात आहे. पोलिस प्रशासनाचा नेटवर्क जर इतकाच मजबुत होते मग इतके दिवस आपटे फरार राहण्यास कशी काय मदत मिळाले? मालवण, सिंधुदुर्ग, ठाणे आणि कल्याण येथे प्रवास आरोपी प्रवास करतो आणि अनेक दिवस पोलिसांच्या हाती आरोपी लागत नाही ही पोलिस प्रशासनाची निष्क्रियता नाही का? 

एका ज्येष्ठ वकिलाने याबाबत बदलापुर विकास शी बोलतांना सांगितले कि, पोलिस प्रशासन ज्याप्रकारे आता सरेंडर ला अटक दाखवण्याचा प्रकार करत हे ते जानुन बुजुन केला जातो कारण त्यामुळे आरोपीलाच जामिन मिळण्यास हाईकोर्टात आणि नंतर सुप्रिम कोर्टात मदत मिळते. आरोपीने जर एखादा मोबाईल बाळगले असल्यास त्याचा सी.डी.आर. आणि अटक करणार्या पोलिसांचा सी.डी.आर. तपासले तरी देखील स्पष्टपणे दिसेल कि सरेंडर कि पोलिसांकडून अटक.

ह्या सगळ्या घटनेनंतर आता राज्यस्तरावरच नव्हे तर संपुर्ण भारत देशात महाराष्ट्र पोलिस खात्याचे कारस्थान उघड्यावर येत असल्याने राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने देखील पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...