बदलापुरातील आंदोलन प्रकरण ; पोलिसांचा लॉंग मार्चचा ड्रामा आणि खरी लायकी…

Date:

बदलापुर (महेश कामत)- अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, त्या घटनेतील भाजप लिंक असलेल्या बलात्कारी आरोपी आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी म्हणुन पोलिस सुरुवातीला पिडीतेच्या आईची तक्रार घेत नाही. महिला पत्रकाराचा अपमान केला जातो एका राजकिय नेत्यामार्फत तरीही देखील या दुसर्या घटनेत ही सुरुवातीला पोलिस प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळेच सामान्य बदलापुरकरांमध्ये आक्रोश निर्माण झाले व आंदोलन करण्यात आले ज्यामुळे रेल्व रोको आंदोलन केल्यानंतर केंद्रापर्यंत राजकिय नेते आणि वरिष्ठ पोलिस खडबडुन जागे झाले. स्थानिक पातळीवरील अकार्य़क्षम पोलिसांच्या लाचारीमुळेच नागरिकांच्या संताप आणि आंदोलन घडले. 

ह्या सगळ्या घटनेतुन पोलिस प्रशासनाने आत्मचिंतन करण्याऐवजी त्याच शहरातील नागरिकांना भविष्यात आंदोलन करु नये म्हणुन दहशत पसरवण्याचा पुरेपुर प्रयत्न केले. दि. 24 ऑगस्ट रोजी बदलापुर रेल्वे स्थानकात 100 हुन अधिक पोलिसांनी लॉंग मार्च चा ड्रामा केला परंतु यामुळेच काय स्थानिक पोलिस प्रशासनाची खरी लायकी लपणार आहे का? असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

बदलापुर किंवा जवळच्या शहरातील रेल्वे स्थानक किंवा रेल्वे फाटकावर जेव्हा एखादा अपघात होतो आणि व्यक्ति मरण पावतो तेव्हा त्या व्यक्तिचे मृतदेत तासंतास उचलले जात नाही कारण पोलिस मनुष्यबळ उपलब्ध नाही असे निर्लज्जपणे कारण दिले जाते. शहरातील समाजसेवक, आई.टी.आय. कार्यकर्ते आणि पत्रकारांवर जेव्हा हल्ला होतो आणि पोलिस संरक्षणाची मागणी केली जाते तेव्हा पोलिस खात्यात मनुष्यबळ उपलब्ध नाही असे कारण दिले जाते, पोलिसात एखाद्या घटनेची तक्रार करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला तासंतास बसविले जाते कारण पोलिस पेट्रोलिंगसाठी गेलेत मग अश्या लॉंग मार्चसाठी काय पोलिस प्रशासन भाडे तत्वावर मनुष्यबळाला आणत आहे का? अश्या प्रकारचा देखावा करण्यामागचं खरे उद्देश काय? पोलिसच जनतेवर दहशत करणार तर गुंडांचं काय? असा प्रश्न बदलापुर वकास मिडिया विचारत आहे.

मुळात कायदा कोणीही हातात घ्यायला नको परंतु ते फक्त सामान्यांवरच लागु होतांना दिसत आहे, राजकिय नेते, उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील अधिकारी मात्र आपले कर्तव्य योग्य प्रकारे न करता कायदा नेहमी तोडतातच त्याचं काय, तेव्हा हा फौजफाटा कुठे लपुन बसतो? आंदोलन झाल्यानंतर शेकडोंवर कारवाई करायची आणि रेल्वे स्थानकावर 100-200 पोलिसांची फौज मिरवायची म्हणजे परिस्थिती बदलणार आहे का? दहशतीत जनतेला ठेऊन अजुन किती काळ सत्य लपवता येईल? आणि असे जर होतच राहिले तर मग ह्यांच्यात आणि इंग्रज काळातील त्या जर्नल रेगिनाल्ड डायर मध्ये फरक काय? त्यामुळे खाकीचा धाक कुठे दाखवायला हवं हे देखील आजकाल महाराष्ट्र पोलिस खातं विसल्याचे दिसुन येते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...