वेळीच सरकारने लक्ष न दिल्यास निवडणुकीत बसणार फटका
- मुख्यमंत्री शिंदे यांनी बदलापुरातील आपले गड राखण्यासाठी पुढाकार घेण्याची शिंदे गटातील कार्य़कर्त्यांची मागणी
बदलापुर (महेश कामत)- बदलापुर शहरात मागील अनेक वर्षांपासुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आणि राजकिय शक्तीचा वापर करुन स्थानिक पातळीवर एक लोकप्रतिनिधीने अनेक लफडे केले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर शिंदेच्या ताकदीचा वापर करतांना महाराष्ट्र पातळीवर मुख्यमंत्र्यांचे नाव खराब होऊ नये यासाठी त्या लोकप्रतिनिधीने कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने आता बदलापुर शहरातील लाखो रहिवाशी महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनावर रोष निर्माण झाल्याचे दिसते.
शिंदे गटातील बदलापुर लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे हे मागील अनेक वर्षांपासुन बदलापुरात राजकारण करतात. आधि मुख्य शिवसेना पक्ष असतांना ठाणे जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या जीवावर त्यांनी कुळगांव बदलापुर नगरपरिषदेत ठेके घेण्याचे काम केले व हळु हळु त्या ठेक्यातुन माल जमा करुन थेट राजकारणातच उतरले. त्याकाळचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांना आजही पश्चाताप होतो कि ठेकेदारांवर त्याचकळी जर पालिका प्रशासनाने डोक्यावर बसवले नसते तर आज ठेकेदारच पालिकेला काबिज करण्याचे दिवस आले नसते. तर अश्याप्रकारे म्हात्रेंनी राजकिय कारकीर्दीला सुरुवत झाली. काही काळ जेव्हा शिवसेना पक्षापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना फुलफॉर्म मध्ये महाराष्ट्रात होती तेव्हा शिंदे गटातील म्हात्रे यांनी शिवसेनेला राम राम करत मनसेच्या इंजिन चालवण्यास सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुक ही लढवली. त्यात काही यश आले नाही म्हणुन ‘नान न जाने आंगण तेढा’ या म्हणीप्रमाणे मनसे पक्षाला नाव ठेवत पुन्हा म्हात्रेंनी शिवसेनेत दाखल झाले. त्या काळीच शिवसेना ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांना अश्या गद्दारांना पक्षात घेण्याची इच्छा वाटत नव्हती परंतु जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या शिफारशीमुळे म्हात्रे पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.
विशेष म्हणजे म्हात्रे हे शिवसेनेत असतांना सुद्धा बदलापुर शहरात पक्षाला मोठं होण्यासाठी त्यांनी काही फार मोठे कार्य केले नाही. तसेच शिवसेना पक्षातील बदलापुर शहरातील इतर लोकप्रतिनिधींनाही डावलत अनेक वर्ष म्हात्रे यांनी आपल्या जवळीक असलेल्या ठेकेदारांनाच शहरातील 95 टक्के कामांचा टेंडर बहाल केले. यामुळे बदलापुरातील अनेक कट्टर शिवसैनिक आणि शिंदे समर्थक लोकप्रतिनिधीही महाराष्ट्र पातळीवरील मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांवर नाराज होते परंतु ते दाखवत नव्हते. मुग गिळुन पोटावर बुक्यांचा मार खात बदलापुरचे ‘ते’ शिवसैनिक लोकप्रतिनिधी वरिष्ठांकडे बदलापुरात काय चाललय हे माहिती देण्याची देखील इच्छा दाखवली नाही व प्रामाणिकपणे फक्त स्थानिक पातळीवर जनतेची कामे करु लागले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची बदलापुरात सध्यास्थितीची त्यांच्याच गटातील लोकप्रतिनिधींमध्ये लोकप्रियता किती हे तपासणे गरजेचे आहे.
तसेच गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अद्याप हे कळलेले नाही की त्या दिवशी बदलापुरात ही घटना घडली त्याठिकाणी लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे यांनी जाण्याचे काय गरज होती, विशेष म्हणजे जगातील कानाकोपर्यापर्यंत त्या दिवशी नेमकं काय घडलं हे कळाले परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इत्यंभुत माहिती मिळालीच नाही की म्हात्रेच्या त्या कृत्यामागचं खरं कारण काय होत. त्यामुळेच या विशेष लेख द्वारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांनी कळत असेल कि जेव्हा स्थानिक पातळीवरील आपले कार्यकर्ते असलेले लोकप्रतिनिधी नाराज असताता तेव्हा इत्यंभुत माहिती देणारे टिप मिळत नाही, यावर त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
एकनाथ शिंदे यांना जरी कोणी त्या दिवशी जे घडले त्याची संपुर्ण माहिती दिली नाही तरी बदलापुर विकास मिडिया त्यांना सदर घटनेची इत्यंभुत माहिती सादर करत आहे. ज्या दिवशी अल्पवयीन मुलीवरील घटना घडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तसेच राष्ट्रवादीच्या महिला बदलापुर पदाधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होण्याची वेळ आली त्याचवेळी आदर्श शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल होणार हे स्पष्ट चित्र दिसत होते. त्यामुळे आदर्श शाळा प्रशासनाचे मुख्य विश्वस्त जनार्दन घोरपडे यांच्यावरही गुन्हा दाखल होणार हे समजत होते. अश्यावेळी त्यांच्यावर भरपुर प्रेम करणारे वामन बारकु म्हात्रे यांना एकाच्या फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर म्हात्रे यांनी बाकी सर्व काम सोडून थेट घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर जे काही घडले ही सर्वांना माहितच आहे. त्यामुळे प्रेम आंधळ असतं आणि आंधळ्या प्रेमातच घात होते हे उदाहरण पुन्हा एकदा प्रेक्टिकल दिसण्यात आले. वामन बारकु म्हात्रे यांच्या कृत्यामुळे पार महाराष्ट्र राज्यभर महिला पत्रकाराचा विनयभंगाची बातमी आग लागल्याप्रमाणे पसरली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेला रोष होण्यास सुरुवात झाली.
हे काय पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीची कुर्बानी देण्याचे काम झाले नसुन यापुर्वीही अनेकदा अश्याप्रकारे विविध घटना घडल्या आहेत, परंतु स्थानिक पातळीवर शिंदे गटातील लोकप्रतिनिधी यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांचे लुज कनेक्शन असल्याने त्यांना याविषयी कधी योग्य आणि खरी माहिती मिळाली नाही. जर त्यादिवशी म्हात्रे त्याठिकाणी गेले नसते तर राज्य आणि देशपातळीवर पत्रकाराच्या विनयभंगाचा प्रकार झालाच नसता आणि भाजपा पक्ष आणि शिंदे गटाची देशभर बदनामी झालीच नसती.
यापुर्वी शिक्षण मतदार संघाची निवडणुकीची टिकीट मिळवण्यासाठी देखील शिंदेना डावलत थेट भाजपाकडे संपर्क करण्यात आले होते ही देखील शहरात चर्चा आहे. कपिल पाटील सारख्या भाजप माजी खासदाराच्या पराभवासाठी देखील अश्या काही फुटक्या राजकारण्याचा मोठा रोल होता आणि स्थानिक बातळीवर आमदार आणि खासदाराचं भांडण लावण्यासाठीही फुटक्या राजकारण्यांनी अनेक प्रयत्न केले होते ज्याचे चित्र नंतर पाहायला मिळाले. आता सुद्धा शिंदे गटाला डावलुन भाजपसोबत काही फुटक्या राजकारण्यांचा संपर्क सुरु असुन ह्या सगळ्या महत्वाच्या बातमी मुख्यमंत्री यांच्या कॅबिनपर्यंत कधी पोहचतच नसतील हे विशेष.
या सगळ्या घटनेमुळे आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंटे गटातील ज्येष्ठ नेत्यांनी वेळीच सतर्क राहुन बदलापुरातील घडामोडींचा आढावा घेणे गरजेचे आहे, नाहीतर गाफिल राहुन अश्याच प्रकारे पुढेही घडत नाहील व फुटक्या राजकारण्यामुळे राज्य पातळीवर सत्ताधार्यांना नुकसान होणार.बदलापुरात शिंदे गटाचे नेतृत्वाची कमान योग्य उमेदवाराच्या हाती!
ज्याप्रकारे नुकताच लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि राज्य पातळीवर भाजप आणि शिंदे सरकारवर जनतेला रोष निर्माण झाला त्यामुळे शिंदे गट आता बदलापुरचा राजकिय गड ज्येष्ठ नेते आणि सुसंस्कृत लोकप्रतिनिधी श्रीधर पाटील, प्रकाश पाटील किंवा जयप्रकाश टांकसाळकर अश्या नेत्यांच्या हाती कमान देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. बदलापुरात ज्या कार्यक्रम ही होतात ज्यामध्ये आजवर मुख्यमंत्री शिंदे यांचे फोटो लाऊन महोत्सव आणि विविध कार्यक्रमासाठी देणगी 300 पट जमा होत असतांना खर्च मात्र त्यातील 10 टक्के सुद्धा होत नसल्याने हे विषय देखील शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांनी मेरिटवर विषय चर्चा केल्याने बदलापुरात नविन राजकिय घडामोडी लवकरच पाहायला मिळेल.



