ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते कुठेही पळुन गेले तरी त्यांना शोधु आणि कारवाई करु – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

पुर्वी टी.डी.आर. घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना लागले होते अनेक वर्ष

– ह्यांना म्हात्रे पकडता आले नाही देशपांडे आणि आपटे काय पकडणार?

पोलिसांच्या अकार्यक्षम पद्धतीमुळे फडणवीसांच्या आश्वासनावर जनतेला भरवसा नाय

बदलापूर (महेश कामत)- नुकताच नागपुरमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिडियाने राणे धमकी प्रकरण तसेच इतर विषयांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. एका पत्रकाराने जेव्हा बदलापूरच्या गुन्ह्यात आरोपी असलेले मुख्याध्यापिका आणि शाळा प्रशासनातील इतर संचालक मंडळी फरार झाल्याबाबत प्रश्न विचारले असता ‘ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते कुठेही पळुन गेले तरी त्यांना शोध घेऊ आणि कारवाई करु’ असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.

बदलापूरातील अल्पवयीन बलात्कार प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार्या शाळा प्रशासनातील अनेकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पळ काढले आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही घटना घडला त्यावेळेस भाजप समर्थक व शाळा प्रशासनाचे सेक्रेटरी आपटे हे संध्याकाळी त्या शाळेत हजर होते. एका मिडियाने जेव्हा मुख्याध्यापिका आणि शिक्षिका देशपांडे यांना जाब विचारणा करत असतांना व्हिडीओ मध्ये आपटे दिसतात. त्यामुळे वेळीच पोलिसांनी या सगळ्यांना का अटक केली नाही, भाजप जवळीक असल्यामुळे गृहमंत्री यांच्या सांगण्यावरुन पोलिस प्रशासनाने आधि पळण्याची संधी दिली आणि आता कारवाई करण्याच्या आश्वासन देतात कि काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. 

याबाबत एका ज्येष्ठ समाजसेवकांने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, यापुर्वी देखील बदलापूरात असेच घडत आहे, टी.डी.आर. सारखा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आमच्या सामाजिक संघटनेने बाहेर काढला तेव्हा या गुन्हायाचा मुख्य आरोपी कु.ब.न.प. चे तत्कालिन मुध्याधिकारी भालचंद्र गोसावी हे फरार होते. सरकारला तसेच पोलिस प्रशासनाला अनेक वर्ष काय आरोपी हाताला लागला नाही. गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र गोसावी यांनी एका भाजपच्या राजकिय नेत्याला वाढदिवसाला हजारो लोकांच्यासमोर सोन्याची भली मोठी चेन भेट दिल्याने त्यांना अनेक वर्ष फरार होण्यास मदत मिळाली. 

राष्ट्रवादीच्या बदलापूर शहरातील एका कार्यकर्त्याने देखील नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली कि, ह्या सरकारला विनयभंग करणार्या मुख्य आरोपी शिंदे गटातील म्हात्रेला अद्याप अटक करता आले नाही मग हे त्यांच्या भाजप पक्षातील आपटे देशपांडेंना काय अटक करतील? आता तरी पोलिसांनी न्युट्रल भुमिका बजावली पाहिजे.
त्यामुळे आता भाजप समर्थक आपटे आणि आरोपी मुख्याध्यापिका, शिक्षिका व इतर आरोपी मंडळींना पोलिस किती वर्षांनी शोध घेईल यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले असले तरी महाराष्ट्र पोलिस खात्याच्या अकार्यक्षम पद्धतीमुळे फडणवीसांच्या आशश्वासनावर जनतेला विश्वासच बसत नाही अशी चर्चा आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...