बदलापूरात सी.सी.टी.व्ही. कॅमेराचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिसांनी तात्परता दाखवणे गरजेचे

Date:

– नागरिकांच्या सुरक्षा आणि प्राईव्हेसीचा प्रश्न –

बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर शहरात सध्या विविध गंभीर घटना घडल्यानंतर तसेच त्यातील एका घटनेतील महत्वाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज शाळा प्रशासनाकडून गायब झाल्याने बदलापूरात होणार्या सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांचा गैरवापर टाळण्याबाबत आता चर्चा होत आहे. 

जाणकारांच्या मते अनेक राजकिय नेते हे बदलापूर शहरात आपल्या कार्यालया पासुन ते थेट 5 – 5 किलोमिटर पर्यंत सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावत शहरातील नागरिक काय करतायेत यावर नजर ठेऊत असतात. बदलापूर शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावले गरजेचे आहे परंतु त्या फुटेज हाताळतो कोण हे नेमकं आता जनतेला कळायला हवे.

बदलापूरात नुकताच झालेल्या महिला पत्रकारावर अर्वाच्च भाषेचा वापर या घटनेच्या ठिकाणी असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरा महत्वाचे ठरले परंतु त्याच वेळी दुसरी घटना म्हणजे अल्पवयीन मुलीचा बलात्कारी शाळेत वावरत असतांनाचे 15 दिवसांचे फुटेज शाळा प्रशासन गायब करते हे दोन्ही विषय सी.सी.टी.व्ही. कॅमर्याचा उपयोग आणि दुरुपयोग दाखवुन देत असल्याने यावरुन काही चांगले बोध व धाडा शिकायला हवे.

बदलापूर शहरात विविध ठिकाणी आज कॅमेरा लावण्यात आले आहे परंतु यातील किती कॅमेरे हे पोलिसांच्या अंडर कंट्रोल असतं आणि किती राजकारण्याच्या कार्यक्यांच्या कंट्रोल मध्ये ही सखोल चौकशी व त्यानंतर दुरुस्ती झाली पाहिजे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणावरिल सी.सी.टी.व्ही. कॅमरे हातळणे हे अत्यंत नियमाप्रमाणे आहे परंतु मग अचानक कोणती घटना घडली तर त्या कॅमरेतून फुटेज गायब तर होणार नाही यामुळे पोलिसांवर सुद्धा याबाबत अनेक नियम बसविण्याची आता गरज आहे. कारण ज्याप्रकारे पोलिसांची बाजु घेत काही राजकारणी म्हणतात पोलिस ही माणुसच शेवटी अगदी हे बरोबरच आहे त्यामुळे पोलिसातील माणुस देखील सत्ता आणि लाचरुपी मिळालेल्या पैश्याच्या दबावतंत्रात जर फुटेज दिलीट करणे किंवा संपुर्ण फुटेज ऐवजी आपल्या सोयीप्रमाणे एडिटेड फुटेज तर कोर्टात देणार नाही ना याबाबत शासनाने योग्य नियमावली बनविणे गरजे आहे.

बदलापूरच्या काही जाणकार आणि सुज्ञ नागरिकांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या मुद्द्यावरुन असेही बदलापूर विकासशी बोलतांना प्रतिक्रिया दिली कि, अनेकदा शहरातील राजकारणी कित्येक मैल दुरपर्यंत सी.सी.टी.व्ही. कॅमरे लावुन त्यांचा कार्यकर्ता शहरातील मुलींवर नजर ठेऊन असतात कधी ह्या वार्डातील ही मुलगी किंवा तरुणी कुठे जाते कधी येणे, दुसर्या वार्डातील कुटुंबियातील कर्ताधर्ता नवरा घराबाहेर कामासाठी कधी बाहेर पडतो आणि महिला वर्ग कधी एकटी असु शकते हे सगळे अंदाज या ठराविक कार्यकर्त्यांना सी.सी.टी.व्ही. फुटेजवर पुर्णवेळ लक्ष देऊन अत्यंत सहजपणे ट्रैक करता येते हे एकप्रकारे मानव अधिकाराच्या प्राईव्हसी लाईवला धोका आहे. त्यामुळे भविष्यात मानव अधिकार आणि फंडामेंटल राईंट्सची पायमल्ली होणार नाही यासाठी पोलिसांनी योग्य तो पाऊन आत्ताच उचलणे गरजेचे आहे.

तसेच फुटेजचे चुकीचे वापर ही एकच समस्या नाही तर सी.सी.टी.व्ही. फुटेज हैंग होणे हाही एक गंभीर प्रकार सध्या दिवसेंदिवस विविध ठिकाणी होत असल्याने सी.सी.टी.व्ही सर्वरला इंटरनेटशी जोडतांना योग्य ती काळदी घेणे गरजे आहे. 

पोलिसठाणे आणि रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. ही महत्वाचा मुद्दा

शहरातील सार्वजनिक ठिकाणाप्रमाणे पोलिस ठाण्यातील सी.सी.टी.व्ही. कॅमरे याबाबत निस्तारिक परिक्षण करणे गरजेचे आहे. अटक आरोपींना पोलिस जेव्हा पैसे उखलण्यासाठी मारहाण करते तेव्हा सी.सी.टी.व्ही. कॅमरे असलेल्या ठिकाणा ऐवजी जाणुनबुजुन ज्याठिकाणी कॅमेर्याची नजर नाही तेथे नेऊन अटक आरोपींना मारहाण करण्यात येते. तसेच पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी लाच दे अश्याच ब्लाइंड स्पॉटमध्ये देणे घेणे होत असल्याने सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावतांना त्याचा उद्देश काय हे डोळ्यासमोर ठेऊन लावण्यात आले पाहिजे.

पोलिस ठाण्याप्रमाणे रुग्णालयात ही जे सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ते योग्य रितीने चालते का कारण जेव्हा एखाद्या राजकिय नेत्याला अटक होते तेव्हा त्यांना तुरुंग प्रवासापासुन काही काळ विश्रांतीसाठी याच रुग्णालयात व्ही आई पी ट्रिटमेंट दिले जाते आणि खरोखरच दुखापत झालेल्यांना वेळीच उपचार सुद्धा मिळत नाही. त्यामुळे रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व त्याची वेळोवेळी पडताळणी हे महत्वाचे आहे.

या सगळ्या मुद्द्यानंतर जेव्हा कोणत्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी सी.सी.टी.व्ही फुटेज गायब करण्याचा ज्या कोणाचा प्रयत्न असतो अश्यांवर पुरावा नष्ट करण्याच्या आरोपीखाली कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्याच्या भारतीय कायद्यात जरी तशी तरतुद असली तरी प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही, आणि त्यामुळेच नुकताच झालेल्या शाळेतील बलात्कार प्रकरण आणि शाळा प्रशासनाकडून फुटेज गायब होण्यासारखी घटना समोर येते.

तितकेच नाही तर महिला पत्रकाराचा शाब्दीक केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा आरोपी वामन बारकु म्हात्रे सुद्धा मुंबई हाईकोर्टात अटक पुर्व जामिन नामंजुर झाल्यानंतर सुद्धा स्थानिक पोलिांच्या हाती लागत नसल्याने म्हात्रेच्या कार्यकर्ते कुठे पोलिसांवरच अश्या सी.सी.टी.व्ही. कॅमर्यातून पाळत तर ठेवत नाही ना अशी शंका अनेकांना आहे.  

बदलापूरातील ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या बदलता येणे आता शक्य नाही परंतु  आता बदलापूर शहराला पुन्हा एकदा अश्या घटनांमुळे काही बदल करण्याची संधी व सुरक्षित भविष्याची संधी मिळाली असुन नागरिकांनी तसेच प्रशासनाने त्या संधीला समजुन मैच्योर होणे गरजेचे आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...