वामन म्हात्रे यास कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांवर विश्वास नाही?

0
119

मुंबई हाईकोर्टाने अट्रोसिटीचा गुन्हा करणार्या म्हात्रेचा अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळले

बदलापूर (महेश कामत)- शिंदेचा पोसलेला गुंड लोकप्रतिनिधी जो सत्ताधार्यांविषयी बातमी छापणार्या पत्रकारांवर भुंकणातो तो म्हणजे वामन बारकु म्हात्रेचं अटकपुर्व जामिन अर्ज नुकताच मुंबई हाईकोर्टाने फेटाळले आहे.

विशेष म्हणजे कल्याण सत्र न्यायालय न्यायाधिश (5) यांच्या जवळ अटकपुर्व जामिनाचा म्हात्रेचा अर्ज असतांना सुद्धा 29 ऑगस्ट रोजी सदर केसचा निकाल लागणार त्यापुर्वी म्हात्रे याने मुंबई हाईकोर्टात पुन्हा अटकपुर्व जामिन अर्ज टाकल्याने शिवसेना शिदे गटाचे लोकप्रतिनिधी वामन म्हात्रेला कल्याण सत्र न्यायालयावर विश्वास नाही का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

बदलापूर शहरात एका महिला पत्रकाराशी अश्लील हावभाव करत चुकीचे विधान करत शाब्दीक विनयभंग केल्याप्रकरणी वामन बारकु म्हात्रे विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन दिवस लागले, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एफ.आय.आर. महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे टाळले तितकेच नाही तर आरोपीला अटक सुद्धा करण्यात आले नाही.

गुन्ह्यात फरार असतांनाही वामन बारकु म्हात्रे विविध माध्यमांशी बोलतांंना आपली प्रतिक्रिया नोंदविण्याचे काम तसेच नागरिकांची दिशाभुल व साक्षिदारांना व फिर्यादीला आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिशाभुल आणि घाबरवण्याचा पुरेपुर प्रयत्न केले. माध्यमांशी बोलतांना, फिर्यादी आज तक्रार करतांना जी लोक तिच्या सोबत आहे उद्या नसणार व टी एकटी असतांना वामन म्हात्रे हा भाऊच तिच्यासाठी उभा राहणार अश्या डबल मिनिंगचे दहशत पसरविणारे वाक्य म्हात्रेने प्रतिक्रियेत म्हटल्याने अश्या गावगुंडाला कायद्याची चाबुन कधी बसणार अशी बदलापूरकरांमध्ये चर्चा आहे.

अश्यातच आता कल्याण सत्र न्यायालयात निकाल लागण्या आधिच वामन म्हात्रे याने कल्याण कोर्टावर अविश्वास दाखवत जो काही मुंबई हाईकोर्टात अटक पुर्व जामिनीसाठी प्रयत्न केले ते देखील फेल ठरल्याने 29 ऑगस्ट रोजी कल्याण सत्र न्यायालयात न्यायाधीश अटकपुर्व जामिनावर सुनावणी करणार आहेत. बदलापूरच्या अनेक सामाजिक संघटनांंनी तसेच म्हात्रे ने पसरविलेल्या दहशतीत असलेले इतरही पिडीत न्यायाधिशाकडे आरोपीची यापुर्वीची क्रिमिनल हिस्ट्री दिल्याने पिडीत महिला पत्रकाराला भारताचा कायदा न्याय मिळवुन देणार का यावरच सर्वांचे लक्ष वेधल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here