‘मी तो नव्हे’ असे मिडियासमोर म्हणत अजुनची नागरिकांची दिशाभुल करण्यात म्हात्रे व्यस्त
बदलापूर (महेश कामत)- नुकताच महिला पत्रकार आणि वामन म्हात्रेच्या संभाषणाचा सी.सी.टी.व्ही. फुटेज समोर आले असुन यामध्ये सरळ सरळ दिसत आहे कि दोन्ही पक्षांमध्ये जे काही संभाषण झाले ते वाद पेटवण्यासारख्या विषयावरुनच झाले आहे. १५-२० लोकांचा घोळका घेऊन गावगुंड वामन म्हात्रे ज्याप्रकारे त्याठिकाणी जात होता आणि त्याच वेळेस महिला पत्रकार त्याठिकाणाहुन येत असतांना म्हात्रे याने जे काही संभाषण केले ते एखाद्या महिलेला राग येणार मानसिक रित्या लज्जा निर्माण होणार अश्याच पद्धतीने बोलल्यामुळे नंतर महिला पत्रकाराने हाथ दाखवत संभाषण केले आहे. त्यामुळे सदर फुटेज पाहिल्यावर विविध पोइंट म्हात्रे विरोधातच हा फुटेज पुरावा म्हणुन दिसत आहे. पहिला पुरावा म्हणजे म्हात्रे याने केलेल्या संभाषणामुळेच महिला पत्रकाराने त्याप्रकारे त्याला हात दाखवत बोलण्यास सुरुवात केली. एखादी महिला जेव्हा आपल्यावर अतिशय घाणेरड्या विषयी कोणी बोलत असेल त्याचवेळी अश्या प्रकारे आपले संभाषण व्यक्त करते. दुसरा पुरावा म्हणजे घोळका हा म्हात्रेसोबत असल्याने अश्यावेळी म्हात्रेचे साथीदार न्यायालयात कशाला म्हणुन त्यांच्या नेत्या विरोधात खरी साक्ष देणार, त्यामुळे तक्रारदार महिला पत्रकारची फिर्याद यात महत्वाची भुमिका बजावणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार जे सामान्य नागरिक आणि पोलिस अधिकारी त्याठिकाणी संभाषण ऐकुन होते ते गावगुंड वामन म्हात्रेला घाबरून न्यायालयात आपली साक्ष देण्यास जाणार नाही. परंतु निर्भिड समाजसेवक जे त्यावेळी पत्रकाराजवळ उभे होते ते देखील जर साक्षि देण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी तयार आहेत अश्यांवर गावगुंड म्हात्रेकडून प्रेशर टाकण्याचे काम नक्कीच होणार अशी सामान्य बदलापूरकरांना भिती आहे.
सी.सी.टी.व्ही. फुटेज आता जनतेसमोर आल्यानंतर नुकताच आरोपी वामन बारकु म्हात्रे याने साक्षिदार आणि सामान्य नागरिकांची दिशाभुल होण्यासाठी म्हणुन मिडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे कि, म्हात्रेची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे – ”नेहमीच बोलतो का दुध का दुध पानी का पानी आता करायची वेळ आली आहे, बरेच से लोक त्याठिकाणाहून जात येत होते, बरेचसे पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस सुद्धा तेथे उपस्थित होते, आणि आम जनता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती मला वाटतय सी.सी.टी.व्ही. मध्ये जीतकी लोकं असतील तितक्या लोकांना पोलिसांनी बोलवुन इन्वेस्टीगेशन करावं आणि मी मला खात्री आहे मी कुठच्याही प्रकारचे अश्लील वाक्य तिज्या विरोधात वापरलेला नाही.”
खरंतर जोवर पोलिसांचा संपुर्ण तपास पुर्ण होत नाही आणि न्यायालयाचे या घटनेवर आदेश येत नाही आरोपीने पुरावा नष्ट होईल किंवा साक्षिदार घाबरतील किंवा पुराव्याबाबत नागरिकांना दिशाभुल होईल असले कार्य करायला नको परंतु पैश्यांचा माज आणि राजकिय शक्तिने गुंग वामन म्हात्रे याने जामिनावर असतांना देखील पोलिस तपास कार्य सुरु असतांना ज्याप्रकारे टी.व्ही. 9 मराठी ला प्रतिक्रिया देत त्यात जी प्रतिक्रिया दिली आहे ते देखील म्हात्रेच्या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिर्यादी आणि पोलिस सदर मिडियात दिलेल्या म्हात्रेची प्रतिक्रियेची व्हिडीओ देखील पुरावा म्हणुन जोडू शकतात असे तज्ञ वकिलांचे म्हणणे आहे.
एक सहाजिकच आहे कि, सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये झालेले संभाषण ऐकायला मिळणार नाही परंतु वस्तुस्थिती पाहता फिर्यादीने दिलेली माहिती खरी आहे हे त्या सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये दोघांच्या वर्तनावरुन १०० टक्के गृहित धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीचे पुर्वीचे बैगराऊंट येथे बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात विविध मारहाणी, किडनैपिंग अश्या गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे त्यात एका महिला पत्रकाराला धमकी देणे हे कोर्टात पुरावा म्हणुन गृहित धरता येतो.



