बदलापूर पोलिस प्रशासनाचा लाचारीपणा आणि गुलामगिरी कधी थांबणार

Date:

बदलापूर (महेश कामत)- सुसंस्कृत लोकांचे शहर व निसर्गरम्य शहर म्हणुन ओळखले जाणारे बदलापूर शहरात मागील काही वर्षात गुंडशाही आणि भ्रष्टाचार वाढत असले तरी स्थानिक पोलिस प्रशासन मात्र अश्या गुंडशाही वर रोख लावण्यास अक्षम दिसुन येत आहे. नुकताच झालेल्या दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, महिला पत्रकारासोबत अश्लील वर्तल प्रकरण व आंदोलन या सगळ्या प्रकरणात ज्याप्रकारे स्थानिक बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याने दिरंगाई दाखवत आपले पोलिसी कार्य़ योग्य रितीने न केल्याने स्थानिक पोलिस प्रशासनाचा लाचारीपणा आणि गुलामगिरी कधी थांबवणार असा प्रश्न पुन्हा एकदा बदलापूरकर उपस्थित करतांना दिसत आहेत.

एखाद्या गटाचा राजकिय लोकप्रतिनिधी असो किंवा त्याच लोकप्रतिनिधीचे बेरोजगार कार्य़कर्ते ज्याप्रकारे बदलापूर शहरात दहशत पसरवतात, पालिकेत कर्मचार्यांवर दादागिरी करतात, खोटे कागदपत्र दस्तावेज तैयार करुन पालिकेत दाखल करतात, भ्रष्ट कंत्राटदार ठेके घेऊन काम करण्याऐवजी फक्त कागदपत्री काम दाखवुन नागरिकांचे कररुपी पैसे लुबाडतात, शहरातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता वाटत नाही कारण एखाद्या राजकिय पक्षाचा सरफिरु आशिक कधी कुठे कोणा मुलीचा हात धरेल सांगता येत नाही, मारहाण, फायरिंग व महिला पत्रकाराला धमकी या अश्या कृत्य मागील अनेक वर्षांपासुन बदलापूर शहरात होत असले तरी स्थानिक पोलिस प्रशासन मात्र भ्रष्ट नेत्यांची लाचारी करण्यात व्यस्त होतांना दिसत येत आहे. हे काय फक्त बदलापूर पूर्वच नव्हे तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही पोलिस ठाण्याची हिच अवस्था आहे. बदलापूर शहरच काय तर ग्रामिण पोलिस ठाणा ही काय धुतल्या तांडळाचे नाही त्यामुळे संपुर्ण पोलिस प्रशासनाने इतकी वर्ष कसं काय आपली आत्मा विकुन आपलं पोलिसी धर्म विकुन राजकारण्याचे गुलाम झाले आहे हा संशोधनाचा भाग आहे. कारण ज्या शहरात पोलिसच प्रामाणिक राहणार नाही तर गुंड प्रवृ्त्तीच्या मुसक्या आवळणार तरी कोण? असा प्रश्न जागृक बदलापूरकरांना पडला आहे.

कुळगांव बदलापूर शहर ज्या चोथी मुंबई म्हणुन ही ओळखले जाते त्या ठिकाणी भ्रष्ट लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे जनतेच्या कराच्या पैश्याची दुर्वापर स्वतःचे खिसे भरण्यासाठी करत आहे त्याने बदलापूर शहराचे भविष्य नेमकं कोणत्या दिशेला जात आहे?

नुकताच झालेल्या तीन घटनेत बदलापूर स्थानिक पोलिसांची खरी औकात लोकांना पाहायला मिळाली आहे. पहिल्या घटनेत तेथे महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षिका श्रीमती. एस. आर. शितोळे – शिंदे यांचे कार्य़ अतिशय लज्जास्पत असल्याचे दिसुन येते. एक महिला पोलिस अधिकारी असुन सुद्धा श्रीमती. शितोळे यांना त्या पिडीतेचा आईचे दुखने समजले नाही, एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आणि श्रीमती. शितोळे या पहिला पोलिस तब्बल साढेबारा तास तक्रार घेण्यास दिरंगाई करतात. ह्या महिला पोलिस अधिकार्याचे वर्तन स्पष्टपणे दिसत आहे कि, त्या भ्रष्ट पोलिस अधिकारीने पुरेपुर प्रयत्न केले पिडीत महिला तक्रार दिल्याशिवाय हार मानत घरी निघुन जावी, श्रीमती. शितोळे यांच्या कृत्यामुळे अनेक दिवस आरोपी हा फरार राहण्यामध्ये यशस्वी ठरला ज्यामुळे काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच पोलिस प्रशासनीने वेळीच दखल न घेतल्याने शाळा प्रशासनाने पुरेपुर वेळ मिळाला सी.सी.टी.व्ही. फुटेक गायब करण्यासाठी त्यामुळे लाचार पोलिस अधिकार्यामुळे एखाद्या गंभीर घटनेच्या चौकशीची कशी वाट लागते हे बदलापूर पूर्व पोलिसांच्या कार्यप्रमाली वरुन दिसुन येते.

दुसरी घटना म्हणजे महिला पत्रकार कुमारी. मोहिनी जाधव ह्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ. पोलिस अधिकारी श्रीमती. शितोळी यांना जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती कारण त्या स्वतः एक महिला असतांना सुद्धा एक दुसरी महिला ती देखील पत्रकार स्पष्ट पणे निर्भिड होऊन आपली व्यथा व्यक्त करत आहे कि कशाप्रकारे एका फुटक्या राजकारण्याचे अश्लील हावभाव दाखवुन खालच्या पातळीचे वक्तव्य करत दिला धमकी दिली. संपुर्ण प्रकरण माहिल असतांना देखील गुलाम पोलिस अधिकारी श्रीमती. शितोळे यांनी आजिबात तात्पर्याने कार्य केले नाही उलट पिडीत महिला पत्रकाराला सल्ला दिला कि, तुम्ही दोन्ही पक्षकार एक मेकांना ओखळता त्यामुळे कंपलेंट करण्याऐवजी आपण बोलवुन घेऊ आणि सेटलमेंट करु अश्या प्रकारचे दलालगिरीचे सल्ले दाणार्या पोलिस प्रशासनाचे खरं तर जितक धिक्कार करावा तितका कमीच आहे. हे असले पोलिसवाले पोलिस कमी आणि सत्ताधार्यांची दलाली एजेंट जास्त आहेत असे ठाम मत बदलापूर विकास ने व्यक्त केले आहे.

तिसरी घटना जेथे पोलिस अधिकारी आपली खाकी वर्दिचा धाक उल्हासनगर कोर्टात सुद्धा दाखवायला कमी करत नाही. एकतर आधिच ५०० हुन अधिक आंदोलनकर्त्यांना अटक केले आणि त्यांना मारहाण सुद्धा केली. त्यात त्यांना न्याय मिळु नये म्हणुन पोलिस अधिकारी कोर्टात वकिलांवर दबावतंत्र टाकण्याचा जो प्रयत्न करत असल्याचे दिसुन आले यावर महाराष्ट्र पोलिस खात्याने खाकी तरी कशाला घालावी ह्याच राजकारण्याचे वाटलेले टी.शर्ट फीरावे असा मत बदलापूरच्या सामान्य जनतेने व्यक्त केले आहे.

जेव्हा महाराष्ट्र शासनातील पोलिस खातचं विकाऊ असेल तर त्या राज्यात न्याय आणि सुव्यवस्थेची रक्षा प्रामाणिकपणे होणार तरी कशी असा प्रश्न आता नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहे.

तीन्ही घटनांमध्ये पिडीत आणि सामान्य नागरिकांच्या फंडामेंटर राईट्स आणि मानवी हक्काची पायडळणी पोलिसांनी केल्याने महाराष्ट्र मानवअधिकार संघटना यावर काय भुमिका घेणार यावरच आता सामान्य जनतेचे लक्ष केंद्रीत आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...