बदलापूरात फुटक्या राजकारण्याचा माज अजुनही उतरलेला नाही

0
145

बदलापूर (महेश कामत)- नुकताच झालेल्या २ अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना आणि त्यातच त्याच शहराचा लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे एका महिला पत्रकाराला दमदाटी करतो अश्लील हावभाव करुन ”जणु तुझाच बलात्कार झालाय असं तु बातमी करायला येते” असं वक्तव्य करतो हे पाहुन वामन म्हात्रेचा माज अजुनही उतरलेला नाही की काय असा प्रश्न आता जागृक नागरिकांना पडला आहे.

वामन म्हात्रे हा तोच लोकप्रतिनिधी आहे जो टी.डी.आर. घोटाळ्याचा आरोपी म्हणुन कोर्टात चार्जशिट दाखल आहे, हा तोच फुटका राजकारणी आहे त्याचे बदलापूरात दिवसा ढवळ्या ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक व पत्रकाराला दोन वेळेस अपहरण केले व मारहाण केली. हा तोह म्हात्रे हा त्याचे बदलापूरच्या दुसर्या एका तरुण पत्रकाराला अनेकदा प्रशासनात आणि बदलापूरच्या रस्त्यावर भरचौकात मारहाण केली व गाडी जाळुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हा तोच नराधम आहे जो ४ वषीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला की विनयभंग झाला अश्या गुंतवणार्या बाता मिडियासमोर करु लागला, हा तोच लोकप्रतिनिधी आहे ज्याने आंदोलन करणार्या जनतेलाच शिवीगाळी देण्यास सुरुवात करु लागले त्यामुळे अश्या फुटक्या राजकारण्याचा इतका माज येतो तरी कुठुन हा प्रश्न आता ऐरणीवर आहे. स्थानिक बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिस प्रशासन मागील कित्येक वर्षांपासुन या अश्या गुंड प्रवृत्तीच्या फुटक्या राजकारण्याच्या मुसक्या आवळायला अजुनही सक्षम का नाही असा प्रश्न आता जागृत नागरिकांनी विचारायला सुरुवात केली आहे.

भर दिवसा एका महिला पत्रकाराला दमदाणी करणे आणि विविध मिडियांसमोर ज्याप्रकारे वामन म्हात्रे याने आपली प्रतिक्रिया दिली आहे यावरच एक मात्र स्पष्ट होत आहे कि म्हात्रे याने कांड केलंय पण महिला पत्रकाराची माफी मागायची हिम्मत नाही म्हणुन नागरिकांची दिशाभुल करण्यासारखं विषय मिडियावर प्रतिक्रिया देतांना बोलतांना दिसत आहे.

बाहेरचे लोक आले बदलापूरात आंदोलन करायला हे पुन्हा पुन्हा ज्या हिरहिरीने गुंड म्हात्रे याने मिडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली त्यावरुन या अश्या फुटक्या राजकारण्याची विचार क्षणता किती हे मात्र स्पष्टपणे दिसुन येते. बाहेरचा म्हणजे काय स्विझरलैंड किंवा युरोप मधुन कोणी परदेशी आले का बदलापूरात आंदोलन करायला हे म्हात्रे यांचा इतका चटका बसलाय अशी आता बदलापूरकर चर्चा करत आहे. प्रतिक्रिया देतांना म्हात्रे याने मनसेच्या संगिता चेंदवणकर यांच्यावरही आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि महिला पत्रकारावर ही आरोप करण्याचा प्रयत्न केला की त्या ठाकरे गटाच्या कामांच्या बातम्या प्रकाशित करतात हे सगळं विषय अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या घटनेत काहीच संबंध नाही मग म्हात्रे याने महिला पत्रकाराला पत्रकारिता करतांना बांधा का आणण्याचा प्रयत्न केला? अश्लील हावभाव का केलं?

बदलापूरचे नागरिक आता म्हात्रे यांच्या अश्या प्रकारच्या महिला पत्रकारासोबत केलेल्या वर्तवणुकीबाबत जोरदार चर्चा करत आहे कि वामन म्हात्रे यांना का इतका त्रास झाला अल्पवयीन मुलीच्या बलात्कारी विषयी बातमी करणार्या पत्रकाराबाबत. कुठे हा बलात्कारी म्हात्रेंचा पक्ष सहकारी तर नव्हता? अशीही चर्चा आता होत आहे. शेवटी बलात्कारी हा खरवईचा रहिवाशी आहे आणि कोणाच्या तरी वशिलाने भाजप कन्ट्रोल आदर्श विद्यामंदिर शाळेत सफाई कामगार म्हणुन प्रायवेट कंत्राटदारामार्फत कामाला लागला होता. त्यामुळे म्हात्रे आणि बलात्कारीचा लिंक काय यावर आता जागृक बदलापूरकर संशोधन करत आहेत.

महिला पत्रकार कुमारी. मोहिनी जाधव यांनी मिडियासमोर प्रतिक्रिया देतांना असेही सांगितले कि, ज्यावेळेस त्या पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेल्या त्यांना पोलिस अधिकारी समजुन घालण्याचा प्रयत्न करत होते कि, ”जाउद्या मैडम तुम्ही दोघे एक दुसर्यांना ओळखता आपण बोलुन सोलटमेंट करु” असे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे बदलापूर शहरातील पोलिस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आहे कि फुटक्या राजकारण्याचा प्रोटेक्शन करण्यासाठी आहे हा महत्वाचा विषय आहे. जर पोलिस प्रशासनच पिडीतेला न्याय देण्याऐवजी सेटलमेंट करण्याचा बाता करणार ती पिडीतांनी जायचं तरी कुठे?

अजुन एक महत्वाचा विषय म्हणजे ज्याप्रकारे मिडिया समोर प्रतिक्रिया देतांना पुन्हा पुन्हा म्हात्रे ”आम्ही पोलिसांनी कंट्रोल केलं हे आंदोलन अन्यथा दंगल परिस्थिती निर्माण झाली असती”सांगत असल्याचे दिसुन येते त्यावरुन म्हात्रे हा पोलिस आणि की पोलिस प्रशासनाचा बाप आहे अशीची चर्चा चालु आहे. जर फुटके राजकारणी स्वतःलाच पोलिस समजु लागले आणि पोलिस प्रशासनाला फाट्यावर मारु लागले तर त्या शहरातील जनता किती सुरक्षितत आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्यावर महाराष्ट्र मानव अधिकारी सघटनेने चौकशी केली पाहिजे अशी मागणी जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here