ब्रिटेन येथील नागरिक व पालकांकडून नराधमा प्रति जोरदार संताप व्यक्त
अटक आरोपीला डिपोर्ट करण्याची ब्रिटेनच्या नागरिकांची मागणी
लुटन (महाराष्ट्र विकास मिडिया)- भारतात महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि वियभंगाच्या घटना थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही त्यातच ह्या भारतातील काही नागरिक आता परदेशातील ही नागरिकांच्या अल्पवयीन मुलांवर अश्लिल नजर ठेऊन अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निर्दशर्नात आल्याने ब्रिटेन मध्ये अश्या सेक्शन प्रिडेटर विरोधात जोरदार संताप होत आहे.
नुकताच सप्टेंबर महिन्यात ब्रिटेन येथील लुटन व इतर शहरातीन अनेक भारतीय नागरिकांकडून अल्पवयीन मुलांवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नाचा आरोप झाला आहे. सोशल मिडियाद्वारे अल्पवयीन मुलींशी संपर्क करुन अश्लील भाष्य केल्याचे सर्व पुरावे देखील आहे. विशेष म्हणजे आरोपींनी व्हिडीओ मध्ये केलेला गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली असुन अश्या नराधमाचा जोरदार विरोध सध्या होत आहे. ब्रिटेनच्या पोलीसांनी या नराधमांना अटक केली असुन पोलीस तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.
लुटन येथील रहिवाशी व भारतातील केरळा येथील राजेश अंतोनी हा भारतीय नागरिकाने आपल्या मुलीच्याच मैत्रिणीला मोबाईलवर चैटिंग मध्ये अश्लिल भाष्य केले. त्याचसह अश्लिल फोटो ही पाठविले. सदर मुलीचे वय 14 वर्ष असुन त्या अल्पवयीन मुलीने याबाबत आपल्या पालकांनी माहिती दिली व पालकांनी थेट आरोपीला जाब विचारणा केले तसेच पोलीसांना संपर्क केले. सदर घटनेचा पुर्ण व्हिडीओ रस्टिक ब्लैन्ड या युट्युबरने शुट केला असुन सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आले आहे. सदर व्हिडीओ मधुन मिळालेल्या माहितीप्रमाणे राजेश अंतोनी हा डिपेंटेंट विसा वर आपल्या पत्नि व मुलीसह ब्रिटेन येथील लुटन शहरात रहिवासी आहे. नुकताच दीड वर्षांपासुन ते या ठिकाणी राहायला आले. राजेशच्या मुलीच्या 14 वर्षीय मैत्रिणीचे नंबर घेत तिला सोशल मिडिया प्लैटफॉर्मवर अश्लिल फोटो पाठवत तिच्याशी अश्लिल भाष्य केले. केलेल्या मेसेजमुळे हे कळुन येते कि राजेश हा सदर अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबंध करण्याच्या प्रयत्नात होता.
याबाबत संतप्त पालकांनी व परिसरातील समाजसेवकांनी नराधम राजेशला जाब विचारणा केली असता सुरुवातीला राजेश ने काही झालंच नाही असा सोंग केला परंतु पुरावे असल्याने नंतर मात्र पोपटाप्रमाणे सर्व बोलु लागला. धक्कादायक बाब म्हणजे राजेशच्या असल्या कारस्थानला पाहुन त्याच्या पत्निने जाब विचारणा करण्याऐवजी पालकांची माफी मागत एक चांस द्या अशी मागणी करत माफी मागितली.
फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलीस घटनास्थळी पोहोलचे व आरोपीला अटक करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिपेंटेंट व्हिसा असलेल्या रहिवाश्याने जर गंभिर स्वरुपाचे गुन्हे ब्रिटेन मध्ये केल्यास अश्यांना तातडीने शिक्षा तसेच डिपोर्ट करण्याची तरतुद आहे. सोशल मिडियावर ब्रिटेन व इतर देशातील नागरिकांकडून या नराधमाविषयी जोरदार चर्चा आणि टिका होत आहे. तसेच आरोपीची साथ देणार्या राजेशच्या पत्निचे देखील लोकांकडून जोरदार टिका होत आहे.
मागील काही वर्षांत ब्रिटेन मध्ये अल्पवयीन मुलीींवरील अत्याचारात वाढ झााले असुन त्यात आता भारतीय वंशातील रहिवाश्यांचा ही मोठ्या प्रमाणात हात असल्याचे दिसुन येत आहे.
काही भारतीयांकडून ज्याप्रकारे परदेशातील नागरिकांच्या अल्पवयीन मुला-मुलींवर चुकीचे कृत्याची घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने भारता प्रमाणे आता जागतिक पातळीवर ही अल्पवयीन मुली ‘भारतीय सेक्स प्रिडेटर’ (INDIAN SEX PREDATOR) मुळे सुरक्षित नाही असे बोलले जात आहे.