बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगपरिषद हद्दीतील मांजर्ली विभागातील प्राची हॅरिटेज या इमारतीचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रहिवाश्यांना तसेच ये जा करणार्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर इमारतीमध्ये सांडपाणी योग्यप्रकारे नाल्यात सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा बिल्डरकडून न केल्याने रहिवाश्यांनी बिल्डरवर संताप व्यक्त केला आहे. रहिवाश्यांची समस्या सुटत नसल्याने शेवटी पिडीतांना स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्याशी संपर्क साधुन आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली.
कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीत इमारतीचे बांधकाम करतांना संपुर्ण काम झाल्यानंतरच बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला जातो तसा नियम आहे परंतु काही बिल्डर आपला वशिला लाऊन तसेच पैशाच्या जोरावर कॉम्प्लेक्स मध्ये अर्धवट काम करुन ग्राहकांना फ्लैट विकतात व त्यानंतर उर्वरीत काम जैसे थे अवस्थेत राहुन जाते व फ्लैट धारकांची फसवणुक होते. अश्या प्रकारे आजवर हजारो फ्लैट ग्राहक त्रस्त झालेले आहे परंतु अश्या बिल्डरांवर आजवर कोणतीच कठोर कारवाई होतांना दिसलेली नाही. अगदी याचप्रमाणे मांजर्ली येथे पराग पटेल या बिल्डरकडून प्राची हॅरिटेज या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. नियमाप्रमाणे फ्लैट विकण्यापुर्वी सांडपाण्याची योग्य व्यवस्था करुन देणे हे कर्तव्य बिल्डरचे आहे परंतु त्यांनी ते केले नसल्याचा आरोप फ्लैट धारकांनी लावला आहे.
विशेष म्हणजे रहिवाश्यांची दिषा भुल करण्यासाठी बिल्डर थेट हे काम आमचे नसुन नगरपालिकेचे असल्याने पालिकेच्या ताब्यात हे काम देण्यात आल्याचे सांगुन दिवस टाकण्याचे काम बिल्डरने केले हे रहिवाश्यांच्या प्रतिक्रियेतून दिसुन येते. त्यातच त्रस्त झालेल्या रहिवाश्यांनी शेवटी कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा महिना उलटुनही अद्याप या समस्येविषयी पालिकेमार्फत ही कोणतीच कारवाई न केल्याने आज शेवटी सांडपाण्याची समस्या जास्त प्रमाणात वाढत संपुर्ण रस्त्यावर इमारतीचे सांडपाणी गेल्याने सर्वत्र गाणीचे साम्राज्य झाले आहे.
सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने पिडीत इमारतीतील रहिवाश्यांसह इतर आजु बाजुच्या इमारतींच्या रहिवाश्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचसह ये जा करणार्या वाहन चालकांना देखील गाडी घसरते कि काय या भितीत गाडी चालवावी लागत आहे. सांडपाण्यामुळे मच्छरांमध्ये वाढ होऊन परिसरातील रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला असुन अश्यामुळे एखाद्या जीव गेल्यास बिल्डरच जबाबदार राहील असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे एवढं होऊन सुद्धा अद्याप पालिका प्रशासनातर्फे बिल्डरला जाब विचारणा न केल्याने पालिकेच्या कामकाजावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आता स्थानिक बदलापुर पश्चिम पोलीसांनी हा मुद्दा जातीने घेऊन संबंधीत बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता होत आहे.
याबाबत इमारतीच्या रहिवाश्यांना न्याय मिळावा तसेच दोषी बिल्डरवर कारवाई व्हावी म्हणुन बदलापुर विकास न्युज मिडियाने पोलीसांकडे तक्रारअर्ज देखील दाखल केल्याचे समजते.



