बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात सत्य बोलण्याची किम्मत मोजावी लागले हे आर.टी.आय. कार्यकर्ता कै. अरुण सावंत व इतर आरटीआय कार्यकर्त्यांच्या निघृण हत्यामुळे समजुन येतच असेल परंतु आपल्या प्राणाचे बलिदान दिल्यानंतर सुद्धा सत्य दिर्घकाळ जनतेसमोर न येण्यासाठी काही राजकिय ताकद नियमितपणे पुढाकार घेत असतात हे यंदा दिसुन आले. भाजप आमदार किसन कथोरे यांचे 450 पानी असलेले निकाल एका खाजगी वेबसाईटवरुन थेट गायब आणि वेबसाईटच बंद झाल्याने भारतात चाललय तरी काय अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
नुकताच ब्रिटेन येथील महाराष्ट्र विकास न्युज मिडिया लि. ने बातमी प्रकाशित केली होती कि कशाप्रकारे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या विरोधातील निकाल मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रिम कोर्टाच्या पोर्टलवरुन गायब करण्यात आले आहे. त्यावेळी एक खासजी वेबसाईट केसमाईन.कॉम वर किसन कथोरे यांचे कारस्थान, तेलगी लिंक व अरुण सावंत यांची मुंबई उच्च न्यायालयातील पिटीशनचे 450 हुन अधिक पान दिसुन येत होते. महाराष्ट्र विकास मिडियाकडून बातमी प्रकाशित झाल्यानंतर मात्र काही राजकिय ताकद कार्यरत झाली आणि आता थेट केसमाइम.कॉमची वेबसाईटच बंद झाल्याचे दिसुन येते. यामुळे भ्रष्ट राजकारण्यांचे कारस्थान लपवण्यासाठी कोण काय करणार याचा नेम नाही.
2015 साली सुरु झालेली केसमाईन.कॉम ही कंपनी वार्षिक दीड कोटीचे उलाढाल आणि 30 हजार डॉलरचे प्रोफिट करते. या कंपनीचे लिगल नाव गैगे डाटा सोलुशन प्रा. लि. असे असुन या कंपनीची सीईओ आहेत अनिरुद्ध यादव. संपुर्ण भारतात कोर्टाच्या निकालाच्या वेबसाईटच्या रैंकिंग मध्ये या वेबसाईटचा 12 वा रैंक आहे.
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या वेबसाईटवरील निकालाबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर मात्र निकालच नाही तर संपुर्ण केसमाईन.कॉम वेबसाईटच आता बंद झालेले दिसुन येते. यामुळे आता या वेबसाईटला बंद करण्यामागचा सुत्रधार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे जर नागरिकांनी गुगल मध्ये टाईल केले ‘Kisan Kathore arun sawant court order’ असे टाईप केल्यास सर्वप्रथम ह्याच केसमाईन.कॉम वेबसाईटचे लिंक दिसुन येते, परंतु आता त्या लिंकला क्लिक केल्यानंतर मात्र वेबसाईट बंद झाल्याचे समजते. पुर्वी याच वेबसाईटवर मुंबई उच्च न्यायालयाचा संपुर्ण निकाल प्रकाशित करण्यात आला होता.
अगदी याचप्रमाणे किसन कथोरे यांनी केलेल्या CIVIL APPEAL /4261/2007 बाबत नागरिकांनी अधिक तपास गुगल द्वारे केल्यास इतर ही वेबसाईटचे लिंक सापडतील परंतु जेव्हा क्लिक कराल तेव्हा त्या वेबसाईटवरुन निकाल काढुन टाकल्याचे दिसुन येते. उदाहरणार्थ https://www.indianbarassociation.org/6381/ इंडिनय नैशनल बार असोसिएशनच्या वेबसाईटवर सुद्धा हीच अवस्था पाहायला मिळेल. रिड मोर (अधिक वाचा) वर क्लिक केल्यानंतर मात्र उप्स… दि फाईल वॉस नॉट फाऊंड अर्थातच तेथुन ही निकाल काढण्यात आले आहे.
बदलापुरचा एक रहिवाशी ज्याने मतदारांच्या हितासाठी जनहित याचिका दाखल केली, मतदारांची फसवणुक करणार्या आमदाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणि मुंबई उच्च न्यायालय – सुप्रिम कोर्टासमोर उघडकीस केला व त्यानंतर जीव ही जमावला त्या सत्याला लपवण्यासाठी आज ही ज्याप्रकारे समाजकंटकांकडून जे काही प्रयत्न सुरु आहे त्यामुळे खरंच आपला देश महान हे म्हटल्याने महान होणार आहे काय? हा प्रश्न आता भारतीयांना पडत आहे.



