मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मतदार पुन्हा गुन्हेगारांना आमदार करुन 5 वर्ष सुरक्षेच्या प्रश्नावर बोंबलत बसणार?

Date:

-मुंबई उच्च न्यायालयात आणि सुप्रिम कोर्ट ही आमदार किसन कथोरे यांनी मतदारांची फसवणुक केल्याचे झाले सिद्ध

-मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदार यंदा काय निर्णय घेणार?

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मुरबाड – बदलापुर व इतर शहर व ग्रामिण भागातील मतदार यंदा मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार म्हणुन पुन्हा गुन्हेगारी स्वरुपाच्या उमेदवाराला निवडुन आणणार कि स्वच्छ चारित्र्य असलेल्या उमेदवराला हे मतदारांच्या पुढील 5 वर्षाचे भविष्य ठरवणार आहे.

मुरबाड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भाजपा पक्षाचे किसन कथोरे आहेत. हे मागील 3 वेळेस आमदार म्हणुन निवडुन आले. यांच्यावर मतदारांची फसवणुक केल्याचा तसेच इतर गंभिर स्वरुपाचे गुन्हे केल्याचा गुन्हा दाखल आहे. हे आम्ही नाही तर स्वतः आमदार किसन कथोरेच आपल्या निवडणुकीच्या प्रतित्रापत्रात दर निवडणुकीत दाखल करतात. यंदाही किसन कथोरे आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहणार आहे व त्यांच्यावरील गुन्हे हे सिद्ध झालेले आहे व सुप्रिम कोर्टातुनही त्यांचे अर्ज फेटाळले असे असले तरी यंदा मुरबाड विधानसभा मतदार संघाचे मतदार स्वच्छ चरित्र असलेल्या उमेदवराला मत देणार आणि विधानसभेत पाठवणार कि पुन्हा कथोरेंनाच मतदार हे बघणे महत्वाचे आहे.
किसन कथोरे यांनी एका मागील विधानसभेच्या निवडणुकीत थेट मतदारांची फसवणुक केली असा त्यांच्यावर आरोपच नाही तर मुंबई उच्च न्यायालयात आणि सुप्रिम कोर्टात आरोप सिद्ध सुद्धा झाले आहे. फसवणुक करणार्या आमदार किसन कथोरे विरोधात कोर्टात पिटीशन करणारे समाजसेवक कै. अरुण सावंत आज हयातीत नाहीत. काही वर्षांपुर्वी त्यांना अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले होते. गोळीबार मुळे त्यांना अपंगत्व आले व अनेक वर्ष ते अपंगत्वाने ग्रस्त होते व शेवटी त्यांनी प्राण सोडले. त्या आरटीआय कार्यकर्त्याचा एक प्रकारे भ्रष्ट आणि गुन्हेगारी राजकारणाने बळी गेला हे स्पष्टपणे दिसुन येते. मतदारांना सत्य काय आहे हे दाखवण्यासाठी एका आरटीआय कार्यकर्त्याने एक प्रकारे बलिदान दिले होते.

मागील अनेक वर्ष बदलापुर सह मुरबाड आणि अंबरनाथ येथील ग्रामिण भागात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन येते. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर पोलीस ही कारवाई करण्यापुर्वी राजकिय दाबव आणि नेत्यांच्या फोन मुळे पोलीसांचे देखील हात बांधले गेले असल्याचे आजवर दिसुन आले त्यामुळे पिडीतांना आजवर न्याय मात्र मिळाले नाही. त्यातच नुकताच बदलापुरात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची घटना, भाजप शाळा व्यवस्थापकाला वाचवण्याचा प्रयत्न आणि आंदोलन करणार्यांवर पोलीसांकडून कठोर कारवाई हे सर्व पाहिल्यावर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवराला निवडुन दिल्यास समाजात काय अवस्था होते याचे अतिशय उत्तम उदाहरण मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांना मिळाले आहे. त्यामुळे आता एवढं होऊन सुद्धा पुन्हा गुन्हे दाखल असलेल्या व कोर्टात गुन्हा सिद्ध झालेल्या उमेदवाराला मतदान होणार कि स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवरालांना यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुळात गुन्हेगारी करणार्या नेत्यांना पुन्हा आमदार केल्यास पुढचे 5 वर्ष सुरक्षेच्या प्रश्नावर बोंबा मारुन काहीही होणार नाही असे म्हटल्यास वागवे ठरु नये.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...