-महावितरणच्या अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- बदलापुरात एका अल्पवयीन मुलाला विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे ज्यामुळे बदलापुर महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
बदलापुरात क्रिकेट खेळत असतांना चेंडू पत्र्यावर गेल्याने ते काढण्यासाठी अल्पवयीन मुलगा जेव्हा पत्र्यावर चढला असता त्याजवळच असलेल्या हायटेन्शन तारेने वीजेचा शॉक लागुन तो मुलगा लांबवर फेकला गेला व शॉपमुळे जखमी ही झाला. त्यानंतर पिडीतेला रुग्णालयात उपचारासाठी स्थलांतरीत करण्यात आले.
सदर हाईटेंशनची तार अतिशय खाली असल्याने हा प्रकार घडला असुन यामुळे पुन्हा एकदा बदलापुर येथील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार दिसुन आला. यामुळे महावितरण विभागावर स्थानिकांनी चांगलाच संताप व्यक्त करतांना दिसले.
याबाबत राष्ट्रवादी बदलापुर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी देखील संबंधीत महावितरणच्या अभियंत्यावर तातडीने स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
महावितरण विभागाचे बदलापुर येथील अधिकारी व अभियंते यांच्या विरोधात या आधि सुद्धा स्थानिक बदलापुरकरांनी अनेक तक्रारी केल्या आहे परंतु वरिष्ठांकडून कारवाईच होत नसल्याने अधिकारी व अभियंते देखील मग्रुर झाल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरात महावितरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनेक कामात दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक रहिवाशी इमारतीच्या अतिशय जवळील हाईटेंशनची वायर जाते व स्थानिक समाजसेवक आणि जागृक नागरिकांनी तक्रार करुन सुद्धा महावितरण तर्फे कोणतीच कारवाई केली जात नाही. यात नुकताच झालेल्या अल्पवयीन मुलाच्या अपघातामुळे पुन्हा एकदा महावितरण बदलापुर विभागाचा भोंगळ कारवाई दिसुन येत आहे.
बदलापुर पोलीस ठाण्याने तातडीने या घटनेची दखल घेत महावितरणच्या अधिकार्याविरोधात कारवाई करणार का यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



