उल्हासनगरात शिंदे गटाचा कार्यकर्ता सुरजीत पंजाबीचा खंडणीचा कारभार !

Date:

स्थानिक उल्हासनगर पोलीसांची मात्र बघ्याची भुमिका

बिल्डर ते बार चालकांना खंडणीसाठी भाईचा फोन

उल्हासनगर (महाराष्ट्र विकास मिडिया)- उल्हासनगर शहरात अनेक अनैतिक धंदे राजरोसपणे चालतात पण त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळणीचे काम जोमाने सुरु असल्याने उल्हासनगर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीत मागील अनेक वर्षांत जोरदार वाढ झाल्याचे दिसुन येते.

नुकताच शिंदे गटातील उल्हासनगर युवा सेनेचा सुरजीत पंजाबी जीवघेणा हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने वादाच्या भोवर्यात आहे त्यातच आता उल्हासनगर शहरातील अनेक व्यवसायिकांनी आमच्याकडे खंडणी उकळण्याचे काम शिंदे गटातील कायर्कर्ता सुरजीत पंजाबी कडून होत असल्याचे सांगितल्याने उल्हासनगरातील पोलीस प्रशासन या हप्ता कल्चरली थांबण्यासाठी काय भुमिका घेणार ? असा प्रश्न उपस्थति होत आहे.

उल्हासनगरात देशी दारुच्या अनधिकृत्त व्यवसायापासुन ते क्रिकेट सट्टा, जुगाराचे अड्डे, वेश्या व्यवसाय व अमलीपदार्थ विक्रीचे धंदा राजरोजपणे सुरु आहे. स्थानिक पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका घेतांना आजवर दिसुन आले तर त्याचा फायदा स्थानिक पातळीवर काही राजकिय पक्षातील नेत्यांच्या चेल्यांकडून घेतांना दिसुन आले. पोलीसात आणि पालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल करायचे, अनैतिक धंदे चालवणार्याला ब्लैकमेल करायचे व पैसे उकळल्यानंतर तक्रार मागे घ्यायचे हा एक ट्रेंड उल्हासनगरात अनेक वर्षांपासुन दिसुन आले. हा ट्रेंड संपुष्टात आणण्यासाठी ब्रिटेन येथील महाराष्ट्र विकास न्युज मिडिया लि. कार्य़रत असुन तातडीने अनैतिक धंद्यांवर कारवाईची मागणी आता होत आहे. 

विशेष म्हणजे अश्या अनेक अनैतिक धंद्यांमुळे शहरात जीवघेणा हल्ला, गोळीबार, मारहाणीची घटना व इतर गुन्हे घडत असल्याने स्थानिक पोलीसांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षीत आहे. त्यातच अश्या गुन्ह्यांना पाठीशी घालत खंडणी उकलणार्या कार्यकर्त्यांचा देखील समाचार पोलीसांना घेतले पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे.

शिंदे गटाचा युवा कार्य़कर्ता सुरजीत पंजाबी ह्याच्या हस्तकाकडून मागील अनेक महिन्यांपासुन अनेक जुगार चालकांना, बिअर बार चालकांना, बिल्डरांना व व्यवसायिकांना फोन गेल्याने अनेकांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर मिडियाजवळ माहिती दिली व खंडणी मुळे त्रस्त झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी अनैतिक धंद्यांवर कारवाई करतांचा हप्ता कल्चर चालवणार्याचा ही तातडीने चौकशी केल्यास शहराची गुन्हेगारी थांबण्यास मदत योईल असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

एकुणच भारतात व महाराष्ट्र राज्यात बेरोजगारी अश्या थराला जाऊन पोहोचली आहे कि, बहुतांश युवा ज्याला आपल्या भविष्य आणि करिअर याबाबत काहीही कल्पना नाही व शिक्षण ही नाही त्यामुळे शेवटी एखाद्या पक्षाचा झेंडा पकडून त्या पक्षाच्या नेत्याला बाप मानुन शहरात भाईगिरी करताना, सोशल मिडियावर रिल बनवतांना व दहशत पसरवुन पैसे उकळतांना दिसुन आले. अश्यांमुळे प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्यांचा देखील नाव खराब होतो तसेच शहरात खंडणी मागण्याच्या प्रकारात ही वाढ होते. विशेष म्हणजे अश्या बेरोजगार तरुणांच्या खोट्या शान ला पाहुन नवखे युटुबर सुद्धा बळी पडुन स्वतःवर गुन्हे लाऊन घेेत असल्याने उल्हासनगर शहरात हा एक चिंतेचा विषय आहे, पोलीसांना तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...