ओडिसा भरतपुर पोलिस ठाण्यातील कांड
भुवनेश्वर (महाराष्ट्र विकास मिडिया)- भारतात बहुतांश पोलिस विभागातील भ्रष्ट अधिकारी कशाप्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग करतात हे काय नविन नाही परंतु भुवनेश्वर मध्ये नुकताच जो प्रकार घडला त्यानंतर पोलिस खात्यात बलात्कारी प्रवृत्तीच्या व्यक्तिंना कामावर कसे काय घेतले जाते याबाबत आता चर्चा होत आहे. भुवनेश्वर येथील हॉटेल चालक व समाजसेविका पिडीत महिलेची घरी जातांना काही गुंडांची छेड काढली त्यामुळे पिडीत महिला आपल्या होणार्या नवर्या (सेना अधिकारी) सह भरतपुर पोलिस ठाण्यात दाखल झाले. पिडीतेची तक्रार घेण्याऐवजी उलट तिच्या पतिला आर्मिकडे तक्रार करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. तसेच त्यानंतर पिडीत महिलेवरच पोलिसांनी बलात्कार करण्याचा प्रकार केल्याने भारतीय महिला पोलीस ठाण्यात ही सुरक्षित नाही हे दिसुन येते. पिडीत महिला सेनेतील निवृत्त अधिकार्याची मुलगी आहे. त्यामुळे देशाची सेवा करणार्या सेनेतील कुटुंबियातील महिलांना अश्या प्रकारची वागणुक मिळत असल्याचे समजते.
पिडीत महिलेने ज्याप्रकारे मिडियासमोर आपली व्यथा मांडली त्यानंतर भारतात पोलिस खातं कशाप्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग करु शकतात हे दिसुन येते. पिडीत महिला जिच्यावर छेडछाड झाले त्या नराधमांना अटक करण्याऐवजी तक्रार घेण्यास टाळाटाळ करत पोलीसांनी पिडीतेच्या पतिला आर्मिकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारदार आणि पोलिसात वाद झाले. ज्यानंतर रागाच्या भरात पोलिसांनी पिडीतेच्या होणार्या नवर्याला कोणतेही कारण नसतांना पोलिस कोठडीत ठेवले. याबाबत पिडीतेने जाब विचारणा केली असता महिला पोलिसांनी पिडीत महिलेचा गळा दाबत तीचे हात पाय बांधुन एका खोलीत नेले. पिडीत महिलेने स्वतःच्या बचावासाठी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली तसेच गळा दाबणार्या महिला पोलिसाच्या हातावर ही चावा घेतला. पिडीत महिलेला ज्या खोलीत ठेवण्यात आले त्याठिकाणी पुरुष पोलिस कर्मचारी येतो आणि पिडीत महिलेचे अंगवस्त्र काढतो आणि छातीवर लाथा मारतो. विशेष म्हणजे तो तेवढ्यातच थांबत नाही तर पिडीत महिलेचे घातलेली पैंट काढत स्वतःची देखील पैंट काढुन गुप्तांग दाखवुन ‘शांत बसतेच कि बलात्कार करु’ अशी धमकी पोलिसाने दिले असा आरोप पिडीतेने केला आहे. ओडिशातील भरतपुर पोलीसांच्या अश्या कृत्यामुळे संपुर्ण राज्यात आणि देशभरात त्या बलात्कारी पोलिसाची घोर निंदा होत आहे.
घटनेबाबत मिडिया आणि सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर तातडीने पोलिस उपायुक्त नरेंद्र कुमार बेहरा यांच्या नेतृत्वाखाल क्राइम ब्रांच च्या 5 सदस्यांची टीम घटना स्थळी पोहोचले. टीम द्वारे तपास करतांना 4 तास लागले विशेष म्हणजे त्या तपास कार्यात ही विघ्न टाकण्यात आल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे संपुर्ण पोलीस एक ही सीसीटीव्ही कैमरा उपलब्ध नव्हते तसेच आईआईसी दीनाकृष्ण मिश्रा देखील अनुपस्थित होते.
पोलीसांच्या अश्या कृत्यामुळे भरतपुर पोलिस ठाण्याच्या 5 पोलिसकर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांमध्ये आईआईसी दीनाकृष्ण मिश्रा, सब इंस्पेक्टर बैसलिनी पांडा, एएसआई सलिलामयी साहू, सागरिका रथ आणि कांस्टेबन बलराम हांडा यांच्या नावाचा समावेश आहे.
या घटनेनंतर महिला आयोगाने देखील पोलीस उपायुक्तांकडे रिपोर्ट देण्यात मागणी केली आहे. एकुणच भारतातील काही भ्रष्ट पोलीसांकडून अश्या प्रकारचे कृत्य हे धक्कादायक आणि लाजिवणारी कृत्य असुन यामुळे पुन्हा एकदा भारत देशात आणि जागतिक पातळीवर भारतीय पोलीसांच्या नावाची पार बदनामी होत आहे.