ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला होता . शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या निमित्ताने मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाईशी निगडित ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्या सादर केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून.सिद्धार्थ संजय पांडे, युवासेन निरीक्षक, ठाणे-पालघर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ‘ब्रो ठाणे बदलतंय!’ मिरवणुकीची सुरवात करण्यात आली यावेळी शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के या वेळी संजय चिचकर अध्यक्ष,दीपक निकम सचिव, सखाराम अहिरे खजिनदार,अमित निकम आदि मान्यवर उपस्थित होते.धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून मिरवणूकचे प्रस्थान झाले.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या मिरवणुकीत पारंपरिक दिंडी, विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते .तसेच श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केलेले ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू या मिरवणूकीत सहभागी होते. शिवाय नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होत्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित होते या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक, मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूहाने सहभाग घेतला