कल्याण गैंगस्टर नितीन सर्पे आणि ठाण्याचा अभंगे मध्ये कशा प्रकारचे घनिष्ठ संबंध?
ठाणे (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच 12 ऑक्टोबर रोजी ज्याप्रकारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे पुर्व मंत्री बाबा सिद्धीकी यांची बिश्नोई गैंगच्या मोरक्यांनी गोळ्या झाडून निघृण हत्या केली. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्र आणि भारतात राजकिय वातावरण तापल्याचे दिसुन येते. महाराष्ट्र पोलीस खात्यातील मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीसांकडून तडकाफडकी कारवाई होत असुन अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. कल्याणचा गैंगस्टर नितीन सर्पेसह इतर आऱोपींना देखील अटक करण्यात आले आहे 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे समजते.
बाबा सिद्धीकी हत्याकांड तसेच कैनडा सरकारकडून ज्याप्रकारे गैंगस्टर बिश्नोईचं नाव अनेक गुन्ह्यात घेतलं जात आहे त्यामुळे भारत देशाचं नाव संपुर्ण जगभरात बदनाम होतांना दिसुन येते. पोलीसांकडून कारवाई होत असतांनाच आता ठाण्यातील नागरिकांनी देखील ठाण्याच्या त्या भावी बिश्नोई पार्ट 2 उर्फ कुख्यात स्वयंघोषीत डॉन सिद्धेश अभंगेचा ही कार्यक्रम निकाली लावण्याची मागणी जोर धरत आहे. ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी आता अभंगे या गुंडाच्या टोळीचेही पोलीसांनी मुसके आवळावे अशी मागणी होतांना दिसुन येते.
ठाण्याचे माजी पालकमंत्री व सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचा लाडका कार्यकर्ता म्हणुन सिद्धेश उर्फ सिद्धु अभंगे या कुख्यात गुंडाची ओळख आहे. ठाण्यातील कोपरी, चितलसर, वर्तकनगर आणि इतर पोलीस ठाण्यात खंडणी वसुली, धमकावणे, हत्यार बाळगणे, दहशत पसरवणे तसेच अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या अनेक गुन्हे शिंदेंच्या या लाडक्या कार्यकर्त्यावर दाखल आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2019 दरम्यान महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले व औषधिद्रव्यविषयक गुन्हे (एमपीडीए एक्ट) कायद्या अंतगर्त सिद्धेश अभंगे या स्वयंघोषीत युट्युब भाईला नाशिक रोडच्या तुरुंगवास ही भोगावा लागले होते परंतु त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले व डॉन अभंगेची पोलीस कोठडीतून सुटका झाली.
अभंगे हा पोलीसांच्या हिस्ट्रीशीटर वरचा गुन्हेगार असुन ह्याचे मोरके गैंग आणि डॉन म्हणुन ठाण्यात दहशत पसरवतात. बिल्डरांकडे खंडणी मागणे, व्यापार्यांना धमकावणे व हप्ते वसुली करणे, अमलीपदार्थाची विक्री करणे तसेच तस्करी करणे या अश्या अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे काम अभंगे गैंगकडून होत असुन चितलसर पोलीस ठाण्यात 13 हुन जास्त गुन्हे दाखल असल्याचेही समजते. विशेष म्हणजे हप्ते वसुली करतांना सिद्धेश अभंगे फाऊंडेशनच्या नावाखाली चेकद्वारे ही वसुली केली जात असल्याची माहिती गोपनिय सुत्रांकडून समजते.
पोलीस रिकोर्डनुसार घोडबंदर याठिकाणी दंगल घडवण्यात ही अभंगेचा सहभाग होता.
गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याणचा गैंगस्टर नितीन सर्पे ज्याला नुकताच पोलीसांना बाबा सिद्धीकी हत्याकांड मध्ये अटक केले त्या सप्रे सह अभंगे गैंगचे घनिष्ठ संबंध असुन हा नेटवर्क कल्याण, बदलापुर, कळवा, पुणे, सोनापुर ते थेट हैदराबाद पर्यंत कार्यरत आहे.
त्यामुळे भविष्यातील अंडरवर्ड डॉन पार्ट टू ठाण्याचा बिश्नोई होण्यापुर्वीच महाराष्ट्र पोलीस खात्याने तातडीने सिद्धेश अभंगे व गैंगवर नियंत्रण आणले पाहिजे असे मत ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
सध्या ज्याप्रकारे बिश्नोई गैंगकडून झालेल्या हत्याकांड नंतर महाराष्ट्र पोलीस खातं गुन्ह्याचा कसोसीने तपास करत असतांना कुख्यात डॉन अभंगेची देखील चौकशी करणार कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जवळचा असल्यामुळे त्याच गुंडाला महाराष्ट्र पोलीस खातं सलाम ठोकणार यावरच सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)