बदलापूर (बदलापुर विकास मिडिया)- सत्तेचा आणि पैश्यांचा नषा कोणाता काय करायला लावणार हे सांगता येत नाही. परंतु सत्ता हातात अजुन आली नाही आणि गुंडगिरी आणि दहशत सुरु करणारे ही महाभाग बदलापुरात लाभल्याचे दिसुन आले.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे बदलापुर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यांनी एका कंपनीच्या मालकाला कंपनीच घुसुन कार्यकर्त्यांच्या समक्ष व्हिडीओ शुटींग सुरु असतांना मारहाण केली. मारहाणीचा आरोप नसुन थेट मारहाणीचे व्हिडीओ पुरावा म्हणुन जनतेला पाहयला मिळत असुन आता शैलेश वडनेरे यांच्या सामान्य मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शैलेश वडनेरे हे यंदा मुरबाड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून आमदारकीची निवडणुक लढवण्यास इच्छुक होते. वरिष्ठ पातळीवरही त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याचा विचार सुरु होता. त्यातच आमदार होण्यापुर्वीच शैलेश वडनेरे यांनी खुल्लम खुल्ला गुंडगिरी दाखविल्याने आमदार झाल्यावर काय दिवे लावणार या भितीने मतदारांनी आता वडनेरेंच्या मारहाणीचा व्हिडीओ शेअर करत बदलापुर शहरात गुंडगिरीचा विरोध केला आहे.
शैलेश वडनेरे हे काही कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी सदर कंपनीत गेले होते व कंपनीच्या मालकासोबत बोलत असतांना थेट वडनेरेंनी कंपनीच्या मालकाच्या तोंडावर चापट मारले. विशेष म्हणजे जर लोकप्रतिनिधीच कायदा हातात घेणार तर सामान्य कार्यकर्ते शहरात काय करतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे व लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा नेहमीच भानात ठेऊन वावरले पाहिजे परंतु कदाचित सत्ता मिळण्यापुर्वीच आमदारकीची नशा झाल्याने वडनेरेंनी बिंधास्तपणे गुंडगिरी दाखवुन दिली असे सामान्य बदलापुरकरांकडून मत व्यक्त होत आहे.
कामगारांवर कोणीही अन्याय करु नये याबाबत आजवर अनेक पक्षांनी तसेच स्थानिक पत्रकारांचे ही मत आहे. परंतु न्याय देण्यासाठी तोंडावर चापट मारुन न्याय मिळतो का ? ह्याचे उत्तर आता गुंडगिरी करणार्यांनी देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बदलापुरात अश्या प्रकारे चापट मारणे गुंडगिरी करणे हे नेहमीच गरिब व मध्यमवर्गीय लोकांसमोरच केला जातो. शैलेश वडनेरे सारख्यांनी कधी कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांची पिळवणुक करणार्या ठेकेदाराच्या मालकाला चापट मारहाण्याची हिम्मत का दाखवली नाही. म्हणजे गरिब की जोरु गावकी भौजाई हाच प्रकार बदलापुरात गुंडगिरी करणार्या राजकारण्यांना माहित असावा असेही बदलापुरकरांकडून मत व्यक्त होत आहे.
शैलेश वडनेरे यांनी आजवर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे अनेक चांगले कार्य केले आहे, सामाजिक दृष्ट्या अनेकांना मदत ही केल्या परंतु तसे करतांना कायदा हातात घेऊन मारहाण करत असतील तर लोकप्रियता कमी होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
आमदार होण्यापुर्वीच शैलेश वडनेरे यांची शहरा गुंडगिरी सुरु – मारहाण केल्याने गुन्हा दाखल
Date: