बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- आमदारकीचे स्वप्न पाहणार्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदलापुर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यंदा एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवर्यात सापडल्याचे दिसुन येते. कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी बदलापुर एमआयडीसी कंपनीत घुसुन कंपनीच्या मालकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांचे हे कृत्य मिडियाद्वारे शुट करण्यात आले असल्याने वडनेरेंवरील मारहाणीचा फक्त आरोप नसुन हे स्पष्टपणे दिसुन येत आहे.
शैलेश वडनेरे यांच्याकडून अश्या प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रकार पाहिल्यानंतर बदलापुरातील सुज्ञ नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. एकेे ठिकाणी भाजप आणि शिंदे गटातील गुंड लोकप्रतिनिधींमुळे आधुच संतापलेले मतदार जेव्हा राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींकडूनही त्याच पदचिन्हांवरील वाटचाल पाहिल्यावर योग्य नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी तरी आता कुठे शोधायचा अशी चिंता व्यक्त करत आहेत.
तसेच शैलेश वडनेरे यांनी ज्याप्रकारे कायद्याची भिती न बाळगता बिंंधास्तपणे रागाच्या भरात मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर आता त्यांच्याकडून त्यांचे संरक्षणासाठी बाळगलेले पिस्तुल देखील जप्त करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होतांना दिसुन येते. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अश्या प्रकारे मारामारी करुन दहशत माजवण्याचा प्रकार होत असेल तर अश्यांना ठाणे पोलीस आयुक्त संरक्षणासाठी रिव्हॉल्वर देऊन भविष्यात मोठ्या घटनेची वाट बघत आहे कि काय असा बदलापुरकरांचा सवाल आहे.
शैेलेश वडनेरे यांच्याकडे संरक्षणासाठी रिव्हॉल्वर ते बाळगतात हे सुत्रांकडून समजते परंतु त्या माहितीची पुष्टता महाराष्ट्र विकास मिडियाच्या वतीने करण्यात आलेले नाही याची नोंद घ्यावी.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)