मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांची दुसरी यादी जाहिर करण्यात आले आहे. या मध्ये मुरबाड विधानसभा मतदार संघातून मनसेच्या तिकीटावर श्रीमती. संगिता चेंदवणकर यांना अधिकृत्तरित्या उमेदवारी जाहिर झाल्याचे समजते. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या एक्स हैंडलवर यादी प्रकाशित केले आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघातून संगिता चेदंवणकर ह्या आता मनसेच्या तिकीटावर निवडणुक लढवणार असल्याने वर्तमान आमदार किसन कथोरे यांना चांगलीच धडकी बसली आहे. आधिच मागील अनेक वर्षांपासुनचा नागरिकांचा वर्तमान आमदार कथोरेंवरील रोष त्यात महिला उमेदवार यंदा आमदार होण्यासाठी तसेच मुरबाड मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानभवनात करण्यासाठी प्रयत्नात असल्याने यंदाची निवडणुक मजेशिर ठरणार आहे.
श्रीमती. संगिता चेंदवणकर ह्या कट्टर मनसैनिक आहेत, तसेच त्यांनी आजवर बदलापुर शहरातील व ग्रामिण भागातील तळागळातील कार्यकर्त्यांना हाताळी धरुन सामान्य नागरिकांना न्याय मिळवुन देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केले. बदलापुर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील आई एकविरा मंदिराजवळील अनधिकृत्त दारुचा व्यवसाय बंद करण्यापासुन जे मनसैनिक चेंदवणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला तेव्हापासुन आई एकविरेचा जणु त्यांना आशिर्वादच मिळाल्यासारखं प्रत्येक विषय हाती घेत भ्रष्टाचार्यांना एक्सोस करत जनतेला न्याय मिळवुन देण्याचे काम आजवर मनसेकडून करण्यात आले.
बदलापुर शहरात विविध समस्या सामान्य मतदारांना सतावत असतांना कुळगांव बदलापूर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असले तरी मनसैनिक व त्यांच्या महिला नेत्या श्रीमती. संगिता चेंदवणकर यांनी आजवर निर्भिडपणे मतदारांची बाजु मांडण्याचे काम केले. विशेष म्हणजे चेंदवणकर ह्या लोकप्रतिनिधी नसल्या तरी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त काम करत तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करत आपल्या प्रभागातील मतदारांना मदत केली. त्यामुळे अनेकदा प्रभागातीलच नव्हे तर संपुर्ण बदलापुर शहरातील नागरिक लोकप्रतिनिधी पेक्षा जास्त मनसैनिक व संगिता चेंदवणकर यांना मानतात असे समजते. कचर्याचा ढिग असो किंवा पाण्याची समस्या, लाईट लोडशेडींगची समस्या असो किंवा कामगाराची समस्या या असल्या शेकडो समस्या आजवर सरकारने जरी दुर्लक्ष केले तरी मनसेच्या दरबारात ही समस्या ऐकुन त्या मार्गी लावण्याचे काम चेंदवणकर व त्यांच्या मनसैनिकांनी केल्याने या मागील काही वर्षात मनसेच्या लोककल्याणाच्या कामामुळे पक्ष आणि मनसैनिक बदलापुरात अत्यंत लोकप्रिय होतांना दिसुन आले.
नुकताच ज्याप्रकारे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा विषय ज्यामध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाचे आरोपींना वाचवण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा देखील मनसैनिकांनी कोणत्याही आमिषाला बळ न पडता प्रामाणिकपणे जनतेचा विचार करत रस्त्यावर उतरुन बदलापुर बंद पाडत सरकारचा घाम फोडले. त्यामुळे मनसेचे काम बदलापुरात मागील अनेक वर्षांपासुन अत्यंत चांगल्याप्रकारे झाल्याने यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत संगिता चेंदवणकर यांना त्या सगळ्या चांगल्या कर्माचा फळ नक्कीच मिळेल असे मत सामान्य मतदाराच बदलापुर विकास मिडियाशी बोलतांना व्यक्त करत आहेत.
संगिता चेंदवणकर व त्यांच्या मनसैनिकांनी विशेष करुन सामान्य नागरिकांची जुडण्यासाठी म्हणुन ज्याप्रकारे बदलापुर शहरातील विविध शाळांमध्ये ही त्यांचे नेटवर्क अत्यंत चांगल्या प्रकारे मजबुत ठेवल्याने शहरातील लहान मुलांपासुन ते वयोवृद्ध प्रत्येकाच्या मदतीसाठी वेळीच धाऊन येण्यामध्ये मनसे प्रसिद्ध आहे. तसेच ज्याप्रकारे नुकताच कुळगांव बदलापुर नगरपरिषदेतील सफाई कामगारांची पिळवणुक करणार्या ठेकेदारांविरोधात आवाज उठवत मुख्याधिकारी यांच्याजवळ कामगारांची व्यथा मांडत त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न चेंदवणकर व त्यांच्या मनसैनिकांनी केले हे कौतुकास्पद आहेच पण त्याचसोबत हे ही दिसुन आले कि भ्रष्ट लोकप्रतिनिधींना वठणीवर आणण्यासाठी मनसे पक्ष गरजेचे आहे. त्यामुळे अश्या पक्षाचा जर आमदार मुरबाड विधानसभा मतदार संघात लाभला तर मुरबाड विधानसभा मतदार संघात भ्रष्टाचार थांबण्यास तसेच खर्या अर्थाने विकास काम होण्यास मदत मिळेल असे जाणकारांचे मत आहे.
त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आर्शिर्वादाने ज्याप्रकारे संगिता चेंदवणकर या महिला उमेदवाराला मुरबाड विधानसभा मतदार संघात निवडणुक लढवण्यासाठी तिकीट दिल्याने यंदाची निवडणुक अत्यंत लक्ष वेधणारी ठरणार.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)