भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

Date:

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी

मतदार ठरवतलील कि भाजप आयटी सेलवाले ठरवतील यंदाचा मुरबाडचा आमदार ?

मुरबाड (महाराष्ट्र विकास मिडिया)- पैश्यांचा आणि सत्तेचा माज सत्ताधारी करतात हे आजवर पाहिलच असेल परंतु माज करावा तरी किती हे नुकताच मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार किसन कथोरे व त्यांच्या आयटी सेलकडून दिसुन आले. मतदानाचा दिवस देखील अद्याप आलेला नाही, प्रचार अद्याप सुरु झालेली नाही मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी अद्याप मतदान केले नाही आणि विजयाचे गाफिल करणारे पोस्ट व्हायरल करत एकप्रकारे किसन कथोरे व त्यांच्या आयटी सेलवाल्यांनी मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांची औकातच काढली आहे.
नुकताच भाजप हायकमांडकडून किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर झाले असुन त्यानंतर किसन कथोरे व त्यांचे आईटीसेलवाले सोशल मिडियावर जोरदार प्रचाराला सुरुवात करतांना दिसुन आले. विशेष म्हणजे विकास काम व नागरिकाच्या समस्येवर एक शब्द सुद्धा न बोलणारे भाजप वाले थेट मतदारापुर्वीत किसन कथोरे यांचा विजयी होणारे तसेच रेकॉर्ड ब्रेक मतदार होणारे पोस्ट व्हायरल करुन स्वतःचेच हसु करतांना दिसुन आले. विशेष म्हणजे अश्या पोस्टमुळे मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदार देखील कथोरेंवर संताप व्यक्त करतांना दिसत आहेत.
किसन कथोरे व त्यांच्या आईटी सेल कडून एक पोस्ट व्हायरल करण्यात आले ज्यामध्ये किसन कथोरे यांचे फोटो तसेच ‘खेळ जुनाच आहे, फक्त नव्याने खेळायचं, नियोजन कधीचं झालंय फक्त, आता कार्यक्रम वाजवायचा आहे, फिक्त आमदार कथोरे साहेब’ हे व्हायरल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच दुसर्या पोस्ट मध्ये किसन कथोरे यांना तीन वेळेस मिळालेले मतदान व मार्कशिट व त्या मार्कशिटवर महाराष्ट्राचे गृहमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा सही शिक्का मोर्तब असल्या पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु ही पोस्ट पाहुन मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आश्चर्य़ व्यक्त केले असुन व्हायरल प्रचार फेल ठरतांना दिसुन आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांनी बदलापुर विकास मिडियाशी बोलतांना सांगितले कि, मागील अनेक वर्ष बदलापुर शहर, ग्रामिण सह मुरबाड भागात ही पाण्याची भयंकर समस्या आहे परंतु आमदार किसन कथोरे यांनी आजवर त्या समस्येवर तोडगा काढलेला नाही. सामान्य महिला व अल्पवयीन मुलींवर दिवसाढवळ्या बलात्कार होतात, शाळेत ही मुली सुरक्षित नाहीत परंतु आमदार किसन कथोरे शाळा भाजपच्या पदाधिकार्यांकडून चालवण्यात येते म्हणुन मुग गिळुन गप्प बसतात. शहरात आमदार निधीतून बनविण्यात आलेल्या रस्त्याची दैयनिय अवस्था आहे जणु कामाच्या नावाखाली फक्त सिमेंट कॉक्रीटीकरणात भ्रष्टाचार झाला आहे परंतु आमदार कथोरे याबाबत ठेकेदाराला जाब विचारणा करत नाही, उलट ठेकेदार कथोरेंच्या गळ्यात माळ घालतात. टी.डी.आर. घोटाळा करणारे मुख्य आरोपी मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आमदार किसन कथोरेंना मैनेज करण्यासाठी कथोरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शेकडो लोकांसमोर कथोरेंच्या गळ्यात सोन्याची चेन घालतात आणि टी.डी.आर. घोटाळ्यामुळे बदलापुरातील टैक्स धारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतो परंतु आमदार कथोरे तेथेही गांधारीची भुमिका घेतात. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेतील भ्रष्ट लोकप्रतिनिधीविरोधात बोलल्यास त्या बदलापुरातील मतदाराला आमदाराच्या गुंडांकडून दम दिला जातो आणि दादागिरी केली जाते. मांजर्ली आणि दिपाली पार्क जवळील परिसरात सामान्य फ्लैट ग्राहकांसोबत फसवणुक केली जाते व मारहाण ही केली जाते परंतु बिल्डर हा आमदाराचा माणुस आहे म्हणुन पोलीस आणि प्रशासन कारवाई करत नाही. ह्या अश्या अनेक किस्यांमुळे मागील अनेक वर्ष आमदार किसन कथोरे यांच्यावर बदलापुर शहरी व ग्रामिण भागातील जनता अत्यंत नाराज व संताप व्यक्त करत आहेत मग त्यानंतर देखील कथोरे व त्यांच्या आयटी सेलवाल्यांना विजय आपलाच आहे असा ओवर कॉन्फिडेन्स कुठुन येतो? कुठे इ.व्ही.एम. मशीन हैकचा खेळ कथोरे समर्थकांनी देखील शिकुन घेतले कि काय अशी शंका आता बदलापुरातील सामान्य मतदारांना येत असुन याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
खेळ जुनाच आहे फक्त नव्याने खेळायचं म्हणणारे कथोरे समर्थक आणि भाजप आयटी सेलवाल्याना मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांचे आयुष्य म्हणजे काय खेळ वाटलय कि काय? असा प्रश्न आता सुज्ञ मतदार बदलापुर विकास मिडिया मार्फत विचारत आहेत. नियोजन कधीचं झालंय हा नियोजन नेमकं इ.व्ह.एम मशिल बद्दल आहे कि काय असा ही प्रश्न आता नागरिक विचारतांना दिसत आहेत. त्यामुळे भाजपकडून होणारी विजयाची जाहिरातबाची फोल ठरतांना दिसत आहे.
मागील काही वर्षात भाजप सरकारच्या काळात मर्डर, दंगली व इतर गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना ‘आता कार्यक्रम वाजवायचा आहे’ हे कशाप्रकारच्या कार्यक्रम वाचवण्याच्या विषयी भाजपवाले बोलत आहेत असा ही प्रश्न सोशल मिडियावर अनेक जण विचारतांना दिसत आहे. यापुर्वी एका कार्य़क्रमात किसन कथोरे यांनी कापु म्हटलं तर माणस कापतात हे स्वतःहुन सांगितल्याने कथोरे यांचा राजकिय बैगराऊंड कोणत्या प्रकारचा आहे हे समजत असेलच, त्यातच आर.टी.आय. कार्यकर्ते अरुण सावंत यांना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात ही किसन कथोरे यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भ्रष्ट सरकार आणि लाचार पोलीस प्रशासनामुळे कोर्टात अनेक पुरावे नसल्यामुळे कथोरे सुटले असले तरी आजही ते अरुण सावंत ने केलेल्या केस आणि त्या केसमुळे बाद झालेल्या पदाबाबत बोलण्यास टाळतात.
फक्त वाढदिवस दर वर्षी साजरा करुन आणि जवळच्या कार्यकर्त्यांना ठेकेदार करुन बदलापुर शहराचा तसेच मुरबाड विधानसभा मतदार संघाचा विकास होत असतं तर आज शहरातील व ग्रामिण भागातील मतदार दररोजचं कबाडकष्ट जीवन जगतांना भाजप विरोधात संताप व्यक्त करतांना दिसले नसते परंतु मागील काही वर्षांपासुनची परिस्थिती फार वेगळी आहे आणि आता सुज्ञ मतदार निर्भिडपणे भ्रष्ट नेत्यांना जाब विचारणा करतांना मागे पुढे पाहत नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे यंदा मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदार कोणाला आपला आमदार ठरवणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.


अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…

देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029

(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...

कामगारांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे बदलापुरातील लुख्खे पोलीस

अनेक गुन्हेगारीला स्थानिक पोलीस प्रशासन सर्वप्रथम जबाबदार बदलापुर (महाराष्ट्र विकास...