बदलापुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- बदलापुरात सत्ताधारी आणि त्यांचा झेंडा उचलणारे कार्यकर्ते यांचा मेंदु ठिकाणावर आहे किंवा नाही हेे म्हणण्याची आता सामान्य नागरिकांवर वेळ येत आहे. पोलीसांकडून महत्वाचा आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची एन्काऊंटरच्या नावाखाली हत्या करण्यात येते ज्यामुळे बलात्कार पिडीत मुलीच्या केस नाजुक झाले हे स्पष्ट पणे दिसत असतांना ही पोलीसांनी पिडीतेला न्याय मिळवुन दिला, सरकार ने पिडीतेला न्याय मिळवुन दिला असे म्हणत पेढे वाटण्याचे काम बदलापुर शहराती भाजप व इतर सत्ता समर्थक तसेच पोलीस समर्थक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
परंतु पेढे वाटुन आणि बैनरबाजी करुन सुद्ध सत्य मात्र लपले नाही आणि ते सत्य म्हणजे बलात्कार पिडीत मुलीला व तिच्या पालकाना न्याय मिळालेच नाही हेच कटु सत्य आहे. अक्षय शिंदे हा महत्वाचा आरोपी आजवर पोलीस आणि न्यायलयीन कोठडीत होता तोवर शाळा व्यवस्थापकातील इतर आरोपीं फरार होते. सी.सी.टी.व्ही. गायब पोलीसांवर राजकिय नेत्यांकडून दाबव करण्यापर्यंत आदर्श विद्यामंदिर व्यवस्थापकांची मजल होती. आपटे व इतर आरोपी हे अक्षय शिंदे हयातीत असतांना अटक झाले असते तर प्रकरणातील इतर महत्वाचे मुद्दे व गुढ देखील बाहेर आले असते त्यामुळेच अक्षय़ शिंदेची पोलीसांकडून हत्या करत केस नाजुन करत तातडीने शाळा व्यवस्थापकांना जामिन मंजुर करण्यात आले. विशेष म्हणजे ज्यांचे अटकपुर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले त्या आपटे व इतर आरोपींना कल्याण सत्र न्यायालयातुन जामिन मिळाल्याने बलात्कार पिडीतीने तसेच तिच्या परिवाराने नाराजी व्यक्त केली आहे.
पिडीतेच्या पालकांनी थेट मिडियासमोर आपली व्यथा मांडली असुन त्यांनी स्पष्टपणे आम्हाला न्याय मिळाले नाही हे सांगितले आहे त्यामुळे अक्षय़ शिंदेचा एन्काऊंटर झाल्यामुळे पेढे वाटणार्या येड्यांची जत्रेतील महाभागांकडे आता उत्तर ही नाही. त्यामुळेच ह्या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसुन येते कि, पोलीसांची आणि सरकारची अंधभक्ती केल्यास भविष्यातील गुंडगिरी व अन्याय थांबणार नाही.
पिडीतेच्या पालकांनी आरोपीचा जामिन अर्जाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगत हा आमच्या सह त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा ही अपमान आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे समजते.
पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणुन ज्यांनी आंदोलन केले होते त्यातील अनेक जण आजही जेल मध्ये जामिनाची वाट बघत आहेत परंतु आपल्या या भारतात पोक्सोचा गुन्हा दाखल असलेल्या भाजप पदाधिकार्यांना जामिन मिळणेसाठी पोलीस देखील सहकार्य करत असल्याचे अक्षय शिंदे एन्काऊंटर घटनेतुन पुन्हा एकदा दिसुन येते.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)