अनेक गुन्हेगारीला स्थानिक पोलीस प्रशासन सर्वप्रथम जबाबदार
बदलापुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- ज्या देशाचे पोलीस लुख्खे असतात त्या देशातील नागरिकांना न्याय कधीच मिळु शकत नाही तसेच त्या देशातील गुन्हेगारीची घटना वाढते ह्याचे उत्तर उदाहरण म्हणजे भारतातील विविध राज्यातील पोलीस प्रशासन. महाराष्ट्र पोलील खात्यात लुख्ख्या पोलीसांची सेना म्हणजेच बदलापुरातील पुर्व पोलीस स्थानक हे आजवर अनेकांनी पाहिलेच असेल. मग ते अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण असो किंवा विनयभंग प्रकरण लाचार पोलीसांनी वेळेवर कधीची तक्रार घेत आपले पोलीसी कर्तव्य पार पाडलेले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ही बदलापुर पुर्व पोलीस ठाण्याची पुन्हा पुन्हा कान उघडणी केल्यानंतर सुद्धा हम नही सुधरेंगीचीच भुमिका बदलापुर पुर्व पोलीसांकडून दिसुन येत आहे.
नुकताच बदलापुर शिरगाव एमआयडीसी येथील अंबरबुश या कंपनीकडून अनेक कामगारांना कोणतेही कारण न देता काढुन टाकण्यात आले होते. त्यामुळे पिडीत कामगारांनी दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी बदलापुरातील सहा कामगारांनी पोलीसांकडे धाव घेत तक्रार करण्याची मागणी केली होती. नियमाप्रमाणे अश्या प्रकरणात कायद्यात तरतुद आहे कि पोलीसांनी सदर फिर्यादींचा जबाब नोंदवुन तपास त्यांच्या अखत्यारीत नसले तरी देखील जबाब नोंदवुन कामगार आयोगाकडे पाठपुरावा साठी पाठवायचा हवे होते. परंतु लाचार पोलीसांना पुन्हा पुन्हा
प्रोटोकॉल समजुन येत नसेल तर पिडीतांनी तरी काय करावे.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर सुद्धा पोलीसांनी ना जबाब नोंदवुन घेतले ना तपास करण्याची इच्छा दाखवली. शेवटी त्या पिडीतांनी स्थानिक लोकप्रतिनिधी शैलेश वडनेरे यांच्याशी संपर्क साधत न्याय देण्यासाठी सहकार्य़ करण्याची मागणी केली.
सदर कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी पवार गटाचे लोकप्रतिनिधी शैलेश वडनेरे यांनी सुरुवातीला कंपनीचा मालक सिंघला संपर्क केले परंतु तोडगा काही निघाले नाही म्हणुन समक्ष कंपनीत भेटून कामगारांची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला. कंपनीत कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी गेलेले वडनेरे व त्यांच्या समर्थकांनी कंपनीच्या मालकाला चापट मारत न्याय मिळवुन देण्याऐवजी स्वतःवरच गुन्हा दाखल करुन घेतले.
या सगळ्या घटनेनंतर बदलापुरात विविध संस्थांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केले आहे. मारहाण करणार्या वडनेरेंविरोधात तर नागरिकांनी संताप व्यक्त केलाच परंतु त्याचसह लाचार बदलापुर पुर्व पोलीसांवर ही संताप व्यक्त करत शहरात घडणार्या अनेक गुन्हेगारींना हे लुख्खे पोलीसवालेच जबाबदार अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुन्हा एकदा बदलापुर पुर्व पोलीस स्थानकाची अब्रु उघड्यावर आली आहे.
बदलापुरात एमआयडीसी क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून मागील काही वर्षात मुजोही दिसुन येत आहे. स्थानिक कामगारांना कोणतेही कारण न देता काढुन टाकणे यामुळे अनेक कामगारांची आजवर पिळवणुक होत आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक हे असले कृत्य करतांना आजिबात घाबरत नसल्याने त्यांना स्थानिक नेत्यांचा, कामगार युनियन आणि कामगार आयोगाचा पाठिंबा आहे कि काय अशी शंका आता व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे कामगार आयोगावर देखील पिडीत कामगारांकडून टिका होत असुन कामगारांची समस्या सोडवण्यासाठी कामगार आयोगातील जिल्हा स्तरीय व विभागीय अधिकारी का दखल घेत नाही असा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलीसांच्या अश्या कारस्थानामुळे महाराष्ट्र विकास न्युज मिडियाच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त तसेच मानवाधिकारी संघटनेकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले असुन संबंधीत पोलीसावरही ऑफीस अब्युस चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे समजते.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)