बिनअनुभवी ठेकेदाराला अश्वारुढ पुतळा उभारण्याचा दिला ठेका ; विटंबना झाल्यास जबाबदार कोण?
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- मालवण याठिकाणी आपटे या ठेकेदाराकडून महाराजांचा पुतळा उभारण्यात आला तो पुतळा निकृष्ट दर्जाचे केल्याने पडुन महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आपटे हा आरोपी अनेक दिवस फरार होता व नुकताच पोलीसांनी त्याला अटक केली आहे. ठेकेदाराला फाशीची मागणी महाराजांचे भक्त करत आहेत. परंतु मालवण येथील ह्या घटनेमुळे इतर प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याचे समजते. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेतर्फे नुकताच एका बिन अनुभवी ठेकेदाराला महाराजांच्या पुतळ्याचे काम देण्यात आल्याने पुन्हा एकदा मालवणची पुर्नआवृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन बदलापुरातील शिव भक्तांनी संताप व्यक्त केला आहे.
कुळगांव बदलापुर नगरपरिषदेकडून उल्हस नदीच्या लगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारुढ पुतळ्याचे काम होणार आहे यामुळे शिवप्रमी पालिकेवर आनंद व्यक्त करत होते परंतु त्या कामामागे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सुत्रांकडून समजते. सदर अश्वारुढ पुतळा एका बिन अनुभवी ठेकेदाराला 35 लाख 15 हजार 600 रुपयांचा ठेका देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे सदर ठेकेदाराने आजवर अश्या प्रकारचे एकही अश्वारुढ पुतळा निर्मितीचे काम केले नाही मग ह्याच ठेकेदाराला का म्हणुन ठेका देण्यात आला असा प्रश्न आता बदलापुरातील शिवभक्त विचारत आहेत. विशेष म्हणजे नुकताच ज्याप्रकारे बिनअनुभवी ठेकेदाराला महामानवाचा पुतळा उभारण्याचा ठेका दिल्याने काय होते ह्याचे चित्र आपण मालवण येथे पाहिले त्यानंतर देखील इतर पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने बदलापुरात ही महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा घाट सुरु आहे कि काय असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
सदर ठेक्यात 28 वर्षाचा अनुभ असलेल्या शिल्पकार राजेंद्र आल्हाट ज्यांनी आजवर 300-400 पुतळे बसविले त्यांनी देखील टेंडर भरत एल1 दर 63 लाख 13 हजार रुपये तसेच एल2 दर 95 लाख 28 हजार 600 दराप्रमाणे अर्ज दाखल केले. अश्यावेळी 35 लाख रुपये दर दाखवणार्या बिन अनुभवी ठेकेदाराला ठेका कोणत्या कारणाने देण्यात आले हा संशोधनाचा भाग आहे. पालिकेमार्फत 35 लाख रुपये खर्च करुन जर एका बिनवअनुभवी ठेकेदारामुळे महाराजांच्या पुतळ्याची विटंबना भविष्यात होणार त्याला कुळगांव बदलापुर नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार का? कारण ठेकेदार घटना घडल्यानंतर मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत फरार होण्याचा आजवरचा इतिहास आहे.
त्यामुळे बदलापुरातील हजारो शिवभक्तांनी आता या विषयी बदलापुर विकास मिडियाजवळ प्रतिक्रिया देतांना मागणी केली आहे कि तातडीने कु.ब.न.प. ने ठेका देण्यापुर्वी ठेकेदाराची पुर्ण चौकसी करावे तसेच महामानवाचे पुतळे उभारण्याचे ककाम नवख्या ठेकेदाराला देऊ नये.
याबाबत महाराष्ट्र विकास मिडियाच्या वतीने ही पालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याचे समजते.
अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…
देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029
(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)