मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बिल्डरांचे कारस्थान उघडकीस
बिल्डर सुधीर दामोदर घाटणेकर विरोधीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – बदलापुर विकास
बिल्डरकडून अनेक झाडांची कत्तल ; कु.ब.न.प. लक्ष देणार ?
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- मुबंई, नवी मुंबई, ठाणे व आसपास शहरातील नागरिक बदलापुरात आपला नविन आयुष्य सुरु करण्याच्या हेतुने तसेच निसर्गरम्य ठिकाणी आपल्या परिवार सुरु करण्याच्या स्वप्नातुन बदलापुरात फ्लैट घेण्यासाठी येतात. त्यामुळे बदलापुरात फ्लैट घेणार्या ग्राहकांची मागणी मागील काही वर्षांपासुन जोरदार वाढल्याचे दिसुन आले. परंतु याच ग्राहकांची फसवणुकीच्या प्रकरणात ही आता वाढ झाल्याने फसवणुक करणार्या बिल्डर विरोधात आता ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
बदलापुर पुर्व कात्रप परिसरातील रुबयाना रेसिडेन्सी हे बहुमंजली इमारतीचे बांधकाम काही वर्षांंपुर्वी बांधकाम व्यवसायिक सुधीर दामोदर घाटणेकर यांच्याकडून करण्यात आले. त्यांनी मुंबई येथून फ्लैट घेण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खोटे आश्वासन देऊन व मोठमोठे स्वप्न दाखवुन 30-35 लाखाला फ्लैट विकले. फ्लैटचा ताबा मिळाल्यानंतर मात्र ग्राहकांची फसवणुक झाल्याची अनेकांच्या लक्षात आले. नुकताच मुसळधार पावसामुळे इमारतीच्या जवळील नाला फरल्याने कमरेपर्यंत पाणी साचल्याने पुन्हा एकदा परिसरातील रहिवाश्यांनी संताप व्यक्त करत आपली व्यथा स्थानिक पत्रकाराकडे मांडत न्यायाची अपेक्षा केली.
स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर रहिवाश्यांची प्रतिक्रिया घेतली असता अनेक रहिवाश्यांनी बिल्डरकडून फसवणुक झाल्याची कबुली दिली. फ्लैट घेतांना बिल्डरने अनेक आश्वासन केले होते ज्यामध्ये गार्डन, प्रवेश द्वार, रस्ते, 24 ताश पाणी या सगळ्या सुविधांचा समावेश होता परंतु त्या आश्वासन अद्याप पुर्ण केले गालेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्या इमारतीत राहणार्या चिमुकल्यांनी सुद्धा कशाप्रकारे पाणी साचल्याने त्रास होते ते सांगितले.
सदर घटनेनंतर अनेक विषय उघडकीस झाले. त्यातील पहिला म्हणजे बिल्डरने दिलेल्या अनेक आश्वासन पुर्ण न करणे परंतु त्याचसोबत स्थानिक प्रशासनातर्फे देखील नागरिकांना सार्वजनिक सुविधा देण्यात येत नाही हे रहिवाश्यांच्या प्रतिक्रियेतून समजले. इमारतीजवळील नैसर्गिक नाला असलेल्या ठिकाणी गाणीचे साम्राज्य आहे त्याचसोबत परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे परंतु कुळगांव बदलापूर नगरपरिषदेकडून नियमितपणे साफसफाईचे काम करण्यात येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे डासांच्या समस्येत ही वाढ झाल्याने त्या इमारतीतील अनेक रहिवाश्यांना व त्यांच्या मुलांना डेंगुचा आजार ही झाला ज्यामुळे रुग्णालयात दाखल करत अनेकांना आर्थिक नुकसान ही सहन करावा लागला. विशेष म्हणजे एवढं होऊन सुद्धा अद्याप बिल्डर घाटणेकर कडून कोणतीही हालचाली होतांना दिसत नसल्याने बिल्डर विरोधात फसवुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
त्याचसोबत रहिवाश्यांनी अजुन एक महत्वाची माहिती दिली ती म्हणजे बिल्डरकडून अजुन इमारतीच्या बांधकामासाठी मोठमोठे 10-15 झाडांची कत्तल करण्यात आली व झाडे कापल्यानंतर नाल्यातच टाकुन देण्यात आले. या विषय गंभिर असुन कुळगांव बदलापूर नगरपरिषदे ने तातडीने पोलीस ठाण्यात बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी आहे.
सदर इमारतीच्या बाजुलाच हायटेन्शनच्या वीजेचे तार जात असल्याने सदर इमारतीला परवानगी देतांना संबंधीत विभागाने ग्राऊंडलेवर वर निरीक्षण केले का हा देखील एक मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकुणज मुंबई मधुन काही बिल्डर ज्याप्रकारे बदलापुरात इमारतीचे बांंधकाम करतांना अनेक नियमांना पायमल्ली तुडवत असल्याने यावर रोठ लावण्यासाठी तातडीने स्थानिक बदलापुर पुर्व पोलीसांनी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बदलापुर विकास मिडियाकडून करण्यात येत आहे.
इमारतीचे बांधकाम करतांना नगररचना विभागात ज्याप्रकारे नकाशा देण्यात आला होता त्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम झाले आहे का तसेच रहिवाश्यांना ये जा करण्यासाठी अद्याप योग्य रस्ता का देण्यात आले नाही, प्लॅन मध्ये गार्डन दाखविले असतांना ही गार्डन कुठे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असुन कु.ब.न.प. च्या नगररचना विभागाने देखील या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच परिसरात नियमित पणे औषध फवारणी का होत नाही हा देखील एक महत्वाचा प्रश्न असुन नागरिकांच्या कर रुपी पालिकेच्या तिजोरीत जमा होणार्या पैश्यातुन फवारणीसाठी लाखो रुपये ठेकेदाराला बिल अदा करण्यात येते मग ते फवारणी करतात तरी कुठे असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
कात्रप परिसरातील या इमारतीच्या रहिवाश्यांप्रमाणेच बदलापुर शहरात इतर ही ठिकाणी अनेक बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणुक झाली असुन हा मुद्दा आता जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.