बदलापुरात माणिसकी मेल्यात जमा ? बलात्काराप्रमाणे इतरही आता विकृतीच्या मार्गावर?
बदलापुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- बदलापुरात ऑगस्ट महिन्यात आदर्श विद्या मंदिरातील सफाई कर्मचारी अक्षय शिंदेकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली. 23 सप्टेंबर रोजी त्या आरोपीची एन्काऊंटर मध्ये पोलीसांंकडून हत्या करण्यात आली. मृत अक्षय शिंदेचं पार्थिव त्याचे कुटुंबिय बदलापुरात अंत्यसंस्कारासाठी आणणार असतांना बदलापुर पश्चिम मांजर्ली येथील काही समाजसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला.
मागास्वर्गीय समाजाचे कार्य़कर्ते व समाजसेवक नंदकुमार कांबळे व त्यांच्या इतर सहकार्यांनी मिडियासमोर प्रतिक्रिया देतांना आमच्या स्मशान भुमीत अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार करुच देणार नाही त्याने बलात्कार केला आहे त्याला बाहेर कुठेही अंत्यसंस्कार करावे परंतु इथे या स्मशानात करुच देणार नाही असे म्हणत आपली भुमिका मांडली.
नंदकुमार कांबळे यांच्या अश्या प्रतिक्रियेमुळे सोशल मिडियावरुन त्यांच्या मानसिकतेविषयी जोरदार टिकेला सुरुवात होत आहे. अक्षय शिंदे या बलात्काराचा आता मृत्यु झाल्याने प्रत्येक मनुष्याच्या शेवटच्या अंतसंस्काराचा हक्क ही आता बदलापुरात राजकारण केले जाईल का असा सवाल आता जागृक नागरिकांकडून विचारला जात आहे. बलात्कारी मेला त्यामुळे पिडीत मुलीवर बलात्काराच्या घटनेत अजुन कोण कोण शामिल होता या सर्व घटनेची संपुर्ण सत्य माहिती मिळणे अत्यंत कठीण असुन पोलीसांवर यामुळे उच्च न्यायालयाने ताषेरे ओढले आहे त्यामुळे पोलीस आणि इतर आऱोपींवर संताप व्यक्त करण्यापेक्षा ज्याप्रकारे काही समाजसेवकांकडून स्मशानात राजकारण सुरु आहे त्यामुळे बदलापुरची राजकारणाविषयी मानसिकता किती खालच्या पातळीवर गेली आहे हे
दिसुन येते.
विशेष म्हणजे नंदकुमार कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माननारे समाजसेवक आहेत व त्या समाजातील आहेत. डॉ. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली तसेच घटनेने जो अधिकार प्रत्येक मनु्ष्याला दिला ते देखील कांबळे कसे काय विसरले याबाबत अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच महामानव छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जेव्हा आपल्या दुश्मनाचा खात्मा केला होता त्याच्या मृत्युनंतर त्याचे शरिरावर अंतक्रिया सन्मानाने करण्यात आले होते हा महाराष्ट्राचा इतिहास आज अनेकजण विसरतांना दिसुन आले.
स्मशानाच्या नावाखाली होणारा ढिंगाणा पाहिल्यावर अनेकांनी पिडीत मुलीच्या बाजुने प्रतिक्रिया देतांना सांगितले कि, अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या परिवारावर हे काही आज बेतले आहे त्याला फक्त अक्षय शिंदेच नसुन शाळेतील व्यवस्थापक व भ्रष्ट पोलीस व सोशल मिडियावर बदनामी करणारे गावगुंड राजकिय नेते जबाबदार आहेत. त्या आरोपींविरोधात आवाज उठवण्याची या समाजसेवकांमध्ये हिम्मत आहे का? असा ही सवाल बदलापुरकरांनी केला.
त्यामुळे बदलापुरात विरोध करतांना काय विचार करुन विरोध केला जातो हे अक्षय शिंदेच्या विविध घटनांमुळे पुन्हा एकदा दिसुन आले. फक्त विरोधच करायचा कि विरोध करतांना तत्व आणि पिडीत मुलीच्या खर्या अर्थाने न्याय मिळवुन देण्यासाठी विरोध करायचा हवा हे आता बदलापुरातील अनेक राजकिय कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे सामान्य बदलापुरकरांचे मत आहे.