ठाणे (महाराष्ट्र विकास मिडिया)- अक्षय शिंदे या आरोपीच्या पॉईंट ब्लैंक एन्काऊंटर करणारा पोलीस अधिकारी संजय शिंदे हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट व सध्या तुरुंगात असलेला भ्रष्ट पोलीस अधिकारी प्रदिप शर्मासोबत पुर्वीत काम केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात फेक एन्काऊंटर करणार्या या गुरु आणि त्याच्या चेल्याचं खास रिपोर्ट
संजय शिंदे या पोलीस अधिकार्याने ज्याप्रकारे अनेक पोलीस असतांना सुद्धा आरोपी एका महत्वाच्या गुन्ह्यात असुन त्याला कमरेवर किंवा कमरेखाली गोळी मारुन जखमी करण्याऐवजी थेट डोक्यावर गोळी मारत त्याचा एन्काऊंटर केला. ज्याप्रकारचे घटनेचे वर्णन त्याठिकाणातील पोलीसांनी केले आहे त्यामुळे हे एन्काऊंटर नाही तर फेक एन्काऊंटर द्वारे आरोपीची हत्या केल्याचे दिसुन येते. मुंबई उच्च न्ययालायनाने ही आता पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करुन तातडीने सत्य बाहेर येण्यासाठी काम करा असा आदेश दिले आहे. संजय शिंदे हे यापुर्वी एन्टीएक्टॉर्शन सेल मध्ये कार्यरत होते. त्याठिकाणी ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मासोबत त्यांनी काम केले होते.
विशेष म्हणजे संजय शिंदेद्वारे अक्षय शिंदे या आरोपीचा करण्यात आलेले एन्काऊंटर व एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्माने केलेल्या एन्काऊंटरचे ठिकाण अतिशय जवळपासच आहे. एकाचा जीव जातो मुंबा देवीच्या पायथ्याशी तर दुसर्याचं डीव जातो घोडबंद रोडवरील सुमसाम रस्त्यावर.
2021 साली 25 फेबुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या अंतालिया इमारतीखाली 20 जेलाटिन बॉम्ब ठेऊन दहशत पसरवण्याच्या प्रकरणात जनतेने अनेक भ्रष्ट पोलीसांचा खरा चेहरा पाहिला. त्यातीलच एक चेहरा म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा जे आज तुरुंगात आहेत. तत्कालिन मुंबई पोलीसचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना त्यावेळी मनसुख हिरेन ला संपविण्याचे कार्य सोपविले होते. मनसुक हिरेन याला संपविण्या मागचं उद्देश म्हणजे त्यावेळी अनेक तपास यंत्रणा भ्रष्ट पोलसी अधिकारी सचिन वझे व इतर पोलीसांचा कसोशिने तपास करत होते. सचिन वझे ने त्यावेळी मनसुक हिरेन ला स्वतःवर सर्व आरोप स्विकारण्यासाठी सांगितले होते परंतु त्याचवेळी सचिन वझे याला भिती सुद्धा होती ती म्हणजे तपास यंत्रणांती थोडं जरी दबाव टाकण्यास सुरुवात केली तर मनसुक हिरेन तोंड उघडेल व सर्व काही बाहेर येईल त्यामुळे प्रदिप शर्माने सतोष शेलार याला पैसे देऊन मनसुक हिरेनला संपविण्याचा कॉन्ट्रक्ट दिले. 2 मार्च रोजी सचिन वझे याने मनसुक हिरेनला मुंबई पोलीस हेडक्वार्टरमध्ये बोलाविले. त्याठिकाणी आधिपासुनच प्रदिप शर्मा व निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने उपस्थित होते. शर्मा आणि मानेची उपस्थित राहण्याचे कारण म्हणजे मनसुख हिरेन या आरोपीची ओळख पटवण्याचे काम त्याठिकाणी करता येईल हे त्यामागचे उद्देश.
धक्कादायक बाब म्हणजे वझे यांनी 2 मार्च रोजी एका वकिलाकडून मनसुक हिरेनचा जबाब ही बनवुन घेतला होता.त्या जबाबात मनसुन हिरेन याची पोलीस तपासप्रक्रियेमुळे मानसिक स्थिती खराब असल्याचे नमुद केले होते.
3 मार्च रोजी सचिन वझे अंधेरी पूर्व येथील पीएस फाऊंडेशन याठिकाणी प्रदिप शर्माची भेट घेतली. त्याठिकाणी शर्माला पैश्याचे बैग ही देण्यात आले. तसेच सचिन वझेने बेनामी सिमकार्ड ही सचिन मानेला देण्यासाठी दिले होते ज्या सिमकार्ड ने नंतर मनसुक हिरेन ला फोन जाणार होते. विशेष म्हणजे एवढं करतांना कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणुन सचिन वझेने हत्येच्या दिवशी टिप्सी बार मध्ये रेड मारत स्वतःला पोलीसी कार्यात व्यस्त असल्याचा फिल्मी ड्रामा ही त्याने केला.
सचिन वझे याने मनसुख हिरेनला तुला अटक होणार आहे असे पटवुन देत सुरक्षित ठिकाणी हिरेनला ठेवण्यासाठी सचिन वझे याने स्वतःहुन व्यवस्था केली. तसेच सचिन वझे याने मनसुख हिरेनला तुला भेटण्याासाठी कांदिवली क्राईम ब्रांचचा तावडे येणार असे सांगितले. विशेष म्हणजे हा तावडे दुसरा कोणी नसुन सचिन माने होता.
तावडेच्या नावाखाली मनसुकची भेट घेण्यासाठी 4 मार्च रोजी हिरेन ला संपर्क करत घोडबंदररोड ठाणे येथील सुरज वॉटर पार्क याठिकाणी 8.30 दरम्यान येण्यास सांगितले. मनसुक याने ऑटो रिक्षातून प्रवास करत मानेची भेट घेतली. कारने दोघेही रात्री 9.15 च्या सुमारास घोडबंदर रोड सुरेखा हॉटेल याठिकाणी गाडी थांबवली.
9.22 वाजता कॉन्ट्रक्ट किलरसह लाल रंगाची कार मानेच्या कारजवळ पार्क करण्यात आली. 9.36 वाजता माने याने मनसुक कडून त्याचे फोन घेत लाल रंगाच्या कारमध्ये बसण्यास सांगत ह्या कारने सुरक्षित ठिकाणी पोहोचणार असे सांगितले. त्या कारमध्ये आधिपासुन 4 कॉन्ट्रक्ट किलर ही होते. त्यांनी मनसुकला मधल्या भागात बसण्यास सांगितले. संतोष शेलार आणि आनंद जाधव हे डावी आणि उजवीकडे बसले होते. सतिश मोथकुरी हा ही मागे बसला होता. मनिश सोनी हा ड्रायव्हर सिटवर बसला होता.
आरोपींनी मनसुकचा गळा मागुन धरत त्याचा तोंड दाबत आणि नाकावर रुमाल ठेऊन जीवे ठार मारण्यास सुरुवात केली. मनसुक याने बचावासाठी हालचाली करतांना संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांनी मनसुकचे हात हट्ट धरले व सतिश मोठकुरी याने सतिश शेलार आणि आनंद जाधव सह मनसुक हिरेन चा खुन केला.
9.57 वाजता आरोपींनी गाडी चालवत 10.30 च्या दरम्यान ठाण्यातील कशेळी ब्रिज याठिकाणी मयत इसमाचे अंगातले दागदागीने, पैसे, कार्ड व ओळखपत्र काढुन त्याला ब्रिजवरुन ढकलुन दिले. मयत इसमाची ओळख पटू नये म्हणुन सर्वकाही काढण्यात आले होते.
हत्येच्या घटनेनंतर जाधव याने 4 मार्च 2021 ते 5 मार्च 1.30 वाजताच्या दरम्यान लाल रंगाची तवेरा एमएच 14 डीएन 2190 कार मालकाला देऊन कारचे भाडे 1000 रुपये ही दिले.
दुसर्या दिवशी मनसुक हिरेन याचे शव ठाण्यातील रेती बंदर याठिकाणाहुन कशेली ब्रिजपासुन 1 कि. मी. अंतरावर पोलीसांना आढळुन आले.
अटकेपासुन वाजता येईल म्हणुन हत्या केल्यानंतर शेलार, मोथकुरी व सोनी या तिघा आरोपींनी मुंबईतून थेट दिल्लीत रवाना झाले. त्यानंतर 10 मार्च 2021 ते 11 मार्च 2021 पर्यंत ते पहारगंज हॉटेलात ही राहिले व तेथून पुढे दिल्लीतुन लखनऊ मार्गे नेपाळला रवाना झाले. त्याठिकाणी ही ते 4 दिवस राहीले. त्यानंतर आरोपींनी नेपाळ येथून दिल्लीत येत तेथून पुढे अहमदाबाद आणि पुन्हा मुंबई आले. 9 मार्च 2021 ते 20 मार्च 2021 ते पोलीसांपासुन लपण्यासाठी फरार होते व विविध ठिकाणी पुरावे तैयार करण्यासाठी मुंबई टू नेपाळ दौरा केला होता.
हे आरोपी नेपाळ दौरा करतांना सोनीला शेलार या आरोपीने मुंबई ते दुबईचा विमानाचे तिकीट काढुन दिले. प्रदिप शर्माच्या सांगण्यावरुन सोनी दुबईत गेला होता. सोनी या संपुर्ण गुन्ह्यात नाजुक असल्याकारणाने कधीही तोंड उघडल्याने सगळ्यांचा परदा फाश होईल या भितीने शर्माच्या नेतृत्वाखाली सोनीली दुबई वारी झाली.
या प्रकरणाप्रमाणेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मावर इतर ही खोटे एन्काऊंटर केल्याप्रकरणी गुन्हे ही दाखल आहे व कोर्टाकडून शिक्षा ही देण्यात आले आहे. सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत नालासोपारातुन शिवसेना पक्षातर्फे याच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा ने निवडणुक ही लढवली होती परंतु यश मात्र आले नाही. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे क्षितिज हितेंद्र ठाकुर यांचा विजय झाला होता.
प्रदिप शर्माचे कारस्थान पाहिल्यावर आजवर ज्या ज्या आरोपींचे त्याने एन्काऊंटर केले त्या पिडीतेच्या कुटुंबिय आज ही शर्माच्या अंतकरणाची वाट बघत आहेत. त्यातच प्रदिप शर्माच्या नेतृत्वाखाली काम करणार्या संजय शिंदे याने ज्या प्रकारे एन्काऊंटर केले आहे त्यामुळे शिंदेला एन्काऊंटरसाठी कोणी किती रुपयांचा बैग दिलं असेल? हे तपासानंतरच निष्पन्न होईल. विशेष म्हणजे हिरेन हत्याकाडचा तपास एनआईए कडून करण्या आले परंतु सध्याच्या एन्काऊंटरचे तपास सीआयडीकडून करण्यात येत असल्याने प्रामाणिकपणे तपास होईल कि नाही यावर सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला विश्वास राहिलेला नाही. त्याचसोबत संजय शिंदेच्या नातेकावाईक व जवळ पासच्या लोकांच्या ही बैंक खात्याची तपासणी व घराची तपासणी करण्यात यावी जेणेकरुन एन्काऊंटरपुर्वी कोणी स्पोन्सर केले हे कळेल अशी देखील जनतेची मागणी आहे.