न्याय व्यवस्थेला बगल देत महाराष्ट्र पोलीस खात्याचं चाललय तरी काय?
कळवा (महाराष्ट्र विकास मिडिया)- शिंदे सरकारच्या महाराष्ट्रात पोलीसांकडून नुकताच एन्काऊंटरचा प्रकार ठाणे जिल्ह्यात घडला. बलात्कारीचा आरोपी अक्षय शिंदे याला प्रदिप शर्मा एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या सोबत काम करणार्या पोलीस वाल्याने संजय शिंदे या पोलीसाने एन्काऊंटर केले. सदर एन्काऊंटर फेक एन्काऊंटर असुन पोलीसांनी आपल्या पोलीसी शक्तिचा दुरुपयोग केल्याचा संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेकडुन आरोप होत असतांना आता अजुन एका तुरुंगवासियाचा रहस्यमयी मृत्यु झाल्याने महाराष्ट्र पोलीस खात्याचं चाललय तरी काय अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
आर्थररोड कारागृहात एका तुरुंगवासियाला फिट आल्याने त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे फिट येण्याचे कारण म्हणजे सदर आरोपीने अमलीपदार्थाचे सेवन केल्याचे समजते. यामुळे आर्थररोड कारागृहात तुरुंगात राहणार्यांना अमलीपदार्थ कुठुन मिळतो असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनता विचारत आहेत.
सदर आरोपी ह्याच्यावर काळाचौकी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असल्याने त्याला अटक झाली होती व न्यायालयीन कोठतीन त्याला ठेवण्यात आले होते.
नुकताच एक दिवस अगोदर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याचा पोलीसांकडून एन्काऊंटर व आता अर्थररोड कारागृहातील आरोपीचा अमलीपदार्थाचे सेवन करुन फिट आल्याने मृत्यु ह्यामुळे अश्या चुकीच्या पद्धतीने हत्या आणि मृत्युची घटना करुन सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय असा प्रश्न जागृक नागरिक विचारत आहेत.
आर्थररोड तुरुंगात पुर्वी शिक्षा खोट्या आरोपामुळे काही दिवस राहणार्या एका कैदीने महाराष्ट्र विकास मिडियाशी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, अर्थररोड तुरुंगात मोठ्या प्रमाणात पोलीसांकडून तुरुंगवासियांची पिळवणुक होते. आरोपी हा दोषी असला काय किंवा नसला काय, कोर्टात आरोप सिद्ध झाले किंवा नाही पोलीसांकडून मारहाण केली जाते. जेवण देतांना ही भेदभाव केले जाते. ज्या आरोपींकडे राजकिय संपर्क आहे व वशिला आहे त्यांना पोलीसांकडून चांगली ट्रिटमेंट दिली जाते तर त्याचवेळी सामान्य तुरुंगासियांना मारहाण शिवीगाळी व पैश्यांची मागणीसाठी मानसिक त्रास दिले जाते. तुरुंगात एक अंड सुद्धा खाण्यासाठी देतांना त्यापुर्वी आठवडा भर पैश्याची मागणी केली जाते. ज्या तुरुंगासियांना सिगारेट पिण्याचे व्यसन आहे त्यांना देखील मानसिक छळवणुक करण्यासाठी पोलीस त्रास देत असते. तुरुंगवासियांचे परिवार जेव्हा भेटण्यासाठी येतात तेव्हा त्या भेटीसाठी देखील पोलीसांकडून पैश्याची मागणी केली जाते. तुरुंगात सर्रास पणे अमलीपदार्थाची विक्री पोलीसांकडूनच केली जाते.
या अश्या आरोपांमुळे अर्थररोड तुरुंगाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. तसेच मृत व्यक्तिला अमलीपदार्थ पुरवणार्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे अशी नागरिकांची प्रामाणिक मागणी आहे.