महाराष्ट्रातील पोलीसांना चालवतोय कोण? देवाभाई (#devabhau) पोस्ट सोशल मिडियावर ट्रेंडिंग करण्यामागचं उद्देश काय?
मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- भारतात मा. नरेंद्र मोदी यांची मोदी लाट सध्या संपुष्टात आल्याचे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातुन दिसुन आले. मागील दोन टर्म महाराष्ट्र व भारतातील इतर राज्यात अबकी बार मोदी सरकार म्हणुन आमदारकी आणि खासदारकी साठी भाजप व युतीच्या उमेदवारांनी मतदारांची मत मिळण्याचा प्रयत्न केले. केंद्रात मोदींनी व राज्यात स्थानिक आमदार खासदारांनी दिलेले अनेक आश्वासन पाळले नाही त्याचसोबत महाराष्ट्र व इतर राज्यात महिलांची सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे जनतेमध्ये मोदी सरकारबद्दल अतिशय नाराजी दिसुन आली. त्यामुळे यंदा अबकी बार हा फॅक्टर चालणार नाही ही लोकसभेच्या निकालानंतर चर्चेचा विषय ठरला.
नुकताच ज्याप्रकारे काल दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला ठाणे जिल्ह्यातील पोलीसांनी नाट्यमय एन्काऊंटर मध्ये त्याचा खुन केला. त्याचसोबत आज दि. 24 सप्टेंबर रोजी आणखीन एका आरोपीला तुरुंतात अमलीपदार्थ देऊन त्याला फीट येऊ त्याचा मृत्यु झाला यामुळे आता यंदाचे सरकार अबकी बार आरोपींची हत्या करुन मिळणार सरकार?’ या विचारात आहेत कि काय अशी संपुर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.
मागील अनेक वर्षांपासुन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडत आहे. अल्पवयीन मुलींवरच नाही तर महिलांवर तसेच ज्येष्ठ महिलांवर सुद्धा लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याचे दिसुन आले. जे आरोपी भाजप किंवा इतर पक्षाचे असले त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाईत टाळाटाळ व दिरंगाई होते परंतु त्याचवेळी मध्यमवर्गीय व गरिब कुटुंबियातील आरोपींवर तातडीने कारवाई हे आजवर दिसुन आले. भारत देशात व महाराष्ट्रात अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे आमदार व खासदार पासुन ते लोकप्रतिनिधींवर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर महिलांचा बलात्कार आणि विनयभंग केल्याचे गुन्हे आहेत परंतु त्यांच्यावर आजवर कायदेशीर कठोर कारवाई होतांना दिसली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने केंद्र आणि राज्यातील सत्ताधार्यांवर संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या कारकीर्दीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 पासुनच्या कारकीर्दीत भारतीय महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाले परंतु त्याला थांबवण्यासाठी जो कायदा येणार होता तो अद्याप आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची जनता अत्यंत नाराज व संताप व्यक्त करतांना दिसुन आली.
त्याचवेळी अचानक ज्याप्रकारे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा एन्काऊंटर व इतर गैर मार्गाने खातमा केला जात आहे त्यामागे सत्ताधार्यांचे राजकिय मार्केटिंग तर नाही असा संशय आता नागरिकांना येण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधार्यांनी न्याय पालिका आणि पारदर्शक पोलीस प्रशासन मजबुत करावे अशी सामान्यांची मागणी असते परंतु गैरप्रकाराने जर पोलीसांच्या हातुन आरोपींचा खातमा करणार असेल तर भारतातील न्याय व्यवस्था असक्षण आहे कि काय ? आणि तसे असल्यास न्याय पालिकेला मजबुत करण्यासाठी राजकिय नेते का पुढाकार घेत नाहीत ? असा सवाल आता मतदारांकडून होत आहे.
प्रत्येक विधानससभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रकारे आजवर भाजप आणि युतीच्या सरकारने वेगवेगळे मार्केटिंग करत मतदारांना आकर्षण करण्याचे काम केले यंदा ते संवेदनशिल मुद्दा असलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या मुद्द्याला मतदानासाठी कॅम्पिंग म्हणुन वापरत आहे कि काय अशी शंका देखील नागरिकांना येत आहे. बलात्कारी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे परंतु कायद्यामार्फतच झाली पाहिजे त्यामुळे भारतात न्याय व्यवस्था जीवंत आहे हे दिसुन येईल अन्यथा पोलीसांनीच न्यायमुर्ती होत असेल तर हे मुगलशाहीचा रुप आहे असे अनेकांनी म्हणणे आहे.