सीबीआय मार्फत वामन म्हात्रेे व साथीदारांची चौकशी होण्याचे संकेत
बदलापुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणार्या आरोपी अक्षय शिंदे चा काल पोलीसांनी एन्काऊंटर करत हत्या केल्याने या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय कडे सोपविण्यात आली आहे. या प्रकरणाला अल्पवयीन बलात्कारासह चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीचा संबंध ही असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने बदलापुरचा कांड आता आणखीन मोठा रुप घेत अनेक रहस्य जनतेसमोर येणार असे समजते.
ज्येष्ठ पत्रकार व आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकार्यांना चांगलाच घाम फुटला आहे. बदलापुरचा प्रकरण फक्त दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा नसुन चाईल्ड पोर्नोग्राफी आणी मानवी तस्करी बाबत असल्यामुळेेच मुख्य आरोपीला संपविण्यात आले होते असा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात आता शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी पुन्हा वादाच्या भोवर्यात सापडल्याचे दिसते.
बदलापुर शिवसेना शहरप्रमुख, कुळगांव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि गावगुंड म्हणुन ज्या नेत्याची शहरात ओळख आहे ते म्हणजे वामन बारकु म्हात्रे यांनी तीन अश्या प्रकारचे कृत्य केले ज्यामुळे सीबीआय आता वामन बारकु म्हात्रेची देखील चौकशी करणार अशी चर्चा आहे. पहिला प्रकार म्हणजे जेव्हा बलात्कारी शिंदे विरोधात पिडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यावर पोलीसांकडून दबावसुरु असतांनाच वामन म्हात्रे यांना आदर्श विद्या मंदिराच्या व्यवस्थापक घोरपडे यांच्या मुलीचा कुमारी. घोरपडेचा फोन आला होता. त्या फोनमुळेच वामन म्हात्रे हजारोच्या संख्येने आंदोलक जमाव करतांना सुद्धा त्यांची समजुत काढण्यासाठी त्याठिकाणी गेले होते. विशेष म्हणजे वामन म्हात्रे शिवसेना पक्षाचे, शाळेतील व्यवस्थापक भाजप पक्षाचे पदाधिकारी मग शिवसेना शिंदे गटातील लोकप्रतिनिधी त्याठिकाणी का गेला हे लिंक अक्षय शिंदे प्रकरणात महत्वाचे लिंक ठरणार आहे. त्याचसोबत त्याठिकाणी वामन म्हात्रे याने एका महिला पत्रकाराचा शाब्दिक विनयभंग करत बलात्काराची बातमी न छापण्यासाठी धमकी दिली होती. त्यामुळे म्हात्रेचा हा कृत्य करण्यामागचं मुळ उद्देश काय होता ? हा दुसरा प्रश्न अक्षय शिंदे प्रकरणात सीबीआयच्या चौकशीचे लिंक होणार आहे.
महिला पत्रकाराला शाब्दिक विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रे विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला व अटकपुर्व जामिन मिळवल्यानंतर शांतीने घरी बसण्याऐवजी पुन्हा पिडीत अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाची एफआयआर व्हायरल केल्याने वामन म्हात्रे याकडे ही एफआयआर कोणत्या पोलीसाने पुरविण्याचे काम केले तसेच वामन म्हात्रे व त्याच्या साथीदाराने सोशल मिडियावर एफआयआर का वसरविण्याचा निंदनिय काम केले हा प्रश्न देखील सीबीआय कडून म्हात्रेला विचारण्याची शक्यता नाकारया येत नाही. कारण म्हात्रेकडून होणार्या कृत्यामुळे कुठेतरी चाईल्ड पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीचा कांड लपवण्यासाठी म्हात्रेंचा अट्टहास होता कि काय हे तपासानंतरच निष्पन्न होईल असे समजते.
धक्कादायक बाबत म्हणजे ज्या आरोपीच्या परिवाराला खरवई येथील काही ठराविक लोकांनी मारहाण केली ते आरोपी देखील वामन म्हात्रेचे खास असल्याचे बोलले जाते त्यामुळे सगळं काही म्हात्रेंनी ठरवुन केलं होतं कि काय ? तसेच असल्याच त्यामागचं कारण काय ? हे गुन्ह्यातील तपासाचे महत्वाचे प्रश्न असुन सीबीआय कडून वामन म्हात्रेची चौकशी होणार असे समजते.
गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत मुलीच्या आईने जेव्हा वामन म्हात्रे विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व पुरावे दाखल केल्यानंतर म्हात्रेंचे काही कार्यकर्ते पिडीत महिलेला आधि दबावतंत्राचा वापर करुन नंतर पैसे देऊन प्रकरणात शांत राहण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे हे पैसे म्हात्रेने पुरविले का? आणि पैसे देण्यामागे कारण फक्त सोशळ मिडियावर एफआयआर पसरविणे किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचा मुद्दा देखील? असे अनेक प्रश्न आता उपस्थति होत आहे. एकुणच वामन म्हात्रेला गुन्ह्यात सहकार्य करणार्यांची देखील सीबीआय चौकशीत नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे विनयभंग आणि पोक्सो या दोन गंभीर स्वरुपाच्या आरोप असलेल्या वामन म्हात्रेंना आता चाईल्प पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडल्याची बदलापुरात जोरदार चर्चा आहे.